About Us

आमच्या विषयी

माझी मराठीची बोलु कौतुके। परि अमृताते ही पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥

                                                                                        श्री संत ज्ञानेश्वर

अमृतालाही पैजेनी जिंकणारी अक्षरे, अशी अमृतवाणी ज्ञानदेवांच्या प्रत्येक शब्दाशब्दातून व्यक्त झाली आहे . ज्ञानाचा रुक्षपणा न ठेवता, ज्ञानाचा दिप श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी सातशे वर्ष पूर्वी लावला आहे. 

महाराष्ट्रात प्रामुख्याने सुमारे 8.3 कोटी लोक मराठी बोलतात ,मराठी भाषा हि महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. जगात मराठी बोलणाऱ्यांची संख्या दहाव्या क्रमांकावर आहे आणि देशात हिंदी आणि बंगाली भाषे नंतर बोलली जाणारी मोठ्या प्रमाणात बोलली जाणारी तिसऱया क्रमांकाची भाषा मराठी आहे. 

बराच वर्षांपासून इंग्रजी माध्यमातून शिक्षण प्रणाली मुले सर्व ज्ञान व विज्ञान हे इंग्रजी माध्यमामध्ये बनले आहे आणि बनत आहे, आणि हल्लीच्या जमान्यात अनेक ज्ञान प्रदान  हे जागतिक स्तरावर होत असल्या कारणाने लोक इंग्रजीचा वापर फारच करत चालले आहेत.

इंटरनेट च्या मायाजालात ज्ञान, विज्ञान, साहित्य आणि असंख्य अश्या  विषयावर प्रचंड ज्ञान भांडार उपलब्ध आहे आणि असे ज्ञान मराठी भाषे मध्ये खूपच कमी आहे.

आपण संगणक, इंटरनेट, मशीन लर्निंग , कृत्रिम बुद्धिमत्ता, नॅनो तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान इत्यादी तंत्रज्ञानाची मदत घेतली नाही तर आपण भविष्यात आर्थिकदृष्ट्या बळकट होऊ शकत नाही आणि अशा स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानाच्या जगात आपण टिकून राहू शकनार नाही. 

तसेच,वैद्यकीय, शेती, शिक्षण, अर्थव्यवस्था, खेळ, नोकरी, पर्यटन इत्यादी क्षेत्रातीळ प्रगती ही विज्ञान आणि तंत्रज्ञाना मुळे झाली आहे आणि होणार आहे. जगभरात प्रत्येक क्षेत्रात प्रचंड संशोधन होत आहे.  संशोधनामुळे  बदल खूप वेगाने घडत आहेत असे बदल कि आपले जीवन सुसह्य होत आहे. पण ह्या बदलाची नांदी आपल्यापर्यंत पोहचत नाही. इंटरनेट च्या महाजालात माहितीचा प्रचंड स्रोत आहे आपल्याला असे बदल  वेबसाईट्स च्या माध्यमातून कळत असतात. पण खूप सारी माहिती हि इंग्रजी भाषेमध्ये आहे. 

तंत्रज्ञानातील बदल , नवीन तंत्रज्ञाची माहिती , होणारे इव्हेंट्स याची माहिती The-Marathi.com च्या वेबसाईट माध्यमातून आम्ही द्यायचा प्रयत्न करू.

वेबसाइट हे कोणतीही माहिती तत्क्षणी जगभर पोचवण्या चे साधन आहे. वर्तमानपत्र, रेडिओ, टि.व्ही. चॅनेल्सच या माध्यमांच्या तुलनत वेबसाईट ची माहिती साठवण्याची क्षमता मोठी आहे. त्यास ऑडिओ, व्हिडीओ अशा इतर माध्यमांची जोड देऊन माहिती अधिक परिणामकारतेने सादर करता येते. तसेच त्यात कोणताही मजकूर शोधून मिळवता येतो. तो कधीही सुधारता येतो. म्हणून www.the-marathi.com ने उद्दीष्टांच्या पूर्ततेसाठी इंटरनेट हे माध्यम निवडले.

इंटरनेट च्या माध्यमातून मराठी  विद्यार्थ्यांना, महिलांना आणि मराठी बोलणाऱ्या सर्वाना एक  ज्ञानाचा स्तोत्र मिळावा आणि त्यांनी व्यक्त व्हावे असा विचार या ब्लॉग पोर्टल सुरु करण्याचा मागे आहे. म्हणूनच ‘The-Marathi.com ’ हे व्यासपीठ आपल्या साठी सादर करीत आहे.  

satta king chart