Samsung बनली 2020 मधील जगातील सर्वोत्कृष्ट कंपनी ! Google, Apple ला टाकले मागे (Forbes List) !
Forbes ने Market research firm, Statista च्या भागीदारी मध्ये 2020 मधील जगातील सर्वोत्कृष्ट Employers ची वार्षिक यादी जाहीर केली आहे. 58 देशांमधील 160,000 full-time आणि part-time कामगार जे एकाधिक देशांमधील किंवा प्रदेशातील व्यवसायांसाठी काम करतात त्यांची यादी संपूर्ण सर्वेक्षणानंतर ही तयार केली गेली.
जून ते जुलै या कालावधीत Forbes ने सर्वेक्षण केले आणि पुढे दिलेल्या निकषावर सहभागींनी सर्वेक्षणात भाग घेतला.
आपले कुटुंब, मित्रांना पण याबाबतीत सहभाग घेऊन कंपनी (Employer) विषयी मत विचारात घेतले गेले.
‘COVID 19 च्या वेळी कंपनीने राबवलेली सुरक्षा प्रणाली, कंपनीची प्रतिमा (Image), आर्थिक प्रगती (Economic Footprints), प्रतिभा विकास (Skill Development), लैंगिक समानता (Gender Equiality) आणि सामाजिक जबाबदारी (Social Responsibility) यावर निकषा वर स्कोअर करण्यास सांगितले गेले. याच्या आधारे फोर्ब्स’ ने ही यादी जाहीर केली आहे,
या यादीमध्ये 750 MNCs आणि मोठ्या कंपन्या आहेत ज्यांची मुख्यालये 45 देशांमध्ये आहेत. Forbes ने सामायिक केलेल्या यादी नुसार, 2020 मध्ये जगातील पहिल्या 10 Employers त्यांच्या क्रमवारीनुसार खाली दिले आहेत.
अनुक्रमणिका
1. Samsung Electronics
13 जानेवारी 1969 रोजी दक्षिण कोरियाच्या सुवन येथे ही कंपनी स्थापित झाली, सॅमसंग कंपनी ही इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक Peripherals च्या निर्मिती आणि विक्रीमध्ये गुंतलेली आहे.
Consumer इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय विभाग हा केबल टेलिव्हिजन, मॉनिटर, प्रिंटर, air-conditioners, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि medical devices पुरवतो.
2. Amazon
Seattle, WA मध्ये जेफ बेझोस यांनी 1994 मध्ये Amazon ची स्थापना केली. Amazon.com, Inc ऑनलाइन किरकोळ खरेदी सेवांच्या तरतूदीत गुंतलेले आहे.
3. IBM
International Business Machines (IBM) Corp ची स्थापना न्यूयॉर्क येथे Charles Ranlett Flint आणि Thomas J. Watson सीनियर यांनी 1911 मध्ये केली होती. ही Information Technology कंपनी आहे व ती Integrated Solutions Provide करते जी Information Technology व व्यवसाय प्रक्रियेचे ज्ञान देते.
4. Microsoft
मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन हि कंपनी, सॉफ्टवेअर, Services, Devices आणि Solutions च्या विकास आणि समर्थनात गुंतलेली आहे.
कंपनीची स्थापना Paul Gardner Allen आणि William Henry Gates 3rd यांनी 1975 मध्ये केली होती आणि त्याचे मुख्यालय Redmond, WA येथे आहे.
5. LG
ही एक होल्डिंग कंपनी आहे जी सहाय्यक कंपन्यांच्या व्यवस्थापनात गुंतलेली आहे. LG Electronics, LG Chem, LG Uplus, LG CNS, SERVE ONE, LG Siltron, LUSEM, LG Solar Energy, आणि LG Sports या त्यांच्या सहाय्यक कंपन्यांमार्फत चालतात.
6. Apple
Apple, Inc. Steven Paul Jobs, Ronald Gerald Wayne, आणि Stephen G. Wozniak यांनी 1976 मध्ये स्थापना केली. कंपनी smartphones, personal computers, tablets, wearables आणि accessories व तसेच इतर संबंधित services यांच्या डिझाइन, उत्पादन आणि विक्रीमध्ये गुंतलेली आहे.
7. Adobe
Adobe हि कंपनी डिजिटल मार्केटिंग आणि मीडिया सोल्यूशन्सच्या तरतूदीत गुंतलेली आहे. हि Digital Media, Digital Experience, आणि Publishing यांसारख्या विविध विभागांद्वारे कार्य करते.
8. Alphabet
Alphabet, Inc. हि होल्डिंग कंपनी आहे, जी विविध कंपन्यांच्या Acquisition आणि Operation च्या व्यवसायात गुंतलेली आहे. हे Google आणि इतर Bets विभागांद्वारे कार्य करते.
9. Siemens
Siemens कॉर्पोरेशन ही Siemens AG ची एक अमेरिकन सहाय्यक कंपनी आहे, जी Process आणि Manufacturing उद्योगांमध्ये जागतिक वीज निर्मिती आणि वितरण, इमारती आणि वितरित उर्जा प्रणाल्यांसाठी Intelligent Infrastructure सुविधा आणि ऑटोमेशन व डिजिटलकरण या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करते.
10. Bosch
Bosch Group हि Technology आणि Services चा अग्रगण्य जागतिक पुरवठा करणारी कंपनी आहे. हि कंपनी Sensor Technology, Software, आणि Services तसेच आपले स्वतःचे IoT क्लाऊड या क्षेत्रातील ग्राहकांना एकाच Source द्वारे कनेक्टकरून, Cross-domain solutions ऑफर करण्यासाठी आपले कौशल्य वापरते.