गंभीर टीकांमुळे WhatsApp ने आपली नवीन Privacy Policy 15 मे पर्यंत लांबणीवर टाकली.

WhatsApp Privacy Policy

WhatsApp ने आपली नवीन Privacy Policy, अजून तीन महिन्यांनंतर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या नवीन policy मुळे करोडो users हे WhatsApp सोडून सिग्नल आणि टेलिग्राम सारख्या प्रतिस्पर्ध्यांकडे जात आहेत. 

Privacy Policy मधील बदल हा मूळतः 8 फेब्रुवारीपासून अंमलात येणार होता, असे फेसबुकच्या मालकीच्या कंपनीने म्हणजेच WhatsApp ने म्हटले आहे.

“आमच्या Updated policy बद्दल किती गैरसमज आहेत हे आम्ही बर्‍याच लोकांकडून ऐकले आहे,

सगळ्यांना चुकीची माहिती मिळाली आहे, ज्यामुळे आम्हाला चिंता करण्याची गरज भासली आहे आणि तुम्हाला प्रत्येकाला आमची तत्त्वे आणि सत्यता समजावुन सांगण्याचा आम्ही येथे प्रयत्न करत आहोत,” 

असे WhatsApp ने त्याच्या कंपनीच्या ब्लॉगमध्ये म्हणले आहे. 

WhatsApp एका साध्या कल्पनेवर आधारित आहे: आपण आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह जे share करता ते आपल्यामध्येच राहते.

याचा अर्थ असा कि, WhatsApp आपल्या वैयक्तिक संभाषणास end-to-end encryption द्वारे संरक्षित करेल जेणेकरून WhatsApp किंवा फेसबुक हे, आपले खाजगी संदेश पाहू शकणार नाहीत.

म्हणूनच whatsapp हे, प्रत्येकाच्या मेसेजिंग किंवा कॉलिंगचा लॉग ठेवत नाही. 

ते आपले share केलेले location देखील पाहू शकत नाही आणि आपले संपर्क फेसबुकसह share करीत नाही.

“या अपडेटमध्ये नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे ज्यामध्ये लोकांना व्हाट्सएपवर व्यवसायाचा संदेश पाठवावा लागतो आणि तसेच त्या update मध्ये WhatsApp डेटा कसा संग्रहित करतो आणि कसा वापरतो याबद्दल अधिक माहिती दिली गेली आहे. 

आज सर्वजण WhatsApp वर व्यवसाय करत नसले तरी, आम्हाला वाटते की भविष्यात बरेच लोक असे करणे निवडतील आणि या सेवांविषयी लोकांनी जागरूक होणे महत्वाचे आहे.

कंपनीने म्हटले आहे की ज्या तारखेला लोकांना अटींचे पुनरावलोकन करण्यास आणि ते मान्य करण्यास सांगितले गेले होते त्या तारखेला जरी तुम्ही ते मान्य केले नहीं तरी 8 फेब्रुवारी रोजी कोणाचेही खाते निलंबित किंवा हटवले जाणार नाही . 

“आम्ही WhatsApp Policy Privacy मध्ये सुरक्षितता कशी कार्य करते याबद्दलची जी चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहचली आहे ती दूर करण्यासाठी आम्ही बरेच काही करणार आहोत. 

15 मे रोजी नवीन business options उपलब्ध होण्यापूर्वी आम्ही हळूहळू लोकांकडे पॉलिसीचे पुनरावलोकन करण्यासाठी जाऊ”. असे whatsapp ने म्हटले आहे.

लोकांमध्ये झालेला गैरसमज दूर करण्यासाठी कंपनीने शुक्रवारी एक स्वतंत्र ब्लॉग जारी केला आणि त्यात एक तक्ता समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये “जेव्हा तुम्ही WhatsApp वापरता तेव्हा तुमची कोणती माहिती संरक्षित केली जाते” याबद्दलची माहिती दिली आहे.

इन्स्टाग्रामचे प्रमुख Adam Mosseri आणि WhatsApp चे प्रमुख Will Cathcart यांच्यासह फेसबुकच्या अधिकाऱ्यांनीही हा गैरसमज दूर करण्यासाठी ट्विटरचा वापर केला.

फेसबुकचा कमकुवत ट्रॅक रेकॉर्ड आणि WhatsApp ने मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय users करिता app वर लक्ष ठेवण्याकडे जे दुर्लक्ष केले आणि या चॅट app वरचा विश्वास संपुष्टात आणला, ज्याचा थेट परिणाम update वर झाला आणि तो सध्या एक जागतिक वाद झाला आहे.

WhatsApp ने म्हटलं आहे की, आता नवीन policy मध्ये होणारे बदल आणि वैयक्तिक चॅट्स, लोकेशन शेअरिंग आणि इतर वैयक्तिक चॅटच्या long-standing privacy practices बद्दल अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधण्यासाठी तीन महिन्यांचा विलंब नंतर नवीन policy update येणार आहे.

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

  1. Amazon Great Republic Day Sale मध्ये मिळणार मोबाईलवर 5000 पर्यंत सूट
  2. Samsung ने लाँच केला 100000 रु. चा galaxy S21 फोन। जाणून घ्या फीचर्स..

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता. आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !

Leave a Comment

satta king chart