तुम्हाला माहिती आहे का तुमच्या लॅपटॉपचे किती तोटे आहेत ते ?

लॅपटॉप (Laptop Pros) चे फायदे

  1. लॅपटॉप (Laptop) चा मुख्य फायदा म्हणजे त्याचा आकार ज्यामुळे आपण तो सहजपणे कोठेही वापरु शकतो. (Laptop pros)

उदा. विमानात, लायब्ररीत, हॉटेल्, क्लासरूम्स आणि बिजनेस मिटींग्समध्ये आणि शाळेमध्ये. 

  1. लॅपटॉप ला डेस्कटॉप संगणकाच्या तुलनेत कमी ऊर्जा (Electricity) लागते.
  2. जिथे इलेक्ट्रिसिटी नाही तिथे सुद्धा आपण लॅपटॉप बॅटरीमुळे वापरू शकतो. 
  3. लॅपटॉप आकाराने लहान असल्यामुळे कुठेही घेऊन जाण्यासाठी आणि वापरासाठी फार कमी जागा लागते.
  4. लॅपटॉपमध्ये इंटर्नल स्पिकर्स असतात, बाहेरचे (External) स्पिकर्स जोडायची गरज लागत नाही. 
  5. लॅपटॉप मध्ये वायफाय (WiFi) आणि ब्लूटूथ (Bluetooth) ची सुविधा असते.
  6. या मध्ये इनबिल्ट वेबकॅम (Webcam) असल्यामुळे बिझनेस मिटींग्स आणि विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणसाठी खूप मदत होते.

लॅपटॉप (Laptop) चे तोटे

  1. लॅपटॉपच्या आकारामुळे चोरी किंवा गहाळ होण्याची शक्यता जास्त आहे.
  2. लॅपटॉप दुरुस्त करने कठिण असते.

सर्व हार्डवेअर (Hardware) पार्टस एकच युनिट म्हणुन कार्य करत असल्यामुळे, जर एखादा पार्ट निकामी झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण लॅपटॉपवर होतो. 

अशा स्थितीत संपूर्ण हार्डवेअर पार्ट नवीनच बसवावा लागतो नाहीतर नवीन लॅपटॉप खरेदी करावा लागतो.

  1. लॅपटॉपची किंमत तुलनेने डेस्कटॉप (Desktop) संगणका (Computer)पेक्षा खूप जास्त असते.
  2. ग्राफिक्स (Graphics Card) कार्ड, ऑडिओ कार्ड (Audio Card) सारखे पार्ट हे मुख्य सर्किट बोर्डला अटॅच केले असल्यामुळे ते दुरुस्त केले जाऊ शकत नाहीत.

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

  1. आपण नविन Laptop विकत घेताय का? तर या १० गोष्टी व्यवस्थित पहा ..
  2. लॅपटॉप म्हणजे नक्की काय?, History of Laptop?, What is the laptop in Marathi? (2021)
  3. तुम्हाला माहिती आहे लॅपटॉप मध्ये कोणते हार्डवेअर असतात?(What hardware does a laptop have?)

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !

Leave a Comment