Samsung ने लाँच केला 100000 रु. चा galaxy S21 फोन। जाणून घ्या फीचर्स..

samsung galaxy s21

Samsung Galaxy S21 हे samsung चे प्रमुख उत्पादन आहे, म्हणजेच सॅमसंगचे सगळे नवनवीन उपक्रम सर्वप्रथम यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 

जर गुणवत्तेचा विचार केला तर यासारखे फोन आपल्याला कोणत्याच कंपनी मध्ये मिळणार नाहीत. ह्या सिरीजमध्ये सॅमसंगने कॅमेरा मध्ये जास्त भर दिलेला दिसत आहे, कारण त्यांनी त्यांचा 108 मेगापिक्सलचा अप्रतिम सेन्सर यामध्ये दिला आहे, त्याच सोबत बऱ्याच अश्या गोष्टी ज्याची सुधारणा सॅमसंगने यामध्ये केली आहे, तर सविस्तर त्याबद्दल चर्चा करू. 

Samsung Galaxy S21 ची  किंमत ₹69999 पासून सुरू होते, तर Samsung Galaxy S21+ आणि Samsung Galaxy S21 Ultra ची सुरूवातीची किंमत अनुक्रमे ₹81999 आणि ₹105999 आहे.

Samsung Galaxy S21 सिरीज आता officially लॉन्च झाली आहे. 

S21 सिरीजमध्ये प्रामुख्याने Galaxy S21, Galaxy S21+ आणि Galaxy S21 Ultra असे 3 फोन सॅमसंगने बाजारात आणले आहेत, आणि एवढेच नाहीतर Samsung Galaxy Buds Pro, Galaxy Watch Active 2 आणि Samsung Tag म्हणून आणखी दोन उत्पादने लाँच केले आहेत.

तिन्ही मॉडेल्समध्ये 120Hz रिफ्रेश रेट दिला गेला आहे, Galaxy S21 आणि Galaxy S21+ मध्ये एकसारखे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. 

Galaxy S21 Ultra मध्ये 108-मेगापिक्सेलच्या Primary सेन्सरसह Quad Rear कॅमेरा सेटअप आहे आणि त्यामध्ये S Pen सपोर्ट देखील आहे. 

संपूर्ण Galaxy S21 मालिकेत धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारांसाठी IP68 रेटिंगचे सुरक्षा कवच समाविष्ट आहे. 

Galaxy S21 सिरीजची किंमत आणि उपलब्धता

भारतात, Samsung Galaxy S21 च्या बेस, 8GB RAM + 128GB स्टोरेज पर्यायाची किंमत रु.69,999, तर 256GB स्टोरेज पर्यायाची किंमत रु.73,999 आहे.

Samsung Galaxy S21+ च्या बेस, 8GB RAM + 128GB स्टोरेज पर्यायाची किंमत रु.81,999 आहे आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत रु.85,999 आहे. 

सर्वात प्रीमियम Samsung Galaxy S21 Ultra च्या बेस, 12GB RAM + 128GB स्टोरेज पर्यायाची किंमत 1,05,999 रुपये आहे तर टॉप-एंड 16GB RAM + 512GB स्टोरेज पर्यायाची किंमत 1,16,999 रुपये आहे आणि 12GB RAM + 256GB हा स्टोरेज प्रकार भारतात आणला गेला नाही. 

प्री-ऑर्डर 15 जानेवारीपासून सुरू होईल आणि प्री-ऑर्डर ग्राहकांना एक Galaxy SmartTag मिळेल, तो इव्हेंटमध्ये लाँच केला जाईल आणि रु. 10,000 Samsung शॉप व्हाउचर मिळेल तो रिडीम करून आपण Galaxy Watch Active 2 किंवा Galaxy Buds+ सह Travel Adapter मिळवू शकतो.

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी  10,000 रुपयांपर्यंतचे कॅशबॅक उपलब्ध असतील. 

प्री-ऑर्डर ग्राहकांना 25 जानेवारीपासून डिलिव्हरी मिळेल, तर नियमित ऑनलाइन विक्री 29 जानेवारीपासून Samsung.com, Amazon India, आणि Flipkart मार्फत सुरू होईल. आपल्याला हा फोन घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वरून घेऊ शकता.

Galaxy S21 आणि Galaxy S21+ ह्या दोन्ही फोनमध्ये Phantom Violet नावाचा एक नवीन सिग्नेचर कलरचा ऑप्शन दिला आहे, तर Galaxy S21 Ultra हा फोन Phantom Titanium, Phantom Navy, आणि Phantom Brown कलर मध्ये उपलब्ध आहे.

Samsung Galaxy S21 ची वैशिष्ट्ये

Samsung Galaxy S21

Galaxy S21 हा One UI सह Android 11 वर कार्यरत आहे आणि त्यामध्ये 20:9 aspect ratio व 421 PPI pixel density सह 6.2-इंचाचा Flat full-HD+ (1,080×2,400 pixels) Dynamic AMOLED 2X Infinity-O Display आहे. 

