Oppo Reno 5 Pro 5G भारतात झाला लॉन्च , Enco X TWS Earbuds सह : किंमत, वैशिष्ट्ये

oppo reno 5 pro 5g

सोमवारी भारतात Oppo कंपनीचा नवीन फ्लॅगशिप फोन Oppo Reno 5 Pro 5G लाँच झाला. 

Oppo Reno 5 Pro 5G मध्ये Thin Bezels आणि Curved Edges सह Punch-hole डिस्प्ले डिझाइन देखील आहे.

फोनमध्ये MediaTek Dimensity 1000+ प्रोसेसर आहे, जे 5G कनेक्टिव्हिटीसह येते. 

स्मार्टफोनबरोबरच कंपनीने आज देशात Oppo Enco X truly wireless (TWS) earbuds देखील बाजारात आणला आहे.

Oppo Reno 5 Pro 5G, Enco X : किंमत, उपलब्धता 

Oppo Reno 5 Pro 5G ची किंमत 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी

रु. 35,990 आहे. 

हा फोन Astral Blue आणि Starry Black कलर ऑप्शन्स मध्ये उपलब्ध आहे.

हा फोन 22 जानेवारीपासून Flipkart, Oppo India e-store, आणि retail stores मध्ये खरेदीसाठी उपलब्ध असतील.

Sale मध्ये पहिल्या तीन दिवसांत हा फोन जर तुम्ही HDFC बँक आणि ICICI बँक कार्ड वापरून मागवला तर ग्राहकांसाठी 10 टक्के कॅशबॅकसह उपलब्ध असेल.

Bank of Baroda आणि Federal Bank cards व त्याच सोबत Zest Money द्वारे खरेदी करणाऱ्यांना 2,500 रुपये cashback उपलब्ध आहे.

Paytm द्वारे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या Paytm वॉलेटमध्ये 11 टक्के इन्स्टंट कॅशबॅकही मिळेल. 

Oppo, 120GB फ्री क्लाउड सर्व्हिस देखील देईल, हि Offer फोन खरेदीच्या तारखेपासून 12 महिन्यांसाठी लागू होईल. 

याव्यतिरिक्त, तेथे Enco X earbuds वर रु.1,000 ची offer हि उपलब्ध आहे.

आधीच्या Oppo ग्राहकांना रु.1,500 पर्यंतच्या Upgrade Bonus आणि विशेष EMI योजनेचा लाभ घेता येतील.

शिवाय Bajaj Finserv आणि IDFC First Bank या कंपन्यांद्वारे financial योजनांवर introductory शून्य डाऊन पेमेंट पर्याय आणि One-EMI कॅशबॅक असेल.

Oppo Enco X हा Earbud 9,990 रुपयेला येतो. 22 जानेवारीपासून ते Black आणि White रंगाच्या ऑप्शन्स मध्ये विक्री साठी येईल.

Oppo Reno 5 Pro 5G वैशिष्ट्ये

ड्युअल सिम (नॅनो) Oppo Reno 5 Pro 5G हा ColorOS 11.1 सह Android 11 वर चालत असून फोनमध्ये 6.55 इंचाचा full-HD+ (1,080×2,400 pixels), 20:9 aspect ratio, 92.1 टक्के  screen-to-body ratio आणि 402ppi of pixel density असलेला OLED display आहे. 

फोन, Quad रियर कॅमेरा सेटअपसह आला आहे ज्यामध्ये f/1.7 लेन्ससह 64-मेगापिक्सलचा primary सेन्सर आणि  f/2.2 लेन्ससह 8-मेगापिक्सलचा secondary सेन्सर आहे.

कॅमेरा सेटअपमध्ये 2-मेगापिक्सलचा Macro Shooter आणि 2-मेगापिक्सलचा Monochrome Sensor देखील आहे. 

सेल्फीज आणि व्हिडिओंसाठी समोरच्या बाजूला f/2.4 लेन्ससह 32 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर आहे.

Oppo ने artificial intelligence (AI) वैशिष्ट्यांची यादी प्रदान केली आहे ज्यात AI Highlight Video, AI Scene Enhancement, Night Flare Portrait, आणि Ultra-clear 108MP Image समाविष्ट आहेत. 

फोनमध्ये Dual View व्हिडिओ देखील आहे जो एकाच वेळी पुढील आणि मागील दोन्ही कॅमेर्‍याचे व्हिडिओ कॅप्चर करतो.

स्टोरेजच्या बाबतीत, हा फोन 128GB आणि 256GB स्टोरेजसह येतो. पण यामध्ये microSD card चा slot उपलब्ध नाही.

कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth v5.1, GPS/ A-GPS, NFC आणि USB Type-C port चा समावेश आहे.

Oppo Reno 5 Pro 5G मध्ये 4,350mAh ची बॅटरी आहे जी 65W SuperVOOC 2.0 Super फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

Oppo Enco X वैशिष्ट्ये

Oppo Enco X हा Nordic acoustics company Dynaudio द्वारे ट्यून केलेल्या ध्वनीसह येतो आणि कंपनीची नवीनतम DBEE 3.0 Sound System याला वैशिष्ट्यीकृत करते.

Oppo ने Enco X वर Active Noise Cancellation प्रदान केले आहे. 

यामध्ये दोन adjustable modes आहेत, ते म्हणजे Max Noise Cancellation Mode आणि Noise Cancellation Mode.

आजूबाजूच्या वातावरणामध्ये काय चालू आहे हे ऐकण्यासाठी users ना Earpieces काढण्याची किंवा चालू संगीतला pause करण्याची आवश्यकता नाही कारण earbuds मध्ये यासाठी Transparency Mode देखील समाविष्ट आहे.

बॅटरी life बाबतीत बोलायचे तर, Enco X earbuds हा एका charge मध्ये noise cancellation सहित  5.5 तासांसाठी संगीत प्ले करू शकतो. 

bundled case हा Max Noise Cancellation Mode सह संगीत प्लेबॅक वेळ 20 तासांपर्यंत आणि Noise Cancellation Mode शिवाय 25 तासांपर्यंत वाढवितो. 

वायर्ड चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट दिले आहे आणि Qi standard आधारे वायरलेस चार्जिंगला सपोर्ट मिळते. 

जर आपणास हा फोन खरेदी करायचा असेल तर आपण खालील लिंक वरून घेऊ शकता –

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

  1. गंभीर टीकांमुळे WhatsApp ने आपली नवीन Privacy Policy 15 मे पर्यंत लांबणीवर टाकली.
  2. Amazon Great Republic Day Sale मध्ये मिळणार मोबाईलवर 5000 पर्यंत सूट
  3. Samsung ने लाँच केला 100000 रु. चा galaxy S21 फोन। जाणून घ्या फीचर्स..

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता. आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !

Leave a Comment