पेपाल (PayPal) कंपनी भारतात आपला व्यवसाय का बंद करीत आहे ?

Embed from Getty Images

अमेरिकन ऑनलाइन पेमेंट कंपनी पेपाल होल्डिंग्स (Paypal Holdings) ने 1 एप्रिल पासून भारतात स्वदेशी (Domestic) पेमेंट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

कंपनीने ही माहिती शुक्रवार 5 फेब्रुवारी 2021 रोजी दिली. पेपाल कंपनी आता फक्त क्रॉस बॉर्डर पेमेंट व्यवसायावर लक्ष केंद्रित करेल.

जे भारतीय लोक पेपाल अ‍ॅप वापरत असतील त्यांना मोठा धक्का बसला आहे.    

याचा जागतिक पेमेंट गेट-वे वर कोणताही परिणाम होणार नाही. 

जगभरात सुमारे 100 दशलक्ष लोक पेपाल वापरतात आणि कंपनी सध्या 190 देशांमध्ये सेवा बजावत आहे.

PayPal ची स्वदेशी (Domestic) सेवा म्हणजे काय?

पेपाल (PayPal) कंपनी 1 एप्रिल 2021 पासून भारतात कोणतीही स्वदेशी पेमेंट सेवा प्रदान करणार नाही. 

” यामुळे देशांतर्गत व्यवहार करण्यासाठी पेपाल चा वापर भारतीय ग्राहकाना करता येणार नाही. 

पेपाल (PayPal) च्या या निर्णयामुळे काय नुकसान होईल?

PayPal च्या प्रवक्त्याने सांगितले की 1 एप्रिल 2021 पासून भारतीय लोग फक्त  आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी पेपाल वापरू शकतात. 

गतवर्षी पेपाल ने भारतातील 3.6 लाख व्यापाऱ्यांना आंतरराष्ट्रीय विक्रीसाठी $ 1.4 बिलियन उत्पन्न करण्यास मदत केली. 

सध्या, पेपाल (PayPal) अजून ही भारतीय व्यवसायांसाठी आंतरराष्ट्रीय पेमेंट गेट-वे पर्याय ऑफर करत राहील. 

आता 1 एप्रिल पासून पेपाल वापरणारे भारतीय स्वदेशी खरेदीसाठी याचा वापर करू शकणार नाहीत. 

जर आपण भारतात पेपाल वापरत असाल तर 1 एप्रिलपासून हे एप्लीकेशन आपल्या साठी कार्य करणार नाही त्यामुळे आपण आपले पेपाल खाते निष्क्रिय करू शकता. 

पेपाल चे हे पाउल बरोबर आहे का?

अलिकडच्या वर्षांत भारतात मोबाइल ऑनलाईन पेमेंट कंपन्या पेटीएम (PayTM), फोनपे (PhonePe), गूगलपे (GooglePay), अमेझॉन (Amazon) आणि फेसबुक (FaceBook) या सह अनेक दिग्गज कंपन्या भारतातील आपला वाटा वाढवण्यासाठी स्पर्धा करीत आहेत. 

अशा कंपन्यांसाठी भारत जगातील सर्वात मोठा ग्राहक बनला आहे. जेथे 2023 पर्यंत बाजार मूल्य $1 ट्रिलियन (Trillion) असेल.

यामुळे company ला मागील वर्षी खूप नुकसान झाले आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत पेपाल चा हा निर्णय योग्य असेल.

पेपाल (PayPal) म्हणजे काय?

पेपाल (PayPal) एक सर्वात जुनी कंपनी आहे. जी जगभरात ऑनलाइन पेमेंट सेवा प्रदान करते. 

हे आपणास इलेक्ट्रॉनिक सिस्टम द्वारे पेमेंट हस्तांतरित आणि प्राप्त करण्यास मदत करते.

पेपाल द्वारे, कोणताही व्यापारी सुलभ आणि सुरक्षित मार्गाने आंतरराष्ट्रीय व्यवसाय करू शकतो.

जगभरात सुमारे 100 दशलक्ष लोक पेपाल वापरतात आणि कंपनी सध्या 190 देशांमध्ये कार्यरत आहे.

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

  1. Xiaomi चा नवीन फ्रेमलेस Concept Phone: No Buttons, No Ports
  2. Should I Buy A 5G Phone Now?: 5G फोन खरेदी करण्याची हि योग्य वेळ आहे का ?
  3. Xiaomi Mi Air Charge: चालता फिरता सहजपणे आपला स्मार्टफोन चार्ज करा

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !

Leave a Comment

satta king chart