Mi Notebook 14 (IC) Laptop With 10th Gen Intel Core Processor भारतात Launch झाला: किंमत, वैशिष्ट्ये

Mi Notebook 14 (IC)

Xiaomi ने भारतात Mi Notebook 14 (IC) हा नवीनतम लॅपटॉप लॉन्च केला आहे. 

मागील वर्षी जूनमध्ये कंपनीने Mi Notebook 14 आणि Mi Notebook 14 Horizon Edition लॅपटॉप series भारतीय बाजारात आणली होती. 

Mi Notebook 14 या series मध्ये add झाला आहे आणि हा 10th gen Intel Core i5-10210U Comet Lake processor आणि integrated 720p HD webcam built-in सह येतो. 

लॅपटॉपमध्ये 46Whr ची बॅटरी आहे जी 10 तासांपर्यंत चालते असा दावा company कडून केला जात आहे.

Mi Notebook 14 Laptopची किंमत, विक्री 

भारतामध्ये ह्या लॅपटॉपची किंमत रु.43,999 आहे. हा लॅपटॉप Mi.com वर सिल्व्हर कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे आणि त्याचसोबत Mi Homes, Amazon.in, Flipkart आणि retail partners वर देखील उपलब्ध असेल. Mi.com मध्ये Axis Bank Card वर 10 टक्के त्वरित सूट देण्यात आली आहे.

वैशिष्ट्ये

Mi Notebook 14 (IC) हा लॅपटॉप Windows 10 Home Edition वर चालतो.

16:9 aspect ratio, 81.2 टक्के screen-to-body ratio, आणि 178-डिग्री wide-viewing angle सह १-इंचाचा full-HD (1,920×1,080 pixels) anti-glare डिस्प्ले उपलब्ध आहे. 

हे Intel UHD Graphics 620 सह पेअर केलेल्या 1.6GHz Intel Core i5-10210U quad-core processor वर चालतो.

त्यामध्ये Nvidia GeForce MX250 graphics integrate करण्याचा पर्याय देखील आहे. 

यामध्ये 8GB रॅम आणि 512GB पर्यंतचा SSD storage आहे.

लॅपटॉपच्या पोर्ट्स मधील दोन USB Type-A पोर्ट, एक USB 2.0 पोर्ट, एक HDMI पोर्ट, एक mic/audio jack combo आणि एक DC jack समाविष्ट आहे.

कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये Bluetooth V5.0, Wi-Fi ac समाविष्ट आहे. 

लॅपटॉप मध्ये 720p webcam उपलब्ध आहे आणि तसेच बोर्डवर दोन 2W स्पीकर्स आहेत. त्याचे वजन 1.5 किलो आहे आणि त्याचे आकारमान 323x228x17.95 मिमी आहे. 

नमूद केल्याप्रमाणे, Mi Notebook 14 (IC) मध्ये 46Whr बॅटरी आहे जी 10 तासांपर्यंत चालू शकते असा दावा केला जातो.

हे 65W fast charger सह येते जे फक्त 35 मिनिटांत 0 ते 50 टक्क्यांपर्यंत charge होते. 

Notebook हा anodised sandblasting च्या प्रक्रियेद्वारे coated aluminium आणि magnesium धातूपासून बनविलेला आहे, त्यामुळे तो मजबूत असेल ह्यात काही शंका नाही. 

जर आपणास हा लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर खालील लिंक वर क्क्लिक करून घेऊ शकता. 

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

  1. Oppo Reno 5 Pro 5G भारतात झाला लॉन्च , Enco X TWS Earbuds सह : किंमत, वैशिष्ट्ये
  2. गंभीर टीकांमुळे WhatsApp ने आपली नवीन Privacy Policy 15 मे पर्यंत लांबणीवर टाकली.
  3. Amazon Great Republic Day Sale मध्ये मिळणार मोबाईलवर 5000 पर्यंत सूट

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता. आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !

Leave a Comment