Edtech क्षेत्रातील सर्वात मोठी डील! Byju’s ने जवळपास $1अब्ज मध्ये विकत घेतली Aakash Education Services

Edtech क्षेत्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी डील, देशातील सर्वात मूल्यवान ऑनलाइन एज्युकेशन फर्म, Byju’s ने अंदाजे 1 अब्ज डॉलर्सची रोख आणि स्टॉक डील करून (सुमारे $600 दशलक्ष रोख आणि बाकी स्टॉक मध्ये) ब्लॅकस्टोन ग्रुपची आकाश शैक्षणिक सर्व्हिस ( Aakash Education Services) विकत घेतली आहे.

byjus and aakash education

2015 मध्ये snapdeal ने $400 दशलक्ष मध्ये Freecharge खरेदी केले होते आणि तसेच 2014 मध्ये Flipkart ने $330 दशलक्ष मध्ये Myntra खरेदी केले होते. यासर्वांपेक्षा मोठी डील Byju’s ने AESL (Aakash Educational Services) सोबत केली आहे व ही डील इंडियन स्टार्टअप मधील सर्वात मोठी डील आहे.

Byju’s ने आता AESL च्या माध्यमातून ऑफलाइन विभागात पदार्पण केले आहे. डील नंतर ब्लॅकस्टोन ग्रुप आणि एईएसएलचे संस्थापक जेसी चौधरी आणि आकाश चौधरी हे Byju’s चे minority shareholders होतील. तथापि AESL हे स्वतंत्रपणे कार्य करत राहील.

ऑनलाइन शिक्षण माध्यम मध्ये विद्यार्थ्यांना वर्गामध्ये बोलावून फेस-टू-फेस शिकवता येत नाही. AESL मुळे Byju’s आता या मर्यादेवर मात करू शकते.  Non-test prep category मधील विद्यार्थ्यांना ऑफलाइन कोचिंग देता येऊ शकेल, असे विश्लेषकांनी सांगितले.

तसेच, Byju’s चे subscribers, विशेषत: 9-10 वी वर्गात शिकणारे विद्यार्थी AESL च्या Core entrance exam courses ला apply करू शकतात.

एका निवेदनात, Byju’s ने सांगितले की, आकाशचे सध्या 215 पेक्षा अधिक Test Prep Centres उपलब्ध आहेत आणि एकत्रीकरणानंतर, “aakash education च्या विकासाला गती देण्यासाठी byjus त्यामध्ये पुढील गुंतवणूक करेल”.

सध्या Byju चे आंतरराष्ट्रीय बाजारात जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारतासोबत  U.S, UK, Brazil, Indonesia आणि Mexico या देशामध्ये सुद्धा आपली सेवा सुरु करण्याच्या मार्गावर आहेत.

भारतातील 2020 मधील अजून अशाच काही मोठ्या डील : 

इन्फोसिस आणि कॅलिडोस्कोप इनोव्हेशन (Infosys and Kaleidoscope Innovation):

3 सप्टेंबर रोजी ग्लोबल सॉफ्टवेयर कंपनी इन्फोसिसने U.S-आधारित प्रोडक्ट डिझाईन फर्म कॅलिडोस्कोप इनोव्हेशन (product design firm Kaleidoscope Innovation) 42 दशलक्ष डॉलर्समध्ये विकत घेतले आहे.

संपूर्ण अमेरिकेतील वैद्यकीय उपकरणे, ग्राहक आणि औद्योगिक बाजारात इंजिनिअरिंग सर्व्हिस ऑफरिंगचा विस्तार करण्यासाठी इन्फोसिसने हे पाऊल उचलले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि फ्यूचर ग्रुप (Reliance and Future Group):

मुकेश अंबानी-नियंत्रित रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या सहाय्यक कंपनी म्हणजे रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेड (RRVL) ने फ्यूचर समूहाचा Retail व Wholesale व्यवसाय आणि (Logistics) रसद व गोदामसह (Warehouse) संपूर्ण व्यवसाय ₹24,713 कोटीमध्ये विकत घेतला आहे.

ओला आणि इटर्गो बीव्ही (Ola and Etergo BV):

27 मे रोजी ओलाच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड (Ola Electric Mobility Pvt Ltd) या कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी Etergo BV ला खरेदी केले आहे.

या डील नंतर, ओला आता इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात प्रवेश करेल आणि असा अंदाज आहे कि, लवकरच त्यांची स्कूटर मार्केट मध्ये येईल.   

आयटीसी आणि सनराईज फूड्स  (ITC and Sunrise Foods):

23 मे रोजी ITC Limited ने ‘सनरायज फूड्स प्रायव्हेट लिमिटेड’ (SFPL) चे 100% Equity शेअर भांडवल खरेदी केले आहे.

हि कंपनी मुख्यत: ट्रेडमार्क ‘सनराइज’ अंतर्गत मसाल्यांच्या व्यवसायात काम करत आहे.

झोमॅटो आणि उबेर इट्स (Zomato and Uber Eats):

21 जानेवारी रोजी ऑनलाईन फूड डिलिव्हरी आणि रेस्टॉरंट डिस्कवरी प्लॅटफॉर्म झोमॅटो (Online food delivery and restaurant discovery platform Zomato) ने  Uber Eats द्वारे चालविला जाणारा Food Delivery Business जवळपास 350 दशलक्ष डॉलर्स (2,485 कोटी रुपये) मध्ये खरेदी केला आहे.

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

हे हि वाचा –

  1. आता, विमानतळावरून आपल्या घरी सामान मिळवा; IndiGO Door-To-Door बॅगेज ट्रान्सफर सर्व्हिस
  2. Ev Car (Electric Vehicle) म्हणजे काय?
  3. कोरोना घेवून येत आहे दूसरी लाट। सावधान रहा नाही तर

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !

Leave a Comment

satta king chart