20 Memorable Things of 2020

2020 नवीन दशकाची सुरुवात बर्‍याच उत्साहाने आणि आयुष्यातील एका नवीन अध्यायाची संधी मानली गेली पण आज वर्ष संपताना प्रत्येकाने 2020 मध्ये काय घडले याचा विचार केला तर खूप साऱ्या अश्या घटना घडून गेल्या आहेत कि हे वर्ष प्रत्येकाला कधी एकदा संपेल असे झाले आहे.अश्याच  काहीं घटनांचा घेतलेला आढावा 

अनुक्रमणिका

1) ऑस्ट्रेलिया बुशफायर AUSTRALIA BUSHFIRE

२०२० ऑस्ट्रेलिया मधील, वर्षाची सुरूवात झाली ती एका भयानक ब्लॅक समर (Black Summer) आगीने ऑस्ट्रेलियन बुशफायर हंगाम 2019–2020 मध्ये मुख्यतः देशाच्या दक्षिणपूर्व भागात खूपच तीव्र आणि अनियमित आगीने सुरुवात झाली. जानेवारी 2020 मध्ये ही आग विझविली गेली पण या मुळे वातावरणावर खूपच वाईट परिणाम झाला आहे, हीटवेव्ह आणि ग्लोबल वार्मिंग च्या घटना वाढल्या आहेत.  1 अब्जाहून (1 billion ) अधिक प्राणी मरण पावले आहेत असा अंदाज आहे आणि अंदाजे 2 हजार घरांचे नुकसान झाले आहे. एकूण नुकसान आणि आर्थिक नुकसान 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहचले आहे.

1.-AUSTRALIA-BUSHFIRE 2020

2) जकार्ता मधील भयानक पूर FLOOD IN INDONESIA – JAKARTA

इंडोनेशिया मध्ये विशेषत: ऑक्टोबर-एप्रिलच्या पावसाळ्यात पूर येणे सामान्य गोष्ट आहे. पण या  जानेवारी मध्ये सुलावेसी बेटावर आलेल्या  भयानक पुरामुळे  कमीतकमी 70 लोक ठार झाले आणि मार्चच्या सुरुवातीला पश्चिम जावा (West Java) मध्ये मुसळधार पावसात शेकडो लोक विस्थापित झाले.

jakarta flood 2020

3) दिल्लीमधील दंगल  RIOTS IN DELHI

२०२० च्या दिल्ली दंगलीतील हिंसाचार आणि मालमत्ता पेटविणे अश्या घटना घडल्या आहेत दंगली मध्ये 53 जण ठार झाले, 

RIOTS IN DELHI 2020

4) कोबे ब्रायंटचा मृत्यू DEATH OF KOBE BRYANT (Basket Ball Player)

२६ January जानेवारी रोजी कॅलिफोर्नियाच्या कॅलाबास (Calabasas) मध्ये हेलिकॉप्टरच्या अपघातात एनबीए (NBA) स्टार कोबे ब्रायंट (KOBE BRYANT), त्याची १-वर्षीय मुलगी गियाना आणि इतर सात प्रवासी ठार झाले.

बास्केटबॉलसाठीही हे या  दशकात सर्वात वाईट वर्ष असेल.

5) जागतिक आरोग्य संघटनेनं सूचित (Notify)केलेला NOVEL CORONAVIRUS 2020

द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO )  ने  7 जानेवारी रोजी नॉवेल कोरोना वायरस (novel coronavirus) च्या चीन मधील महामारी चा प्रसार अधिकृत रित्या जाहीर केला.  

कोव्हीड -१९ (Covid -१९) म्हणून ओळखल्या जाणारा ‘श्वसनाच्या आजार’ , या कोरोना व्हायरस च्या महामारी ची सुरवात  चीनच्या हुबेई प्रांतातील वुहान (Wuhan) शहरातील मांस बाजारात सुरू झाली होती .