Galaxy S21 मध्ये ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअप आहे, त्या सेटअपमध्ये खालील कॅमेरा उपलब्ध आहेत

  1. 12-मेगापिक्सलचा सेन्सर उपलब्ध आहे, ज्यामध्ये 120 डिग्री field-of-view (FoV) सह F/2.2 लेन्स असणारा ultra-wide-angle आहे.
  2. 12-मेगापिक्सल F/1.8 लेन्ससह Primary Dual Pixel Sensor आहे जो Autofocus ला सपोर्ट करतो. 
  3. 64-मेगापिक्सलचा सेन्सर आहे ज्यामध्ये Phase Detection Autofocus, Hybrid Optic 3x zoom आणि FoV of 76 degrees सह an f/2.0 lens उपलब्ध आहे. 
  4. यात सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी फ्रंटमध्ये 10-मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर देखील आहे.  

Galaxy S21 वर एक अपग्रेड केलेला कॅमेरा app आहे, जो 8K Snap, Director’s View, Super Steady Video, आणि Single Take अशा वैशिष्ट्यांसह Galaxy S21 ला अधिक सक्षम बनवतो. कनेक्टिव्हिटी बाबत बोलायचे झाले तर या फोनमध्ये 5G (NSA and SA both), 4G LTE, Wi-Fi, Bluetooth, GPS/ A-GPS, NFC, and USB Type-C port (with DisplayPort support) हे कनेक्टिव्हिटी पर्याय समाविष्ट आहेत.

Galaxy S21 मध्ये 4,000mAh ची बॅटरी आहे जी  USB PD 3.0 फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

यामध्ये 10W चे फास्ट वायरलेस चार्जिंग आहे व तसेच रिव्हर्स वायरलेस चार्जिंगसाठी Wireless PowerShare देखील आहे. 

Galaxy S21+ ची वैशिष्ट्ये

Samsung Galaxy S21

Galaxy S21+ हा Android 11 वर आधारीत One UI वर चालतो आणि त्यामध्ये 20:9 aspect ratio आणि 394 PPI pixel density सह 6.7-इंचाचा Flat full-HD+ (1,080×2,400 pixels) Dynamic AMOLED 2X Infinity-O Display उपलब्ध आहे.

S21+ च्या ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये खालील कॅमेरा उपलब्ध आहेत.

  1. f/1.8 लेन्स सह 12 मेगापिक्सलचा Dual Pixel primary sensor कॅमेरा
  2. 12 मेगापिक्सलचा Ultra-वाइड शूटर कॅमेरा
  3. 64 मेगापिक्सलचा टेलीफोटो शूटर कॅमेरा
  4. 10 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा 

Galaxy S21+ कॅमेराची वैशिष्ट्ये हि Galaxy S21 च्या कॅमेरा वैशिष्ट्यांसारखी आहेत. 

कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth, GPS/ A-GPS, NFC, आणि USB Type-C port चा समावेश आहे.

Galaxy S21+ मध्ये 4,800mAh ची बॅटरी आहे जी fast wired आणि wireless charging ला सपोर्ट करते. 

Galaxy S21 Ultra ची वैशिष्ट्ये

Samsung Galaxy S21 ultra

या सिरीजमधील इतर दोन मॉडेल्सप्रमाणे, S21 Ultra देखील One UI सह Android 11 वर चालतो. 

S Pen सपोर्ट मिळवण्यासाठी या फोनच्या डिस्प्लेमध्ये Wacom’s technology वापरली गेली आहे.

यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये खालील कॅमेरा उपलब्ध आहेत.

  1. f/1.8 लेन्स आणि OIS सपोर्टसह 108-मेगापिक्सलचा सेन्सर कॅमेरा
  2. f/2.2 लेन्ससह 12-मेगापिक्सलचा ड्युअल पिक्सेल सेन्सर कॅमेरा
  3. f/2.4 टेलीफोटो लेन्स आणि OIS सपोर्टसह 10-मेगापिक्सलचा सेन्सर कॅमेरा
  4. f/4.9 टेलिफोटो लेन्स आणि OIS सपोर्ट असणारा आणखी एक 10-मेगापिक्सलचा सेन्सर कॅमेरा

पूर्वीचे टेलिफोटो लेन्स हे 3x ऑप्टिकल झूमला सपोर्ट करतात, तर नंतरचे लेन्स हे 10x ऑप्टिकल  झूमला सपोर्ट करतात. 

अधिक चांगल्या निकालांसाठी laser ऑटोफोकस सेन्सर देखील आहे. पुढे, हा कॅमेरा 100X स्पेस झूमला सुद्धा सपोर्ट करतो.

सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी, Samsung Galaxy S21 Ultra मध्ये समोरच्या बाजूला f/2.2 लेन्ससह 40 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर आहे.

कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6E, Bluetooth, GPS/ A-GPS, NFC, आणि USB Type-C port चा समावेश आहे व तसेच UWB पर्याय देखील उपलब्ध आहे. Galaxy S21 Ultra मध्ये 5000mAh बॅटरी आहे जी fast wired आणि wireless चार्जिंगसाठी USB PD 3.0 आणि Wireless Charging 2.0 ला सपोर्ट करते. 

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

1. OnePlus Band Review in Marathi

2Samsung ने लाँच केला नवीन बजेट फोन । Samsung Galaxy M02s

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद ! 

Leave a Comment