पेट्रोल-डिझेलपेक्षाही स्वस्त Electric Car। Sony चे ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री मध्ये पदार्पण

sony car

Sony, एक जपानी इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करणारी कंपनी जी एके काळी लॅपटॉप, टॅब आणि मोबाइल फोन तयार करत होती आणि नवंनवीन इलेक्ट्रॉनिक उत्पादन तयार करण्या करिता जगभरातील एक नामांकित ब्रँड होता.  तीच सोनी कंपनी आता ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री मध्ये पदार्पण करत आहे. 

Sony कंपनी घेऊन येत आहे पहिली इलेक्ट्रिकल Car. Consumer Electronic Show 2020 मध्ये  सोनी ने व्हिजन- एस (Vision-S) असे नाव असलेलेली इलेक्ट्रिकल कन्सेप्ट कार (Electrical Concept Car) लाँच केली होती.

आता 2021 येता येता ती संकल्पना वास्तविकतेच्या अगदी जवळ आलेली आहे. 

Sony कंपनीने कॅनेडियन ऑटोमोटिव्ह कंपनी मॅग्नाबरोबर  safety Tests करत असताना आणि टोकियोमध्ये Autonomous Driving चाचणीही केली होती.

याचा एक व्हिडिओ Consumer Electroni Show Jan 202१ मध्ये सादर केला आहे. 

ऑटोमोटिव्ह उद्योगासंदर्भात नवीन सेन्सर्स आणि इमेजिंग तंत्रज्ञानाचा समावेश करून इन्फोटेनमेंट (Infotainment) सिस्टम तंत्रज्ञान सोनी घेऊन येत आहे.

सोनी कंपनीने लाँच केलेल्या इलेक्ट्रिकल कार Vision-S ची खास वैशिष्ट्ये (Sony Vision-S Features)

या कारमध्ये जवळपास 33 वेगवेगळ्या प्रकारचे Sensors देण्यात आले आहेत. 

मुख्य म्हणजे यामध्ये इमेज सेंसर (Image Sensors) आणि टाइम ऑफ फ्लाइट सेंसर्स (ToF Sensors) दिले आहे. 

Vision-S कारचे इंटिरियर (Interior) अत्यंत सुबकपणे तयार करण्यात आले आहे. डॅशबोर्ड (Dash Board) वर एक स्क्रीन देण्यात आली आहे. 

तसेच मागच्या सीटवर बसणाऱ्या लोकांसाठी समोरील सीटच्या मागे एक स्क्रिन दिली आहे, यामध्ये ऑनबोर्ड इंटरटेनमेंट सिस्टम फिचर दिले आहे. सोनीने याला “Safety Cocoon Concept” असं नाव दिलं आहे.

या कारमध्ये सोनीची नावाजलेली अशी प्रसिध्द ऑडिओ सिस्टम असणार आहे,  ज्याला कंपनीन्  ‘360 रियॅलिटी ऑडिओ’ (360 Reality Audio) नाव दिलं आहे. कारच्या प्रत्येक सीटमध्ये ही सिस्टम देण्यात आली आहे.

Sony व्हिजन एस (Vision -S) ही सेडान car असून ती 4 सीटची आहे, या कारमध्ये दोन 200 किलोवॅटची इंजिन (Batteries) आहेत आणि ते 0 ते 62 किमीपर्यंत 4.8 सेकंदात जाऊ शकतात, या कारची टॉप स्पीड 149mph (240 kmph) आहे.

समोरच्या सीटवर गाणे प्ले करण्यासाठी पॅनोरमिक स्क्रिन (Panoramic Screen) दिली आहे. येणाऱ्या काळात अशीच सिस्टिम इतर ऑटोमोटिव्ह कंपन्या वापरतील  असा दावा सोनी कंपनीने केला आहे.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी Kenichiro Yoshida म्हणाले की, या मधील नवीन विकसित सेन्सर्समुळे भविष्यात सेल्फ ड्राइविंग कैपेबिलिटीज क्षमतेने कार चालविणे शक्य आहे.

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

  1. Samsung ने लाँच केला 100000 रु. चा galaxy S21 फोन। जाणून घ्या फीचर्स..
  2. OnePlus Band Review in Marathi

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद ! 

Leave a Comment

satta king chart