Jio देणार 1 gbps इंटरनेट स्पीड

Jio देणार 1 gbps इंटरनेट स्पीड

भारतात मिळणार 1GBPS इंटरनेट स्पीड

Jio आणि Qualcomm ने मिळून 5G  इंटरनेटची यशस्वी चाचणी भारतात केली, आणि चाचण्यांमध्ये  1 GBPS पर्यंत इंटरनेट ब्राउजिंग Speed मिळाला. 

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीच्या जिओ प्लॅटफॉर्मने मंगळवारी सांगितले की, त्यांनी स्थानिक पातळीवर विकसित आणि 5G  पिढीतील Radio Access Network (RAN ) च्या साहाय्याने 5G सोलुशनची चाचणी केली त्यामध्ये १ GBPS  (गिगाबाइट प्रति सेकंद) पेक्षा जास्त गतीने डेटा ट्रान्सफर करण्यात यश आले. 

ओमनच्या यांच्या म्हणण्यानुसार हे उत्पादन अमेरिकेतील एका Top Carrier द्वारे यापूर्वीच चाचणी केलेले आणि प्रमाणित केले गेले आहे. 

क्वालकॉम वेंचर्सने अलीकडेच जिओ प्लॅटफॉर्म मधील 0.15% भागभांडवलासाठी 30730 कोटीची गुंतवणूक केली आहे.

रिलायन्स ने Qualcomm बरोबर टाय उप करून  लोकल तंत्रज्ञानावर आधारित ओपन आणि Interoperable Interface Compliant Architecture-Based 5G मोबाइल इंटरनेट सोलुशन विकसित केले  आहे. 

या यशाने भारत 5G इंटरनेट सर्व्हिस मध्ये एलिएट देशामध्ये सामील झाला आहे. 

जिओ मेक इन इंडिया (Jio Make in India)

क्वालकॉम (Qualcomm) बरोबर ची भागीदारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या वचनबद्धतेवर आधारित आहे,

त्यांनी जुलै महिन्यात जाहीर केले होते की जिओ मेक इन इंडिया 5G तंत्रज्ञान विकसित करत आहे आणि त्यामुळे देशाला डिजिटल अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम होईल. 

सध्या जगातील केवळ काही देशांमध्ये 5G नेटवर्क वापरले जात आहे . यामध्ये अमेरिका, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड आणि जर्मनीचा समावेश आहे. 

भारतात अद्याप 5G साठी सरकारने स्पेक्ट्रमचे वाटप केले नाही. २०२१ मध्ये भारताने 5G  एअरवेव्ह (Airwave) चा लिलाव होणे अपेक्षित आहे

आणि त्याच वर्षी जिओ आपले नेटवर्क तैनात करण्यास तयार असल्याचे अंबानी यांनी म्हटले आहे. 

ते म्हणाले की, जिओ जागतिक स्तरीय 5G सोल्यूशन सहसज्ज आहे. पुढील वर्षी फील्ड उपाय योजना  होऊ शकते आणि  स्पेक्ट्रम उपलब्ध होताच हे 5G उत्पादन चाचण्यांसाठी उपलब्ध होईल.

जिओ प्लॅटफॉर्मवर इतर टेलिकॉम कंपन्यांना सुद्धा  5G ची सर्व्हिस वापरता येईल. 

नवीन स्मार्टफोन ब्रँडसुद्धा भारतात 5G वर आधारित आपली उपकरणे Launch  करीत आहेत.

तथापि, प्रीमियम ते अल्ट्रा-प्रीमियम श्रेणी मधील स्मार्टफोन मध्येचं सध्या  हि सुविधा उपलब्ध असेल. 

रिलायन्स जिओ Google च्या भागीदारीत अँड्रॉइडवर आधारित परवडणारे 4G आणि 5G स्मार्टफोन विकसित करीत आहे, ज्यामुळे शेकडो भारतीयांना स्वस्त स्मार्टफोन मिळू शकेल. 

jioच्या 1 gbps चा भारतातील वापरकर्त्यांसाठी काय उपयोग आहे ?

एकदा भारतात 5G नेटवर्क सुरु  झाल्यावर जिओ वापरकर्त्यांना  1 gbps  वेगाने इंटरनेट ब्राउझ करू शकतील.

टेलिकॉम नियामक ट्रायने दिलेल्या माहितीनुसार, जियो भारतातील सर्वात मोठा मोबाइल ऑपरेटर आहे आणि त्यांचे 40 कोटी ग्राहक आहेत.

आपल्याला ह्या पोस्ट काही नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद ! 

Leave a Comment