Sony कंपनीने Vaio series मध्ये Vaio E15 आणि Vaio SE14 असे दोन उत्कृष्ट लॅपटॉप बाजारात आणले आहेत.
सोनीने दोन जबरदस्त लॅपटॉप Vaio E15 आणि Vaio SE14 सादर केले आहेत, दोन्ही लॅपटॉप्स उत्कृष्ट लूक आणि उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहेत.
Vaio E15 ची किंमत 66,990 रुपये केले असून त्या मध्ये Sony ने Ink Black आणि Tin Silver कलर चे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
त्याच वेळी, Vaio SE14 ची किंमत 84,690 रुपये असून तो Dark Gray आणि Red Cooper कलर ऑप्शन्स मध्ये उपलब्ध आहे.
सोनीने भारतात बर्याच दिवसानंतर लॅपटॉप लॉन्च केले आहेत आणि लोक त्यांच्या लॅपटॉप ना किती उत्साहाने प्रतिसाद देतात हे पाहू या.
Sony VAIO लॅपटॉप त्यांच्या उत्कृष्ट लूक, ऑडिओ Quality आणि Picture Quality साठी प्रसिद्ध होते.
सोनी Vaio E15 आणि सोनी Vaio SE14 यावर खरे उतरतात, लॅपटॉपचे
प्री-बुकिंग देखील सुरू झाले आहे आणि लवकरच आपण ते फ्लिपकार्टवर खरेदी करू शकाल.
Sony Vaio E15 ची वैशिष्ट्ये
सोनीच्या Vaio E series मध्ये AMD Ryzen 5 किंवा AMD Ryzen 7 प्रोसेसरसह 15.6 इंच full-HD IPS डिस्प्ले आहे.
या लॅपटॉपमध्ये Radeon Vega 8 किंवा Radeon RX Vega 10 ग्राफिक कार्ड आहे आणि 8 जीबी रॅम (GB RAM) आहे त्याची स्टोरेज क्षमता 512 जीबी (GB ) आहे.
या लॅपटॉप च्या उर्वरित वैशिष्ट्यांविषयी सांगायचे तर यात वाय-फाय (Wi-Fi) आणि ब्लूटूथ (Bluetooth) तसेच 2 यूएसबी 3.0 पोर्ट्स, मायक्रो-एचडीएमआय, यूएसबी टाइप-सी (Micro-HDMI, USB Type-C) आणि बॅकलिट (backlit keyboard) कीबोर्ड आणि ड्युअल स्पीकर्सची (Dual Speaker) वैशिष्ट्ये आहेत. या लॅपटॉपचे वजन 1.77 किलो आहे.
अनुक्रमणिका
Sony Vaio SE14 ची वैशिष्ट्ये
Sony Vaio SE14 लॅपटॉप मध्ये 14-इंच-full-HD IPS डिस्प्ले आहे, जो अँटी-ग्लेअर (Anti Glare) कोटिंग सह सुसज्ज आहे.
सोनीच्या या लॅपटॉपमध्ये Intel Core i5 प्रोसेसर असून यामध्ये 8 जीबी रॅम व 512 जीबी स्टोरेज आहे.
या लॅपटॉप मध्ये 4 स्पीकर्स आहेत, वरच्या बाजूस 2 आणि खालच्या बाजूला 2.
सोनीचा असा दावा आहे की, एका चार्जवर हे लॅपटॉप 13 तासांपर्यंत चालू शकतो. Vaio SE15 ची साईझ 324.4×229.6×19.55mm आहे आणि वजन 1.35 Kg आहे.
Dolby Audio आणि Smart Amplifier हि याची खास वैशिष्ट्ये आहेत.
काही वर्षांपूर्वी सोनी VAIO चे भारतात स्वतःचे मार्केट होते आणि ज्यांनी उत्कृष्ट Pictures आणि शक्तिशाली प्रोसेसर असलेल्या Audio आणि Video Quality वर लक्ष केंद्रित करून त्यांनी सोनी VAIO series लॅपटॉपला प्राधान्य दिले होते.
आता पुन्हा लोक सोनी लॅपटॉप खरेदी करण्यास किती उत्साह दाखवितात ते पाहू या, जर आपणास हा लॅपटॉप घ्याचा असेल तर खालील लिंक वरून घेऊ शकता –
आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,
- Mi Notebook 14 (IC) Laptop With 10th Gen Intel Core Processor भारतात Launch झाला: किंमत, वैशिष्ट्ये
- Oppo Reno 5 Pro 5G भारतात झाला लॉन्च , Enco X TWS Earbuds सह : किंमत, वैशिष्ट्ये
- गंभीर टीकांमुळे WhatsApp ने आपली नवीन Privacy Policy 15 मे पर्यंत लांबणीवर टाकली.
- Amazon Great Republic Day Sale मध्ये मिळणार मोबाईलवर 5000 पर्यंत सूट
आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता. आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.
आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.
वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !