रRedmi ने लॉन्च केला खास Indians साठी स्वस्त मस्त 5G फोन Mi 10i ! जाणून घ्या फीचर्स…
Redmi ने Mi 10 या फॅमिली मधील 20999 रु. किंमतीचा नवीन फोन लाँच केला.
या आधी Redmi ने 35000 – 45000 रु. या किंमतीमधील Mi 10 आणि Mi 10T लाँच केले होते, पण Redmi भारतीय मोबाईल मार्केटला अनुसरून
जास्तीत जास्त फीचर्स असलेला पण कमी किंमतीमधील Mi 10i हा नवीन स्मार्टफोन लाँच केला.
अश्या या Redmi च्या Mi 10i ची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत याची माहिती घेऊ.
Mi 10 या फॅमिली मधील 108 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 5G काँनेक्टिविटी ही या फोनमधील सर्वात उत्कृष्ट वैशिष्ट्ये आहेत.
Redmi ने असा दावा केला आहे कि ही सिरीज मुख्यतः भारतीयांसाठी design केली आहे.
Mi 10i मधील i म्हणजे INDIA, Redmi चे जगभरात चालणारे Mi 10T Lite आणि Redmi Note 9 Pro 5G या फोनमध्ये किरकोळ बदल करून हा स्मार्टफोन भारतात सादर केला आहे.
Redmi चे असे म्हणणे आहे MI 10 i हा फोन OnePlus Nord, Samsung Galaxy M51 आणि Vivo V20 या सर्वांनां टक्कर देण्यास तयार आहे.
Mi 10i ची वैशिष्ट्ये-
किंमत –
6GB RAM आणि 64GB स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत रु. 20999 आहे.
जर तुम्ही 1000 रुपये जास्त दिले तर तुम्हाला 6GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेला फोन मिळेल.
8GB RAM आणि 128GB स्टोरेजच्या फोनची किंमत रु. 23999 आहे.
डिजाईन –
या फोनची जाडी (Thickness) 9mm आणि वजन 214gm आहे आणि स्क्रीन 6.67(inch) आहे.
हा फोन Atlantic Blue, Midnight Black आणि Pacific Sunrise या तीन प्रकारच्या ग्लॉसी फिनिशमध्ये उपलब्ध आहे.
विशेषतः Pacific Sunrise फिनिश हा क्षितिजावरच्या सूर्योदयाचा रमणीय रंगसंगतीतील डिजाईन मध्ये उपलब्ध आहे.
या फोनच्या उजव्या बाजूला Fingerprint सेन्सर आहे आणि हेडसेट साठी 3.5mm वायर्ड ऑडिओ सॉकेट उपलब्ध आहे.
पाणी आणि धूळ रेजिस्टन्स (प्रतिकार) यासाठी असणारे IP53 रेटिंग असणारा हा फोन आहे.
-स्क्रीन – 6.67-inch full-HD+ (1080×2400) 120Hz HDR10+ LCD डिस्प्ले
-प्रोसेसर – Qualcomm Snapdragon 750G 5G
बॅटरी – 4,820mAh
कनेक्टिविटी- 5G
GPS – या फोनमध्ये भारतीय NavIC positioning ला सपोर्ट करणारे डूअल बँड (Dual Band) GPS सिस्टिम (प्रणाली) उपलब्ध आहे.
ऑपरेटिंग सिस्टिम (OS)- अँड्रॉईड 10 (Android 10)
रिअर कॅमेरा
Mi 10i मध्ये मागील बाजूस ४ कॅमेरे (quad camera setup) आहेत. मेन कॅमेरा हा 108 मेगापिक्सल सॅमसंग एचएम 2 सेन्सर आहे.
दुसरा कॅमेरा हा कायमचा बिनकामाचा 8 मेगापिक्सलचा Ultra-wide angle आहे, ज्याची quality कमी प्रकाशामध्ये खूपच कमी आहे.
त्यांनतर २ २ मेगापिक्सलचे Macro आणि depth सेन्सर आहेत.
फ्रंट कॅमेरा
फोनच्या पुढील बाजूस 16 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमधील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे १०८ मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा.
एकूणच सर्व गोष्टींचा विचार MI 10i हा Value For Money या उक्ती नुसार एक उत्कृष्ट फोन आहे. जर तुम्हाला हा फोन खरेदी करायचा असेल तर खाली लिंक दिली आहे, त्यावर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता.
आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,
2. नवीन Smartphone घेताय ? तर ह्या गोष्टी नक्की तपासून पहा..
आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.
आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.
आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.
वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !