लॅपटॉप म्हणजे नक्की काय?, लॅपटॉपचा शोध कोणी लावला?, What is the laptop in Marathi? (2021)

लॅपटॉप म्हणजे नक्की काय? What is the laptop in Marathi?

लॅपटॉपचा फुलफॉर्म काय आहे?

LAPTOP– Lightweight Analytical Platform Total Optimized Power

कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे जे लॉकडाऊन झाले त्यामुळे जगभरातील कंपन्या, अनेक संस्था, प्रवासी वाहतूक, शाळा, कॉलेजेस बंद झाले होते त्यावेळी अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम (Work From Home) ही संकल्पना सुरु केली. 

तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा ऑनलाईन शिक्षण सुरु झाले. पण हे सुरु होत असताना अनेक अडचणी आल्या, मोबाईल वरून ऑन लाईन शिक्षण घेणे तितकेसे शक्य नाही हे लक्षात आले. अश्यावेळी सर्वाना लॅपटॉपची गरज जाणवायला लागली. 

अशा या लॅपटॉप (Laptop) ची आपण आज माहिती घेऊ. लॅपटॉप घेताना कोणत्या गोष्टी पाहाव्यात, कोणता लॅपटॉप आपल्यासाठी परफेक्ट आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपणास मिळतील.

लॅपटॉप (Laptop), ज्याला नोटबुक संगणक असे हि म्हणतात, लॅपटॉप पहिल्यांदा 1981 मध्ये लाँच केला गेला. 

लॅपटॉप म्हणजे असा संगणक आहे कि तो ब्रीफकेस पेक्षा लहान असतो ज्याचा उपयोग  सहजपणे विमानात, लायब्ररीमध्ये, कार्यालयात आणि घराच्या बाहेर कोठेही आपण वापर करू शकतो. 

लॅपटॉपचे वजन साधारणत: 2.5 किलो पेक्षा कमी असते आणि जाडी 3 इंच किंवा त्यापेक्षा कमी असते. 

लिनोवो (Lenovo), ऍपल (Apple), कॉम्पॅक (Compaq), डेल (Dell), HP, Redmi आणि तोशिबा (Toshiba) अशा नामांकित कंपन्या लॅपटॉपच्या उत्पादनात अग्रेसर आहेत. 

1990 च्या दशकापासून लॅपटॉप तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होत गेली आणि परिणामी व्यावसायिक (Commercial) आणि वैयक्तिक (Personal) वापरासाठी लॅपटॉप संगणकांची लोकप्रियता सतत वाढत गेली.

त्यानंतर लॅपटॉप विविध मॉडेल्स (Models), आकार (Size), मेमरी (Memory) क्षमता, रॅम (RAM), हार्डडिस्क आणि प्रोसेसर (Processor) स्पीडच्या श्रेणीमध्ये विकसित होत गेले.

लॅपटॉप (Laptop) ची स्क्रीन LED तंत्रज्ञाने युक्त अशी आहे त्यामुळे त्याची जाडी खूपच कमी असते. 

लॅपटॉप मध्ये माउसच्या ऐवजी टचपॅड (Touch Pad) किंवा ट्रॅक बॉल (Track Ball) चा वापर केला आहे. 

आणि त्याचसोबत सिरीयल पोर्ट (Serial Port) मुळे माउस सुद्धा आपण लॅपटॉपला जोडू शकतो. 

लॅपटॉप म्हणजे असे मशीन आहे कि ज्यामध्ये LED स्क्रीन, टचपॅड (Touch Pad), कीबोर्ड (Key Board), प्रोसेसर (Processor), मेमरी (Memory), हार्डडिस्क (Hard Disk) आणि इतर हार्डवेअर एकत्र जोडलेले असतात. 

डेस्कटॉप (Desktop) प्रमाणेच सर्व कॉम्पोनन्ट्स (Components) लॅपटॉप मध्ये असतात अश्या या छोट्या साईझ मुळे कमी ऊर्जा (Electricity) लागते. 

लॅपटॉप (Laptop) मध्ये बिल्ट-इन वाय-फाय (Built in Wi-Fi) Adapters असतात ज्यामुळे आपण वायरलेस रित्या इंटरनेटशी (Internet) कनेक्ट करू शकतो.

लॅपटॉप (Laptop) ला असलेल्या विविध पोर्ट (Port) मुळे एका पेक्षा अधिक इनपुट (Input) आणि आउटपुट (Output) डिव्हाइस कनेक्ट करू शकतो.

समान क्षमता असलेल्या लॅपटॉप (Laptop) ची किंमत सामान्यत: डेस्कटॉप (Desktop) संगणकांपेक्षा जास्त असते कारण त्याचे डिझाइन तयार करणे हे अधिक कठीण आहे.

लॅपटॉपचा इतिहास काय आहे? मराठी निबंध? (History of Laptop?)

आयबीएम (IBM) ने सप्टेंबर 1975 मध्ये आपला पहिला पोर्टेबल संगणक IBM 5100 लॉन्च केला होता. 

या संगणकाचे वजन 55 पौंड होते आणि त्यात 5 इंचाचा सीआरटी (CRT) डिस्प्ले (Display), टेप ड्राइव्ह (Tape Drive), 1.9 मेगाहर्ट्झ प्रोसेसर (Processor) आणि 64KB रॅम (RAM) होती.

पहिला खरा लॅपटॉप आयबीएम (IBM) ने एप्रिल 1981 मध्ये ओसबोर्न I (Osborne I) लाँच केला होता आणि अ‍ॅडम ओसबोर्नने तो विकसित केला होता.

ओसबोर्न I चे वजन सुमारे 11 किलो होते, 5 इंचाची स्क्रीन आणि 64 KB RAM, दोन 5/4″ फ्लॉपी ड्राइव्ह (Flopy Drive), CP/M 2.2 ऑपरेटिंग सिस्टम (Operating  System) आणि त्याची किंमत $1,795 इतकी होती.

त्यानंतर आयबीएम (IBM) च्या पीसीडी (PC Division) ने 1984 मध्ये आयबीएम (IBM) ने पोर्टेबल (Portable) संगणक लाँच केला, ज्याचे वजन सुमारे 13 किलो होते. 

1986 मध्ये आयबीएम पीसीडी ने 5.5 किलो वजनाचा पहिला लॅपटॉप संगणक पीसी कन्व्हर्टेबल (PC Convertible) लॉन्च केला.

1994 मध्ये, आयबीएम ने IBM Thinkpad 775 सीसी, इंटिग्रेटेड सीडी-रॉमसह पहिले नोटबुक (NoteBook) सुरू केले.

सप्टेंबर 1989 मध्ये Apple आपला पहिला मॅकिंटोश पोर्टेबल (Macintosh Portable) लॅपटॉप लॉन्च केला.

आकार आणि किंमत ($ 6500) यामुळे तो फार लोकप्रिय झाला नाही ऑक्टोबर 1991 मध्ये Apple ने लॅपटॉपची पॉवर बुक (Power Book) लाइन लाँच केली. 

त्यांनी PowerBook 100, PowerBook 140, आणि  PowerBook रिलीज केले, त्यामुळे त्यांचा विक्रीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली.

नेटवर्कला Laptop कसे जोडावे?

लॅपटॉपला नेटवर्कशी जोडण्याचे अनेक पर्याय आहेत. 

वायरलेस (Wireless) कनेक्शन किंवा वायफाय (WiFi) हे कनेक्ट करण्याचे सर्वात सोपे साधन आहे. 

लॅपटॉप इथरनेट (Ithernet) पोर्ट वरून लोकल एरिया नेटवर्क (LAN) शी देखील कनेक्ट होऊ शकतात जे संगणकांना इथरनेट केबल द्वारे जोडू शकतात.

ब्लूटूथ (Bluetooth) कनेक्शन हे इतर डिव्हाइस लॅपटॉपशी कनेक्ट करण्याचे आणखी एक साधन आहे. 

जसे की ब्लूटूथ माउस किंवा की-बोर्ड लॅपटॉपला वायरलेस connection द्वारा जोडले जाऊ शकतात. 

लॅपटॉप ब्लूटूथ द्वारे स्मार्टफोनशी देखील कनेक्ट करता येतात तसेच कनेक्शन यूएसबी पोर्ट आणि केबलद्वारे देखील कनेक्ट करता येतात  याला “tethering”  म्हणून ओळखले जाते.

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

  1. आपण नविन Laptop विकत घेताय का? तर या १० गोष्टी व्यवस्थित पहा ..
  2. तुम्हाला माहिती आहे लॅपटॉप मध्ये कोणते हार्डवेअर असतात?(What hardware does a laptop have?)
  3. तुम्हाला माहिती आहे का तुमच्या लॅपटॉपचे किती तोटे आहेत ते ?

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !

Leave a Comment

satta king chart