Samsung च्या ह्या फोनमध्येही मिळणार S-Pen चा सपोर्ट

samsung spen support on s21 ultra

Samsung ने Galaxy S21 सीरीजमध्ये Galaxy S21, Galaxy S21+ अणि Galaxy S21 ultra हे नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, Galaxy S21 ultra फोनमध्ये 5G कनेक्टिव्हिटी आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह S-Pen म्हणजे Stylus Pen हे नविन फीचर आहे.

Samsung S-Pen ची 5 मुख्य वैशिष्ट्ये –

1. S-Pen चा एयर एक्शन मोड (Air Action) 

यामध्ये S-Pen रिमोट कंट्रोल सारखे कार्य करते S-Pen मधील वैशिष्ट्य म्हणजे  Samsung Galaxy S21 ultra मध्ये, स्टाईलस पेन (S-Pen) केवळ हवेत हलवून मेनू किंवा कोणत्याही फाईलला मागे व पुढे हलविण्यासाठी वापरला जाऊ शकतो. या वैशिष्ट्यास एयर एक्शन मोड (Air Action) असे नाव देण्यात आले आहे.

2. फोन ला स्पर्श न करता सेल्फी काढ़ने आणि गाणी बदलने शक्य आहे.

ब्लूटूथ (Bluetooth) कनेक्टिव्हिटी (Connectivity) माध्यमातून आपण Galaxy S21 ultra मधील कॅमेरा Operate करू शकतो. 

फोनचा कॅमेरा On करून एस पेन (S-Pen) ने आपण फोटो काढू शकतो, हे वैशिष्ट्य पुढील कॅमेरा आणि मागील कॅमेरा दोन्हीसाठी आहेत. तसेच S Pen ने गाणी सुद्धा बदलता येतात.

3. ए-आर डूडल (AR Doodle)

Galaxy S21 ultra मध्ये S Pen चा उपयोग करून व्हिडिओ Edit करून आपण मजेदार Doodles बनवू शकतो. 

4. S-Pen ने स्मार्ट स्केचेस बनवा 

आपण Galaxy S21 ultra मध्ये कोणत्याही एस पेन (S Pen) चा वापर करून सुंदर असे चित्र काढू शकता. एस पेन (S Pen) चा वापर पेंट ब्रशसारखा करू शकतो.

5. सोपे Slide Presentation

Galaxy S21 ultra ला प्रोजेक्टर किंवा टीव्हीशी जोडून, एस पेन (S Pen) आपल्या हातात धरून संपूर्ण Slide Presentation आपण करू शकता.

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

  1. Samsung ने लाँच केला 100000 रु. चा galaxy S21 फोन। जाणून घ्या फीचर्स..
  2. पेट्रोल-डिझेलपेक्षाही स्वस्त Electric Car। Sony चे ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री मध्ये पदार्पण

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता. आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद ! 

Leave a Comment