6) चीन मधील कोरोनाव्हायरस चा पहिला मृत्यू 

11 जानेवारी मध्ये कोव्हीड -१९ (Covid -१९) च्या पहिल्या मृत्यूची नोंद चीन मध्ये झाली. जागतिक आरोग्य संघटनेने विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचे ऐकल्यानंतर काही दिवसानंतर चीनने पहिल्या मृत्यूची पुष्टी केली.

covid-19 2020

7) कोव्हीड -१९ (Covid -१९)  महामारी पसरल्यामुळे  टोकियो ऑलिंपिक्स2020 पुढे ढकलले  

२ March मार्च रोजी सुरु होणारी टोकियो ऑलिंपिक्स (Tokyo Olympics)हि जगातील सर्वात मोठी  क्रीडा स्पर्धा  पुढे ढकलली गेली. या स्पर्धा आता 23 जुलै  २०२१ ला घेण्याची घोषणा ऑलिम्पिक समितीने केली आहे.  

tokyo plympics 2020

8) सर्वात प्रथम इटली ने राष्ट्रीय लॉक डाऊन केले.  

कोरोना व्हायरस च्या महामारी मुळे सर्वात प्रथम इटली आपल्या  राष्ट्रीय सीमा बंद करून ने राष्ट्रीय लॉक डाऊन केले. आणि त्या नंतर जगातील बहूतांश देशांनी  लॉक डाऊन केले.

9)  बॉलीवूड गमावले दोन मोठे अभिनेते 

बॉलीवूड आणि हॉलिवूड मध्ये चमकलेला अभिनेता  इरफान खान आणि भारतीय सिनेमासाठी योगदान दिलेला अभिनेता ऋषी कपूर या दोघाना  अभिनय सृष्टी ने गमावले आहेत. हे दोघेही कर्करोगाने ग्रस्त होते आणि अनुक्रमे 29 आणि 30 एप्रिल 2020 रोजी त्यांचे निधन झाले. .यांच्या निधनाने संपूर्ण बॉलीवूडला धक्का बसला आहे.

bollywood major losses 2020

10) विशाखापट्टणम मधील गॅस गळती 2020

विशाखापट्टणममधील एलजी पॉलिमर (LG Plymer) केमिकल प्लांटमध्ये ७ मे  रोजी गॅस गळतीमुळे एका मुलासह ११ जणांचा मृत्यू झाला आणि उलट्या आणि डोकेदुखीच्या लक्षणांसह शेकडो जण गंभीर आजारी होऊन रूग्णालयात दाखल करण्यात आले.  आणि जवळपास ची गावे रिकामी करण्यात आली 

11) जॉर्ज फ्लॉइडचा मृत्यू (GEORGE FLOYD DEATH)

२५ मे रोजी 46 वर्षांचा जॉर्ज फ्लायड चा मृत्यू मुळे अमेरिकेत निदर्शनांची मालिका सुरु झाली 

.

black lives matter  2020

12) केरळमध्ये गर्भवती हत्तीणीचा मृत्यू:

27 मे रोजी काही स्थानिकांनी केरळ मध्ये वेलियार नदीत गर्भवती असलेल्या हत्तीणी ला फटाक्यांनी भरलेला अननस खायला दिल्यानंतर  तिच्या तोंडात अननसाचा स्फोट झाला त्यामुळे तिच्या तोंडात फटक्याच्या स्फोटा मुळे हत्तीणीचा दुर्दवी मृत्यू झाला. .

keral eliphant kand 2020

13) सुशांतसिंग राजपूत ची आत्महत्या 2020. 

34 वर्षीय सुशांत सिंह राजपूत या बॉलिवूड मधील सर्वात प्रतिभावान अभिनेते राजपूत ने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतसिंग राजपूत याने पवित्र रिश्ता या टीव्ही कार्यक्रमातून प्रचंड प्रसिद्धी मिळविली होती. पीके (PK), केदारनाथ (Kedarnath), छिचोरे (Chichore), सोनचिडिया (Sonchidiya), ड्राइव्ह (Drive) आणि एमएस धोनीः द अनटोल्ड टेल’ (MS Dhoni-The Untold Story) या सारख्या  यशस्वी चित्रपटा मधून त्याने अभिनयाची बॅटिंग केली होती. 

sushat rajput suside case 2020

14) टिकटॉक आणि PUBG ला भारतात बंदी;

२९ जून रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मेक इन इंडिया” उपक्रमास अनुकूल अशी भूमिका घेत आणि भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंतेचा हवाला देत  चिनी-निर्मित apps वर अधिकृतपणे बंदी घातली. … प्रचंड लोकप्रिय अँप टिकटोक वर सुद्धा बंदी घातली. 

tiktook and pubg banned in india 2020

15) 2020 चा सर्वाधिक लोकप्रिय यू ट्यूबर 

अजय नगर उर्फ ​​Carry Minati हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय यू ट्यूबर (You Tuber) बनला आहे.आहे. १२ जून 1999. रोजी जन्मलेल्या फरीदाबादच्या तरूण स्टारने 2014 मध्ये एक यूट्यूब चॅनेल सुरू केले आणि अवघ्या सहा वर्षात त्याने 21.7 दशलक्षांहून (21.7 million) अधिक ग्राहकांची कमाई केली. इन्स्टाग्रामवर त्याचे 7.5 दशलक्ष (7.5 million) फॉलोअर्स आहेत आणि ट्विटरवर त्याचे 1.7 दशलक्ष  (1.7 million) यूजर्स Users आहेत.

carryminati 2020

16) चायनीज फोन वर बंदी. 

भारतीय बाजारपेठेवर मजबूत पकड असलेले आजचे चायनीज स्मार्टफोन – झिओमी (Xiaomi) , ओप्पो (Oppo), व्हिवो (Vivo) आणि रीअलमी (RealMe) सारख्या कंपन्या ना भारत सरकारने बंदी घातली या कारवाईचा त्वरित परिणाम होणार नाही पण हा  परिणाम आत्म निर्भर भारत संकल्पनेला बळ देईल 

17) Apple बनली जगातील सर्वात मोठी कंपनी 2020

२०२० मध्ये ऍपल हि अमेरिकन कंपनी 2 ट्रिलियन डॉलर्स  ( $2 trillion) ची मार्केट कॅप गाठणारी पहिली कंपनी बनली. दोनच वर्षात आपले मूल्यांकन त्यांनी दुप्पट केले. 

apple 2 trillion marketcap

18) ट्रम्प सत्तेतून पाय उतार 

 २०२०  मधील धक्का धायक घटना म्हणजे अमेरिकन राष्ट्रपती डोलँड ट्रम्प यांचा प्रेसिडेंशियल निवडणुकीत पराभव. 

19) भारतातील शेअर बाजारात अभूतपूर्व  घसरण. 

2020 मधील स्टॉक मार्केट क्रॅश (Stock Market  Crash), ज्यास कोरोनाव्हायरस क्रॅश देखील म्हटले जाते, ही एक मोठी आणि अचानक जागतिक शेअर बाजाराची दुर्घटना होती जी 20 फेब्रुवारी 2020 पासून सुरु झाली आणि 7 एप्रिल रोजी संपली.

share market crash during lockdown

20) 2020 मध्ये क्रूड ऑइल चे भाव नकारत्मक वाढीच्या दिशेने 

एप्रिल २०२० च्या सुरुवातीला  क्रूड ऑइल च्या भावाची घसरण  सुरु झाली आणि 20 एप्रिल रोजी किंमत नकारात्मक झाली. हि एक अभूतपूर्ण घटना होती 

21) राम मंदिराचा निकाल 2020

 २०२० मधील भारतातील एक अविस्मरणीय घटना राम मंदिराचा निकाल 

सुप्रीम कोर्टाने भारत सरकारला राम मंदिर बांधण्यासाठी विश्वस्त निर्माण करण्याचे व विश्वस्त मंडळ स्थापन करण्याचे आदेश दिले.  हि वादग्रस्त जमीन भारत सरकारच्या मालकीची  असेल आणि त्यानंतर त्याची स्थापना झाल्यानंतर ट्रस्टला हस्तांतरित केली जाईल.

ram mandir modi

Leave a Comment

satta king chart