क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? आणि त्यामध्ये invest करणे हे कितपत सुरक्षित आहे?(Cryptocurrency)

what is cryptocurrency in marathi bicoin

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय (What is Cryptocurrency?), क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक कशी करायची? (How to invest in Bitcoin?) आणि खरंच डिजिटल करन्सी असते का? (Is digital currency real?)

अश्या प्रकारचे बरेच प्रश्न आपल्याला पडतात आणि त्या संदर्भातील बरेच शब्द सध्या आपण ऐकत आहोत. परंतु आपल्या पैकी खूपजणांना क्रिप्टोकरन्सी किंवा डिजिटल करन्सी म्हणजे काय हे  माहितीच नसते. जर आपण डिजिटल करन्सी बाबत अधिक जाणून घेण्यास इच्छुक असाल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा.

क्रिप्टोकरन्सी हे एक डिजिटल चलन (Digital Currency) आहे, जे वस्तू आणि सेवा (services) खरेदी करण्यासाठी वापरले जाऊ शकते आणि त्याच सोबत सुरक्षित ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी क्रिप्टोग्राफी (Cryptography) सह ऑनलाइन लेझरचा वापर केला जातो. 

या आभासी आणि अनियमित चलनांमध्ये लोकांचा जास्त रस निर्माण होण्यामागे बरीच  कारणे आहेत जसे कि, काहीजण अधिक नफ्यासाठी, तर काहीजण छुपा व्यापार करण्यासाठी आणि काही सट्टेबाजांनी तर क्रिप्टोकरन्सी च्या किमती खुपच उंच आकाशापर्यंत पोचवल्या आणि कधी शून्यापर्यंत हीआणल्या.

क्रिप्टोकरन्सीबद्दल नेहमीच मनात उद्भवणारे काही प्रश्न खालील प्रमाणे- 

अनुक्रमणिका

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? (What is Cryptocurrency or digital currency?)

online shopping using cryptocurrency and bitcoin in marathi

क्रिप्टोकरन्सी हा पेमेंटचा एक प्रकार आहे ज्याचा बदल्यात आपण वस्तू आणि सेवा ऑनलाइन खरेदी करू शकतो. 

अलीकडे बर्‍याच कंपन्यांनी क्रिप्टोकरन्सी ही पेमेंट सुविधा सुरु केली आहे आणि कंपनी अश्या करन्सीचा वापर चांगल्या सेवेसाठी किंवा विशेषत: व्यापारामध्ये करू शकते. 

क्रिप्टोकरन्सी द्वारे वस्तू किंवा सेवांमध्ये आपल्याला व्यवहार करायचा असेल तर आपल्याला वास्तविक चलन हे क्रिप्टोकरन्सी मध्ये विनिमय (Exchange) करणे आवश्यक आहे.

ब्लॉकचेन (Blockchain Technology) नावाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून क्रिप्टोकरन्सीज  काम करतात. ब्लॉकचेन हे विकेंद्रित (No Govt. controlled) तंत्रज्ञान आहे जे बर्‍याच संगणकांवर सर्वत्र पसरले आहे आणि त्याच्या मदतीने प्रत्येक व्यवहार हा व्यवस्थापित (Manage) आणि नोंद (Record) केला जातो. सुरक्षा हा या तंत्रज्ञानाच्या एक महत्वाचा भाग आहे.

किती क्रिप्टोकरन्सीज उपलब्ध आहेत? त्यांचे काय मूल्य आहे? (How many Cryptocurrencies exist?)

best cryptocurrency to invest in marathi

CoinMarketCap.com या मार्केट रिसर्च वेबसाइटनुसार, 6,700 पेक्षा अधिक भिन्न क्रिप्टोकरन्सीज बाजारात उपलब्ध आहेत.

क्रिप्टोकरन्सीज कडून सुरूवातीस पैसे उभे करण्यासाठी व गुंतवणुकीसाठी लोकांना  प्रोत्साहन दिले जाते आणि ICO (Intially Coin Offering) द्वारे पैसे उभे केले जातात. 

CoinMarketCap.com च्या मते 13 एप्रिल 2021 रोजी सर्व क्रिप्टोकरन्सीचे एकूण मूल्य $ 2.2 ट्रिलियन पेक्षा जास्त होते आणि सर्वात लोकप्रिय डिजिटल चलन असलेल्या बिटकोइनचे एकूण मूल्य अंदाजे 1.2 ट्रिलियन डॉलर्स होते.

सर्वोत्कृष्ट क्रिप्टोकरन्सी बाजारातील भांडवलाच्या आधारे(Best cryptocurrencies in the world)

खालील यादीमध्ये 10 सर्वात मोठी ट्रेडिंग क्रिप्टोकरन्सीज आहेत

CryptocurrencyMarket Capitalization
Bitcoin$1.2 trillion
Ethereum$263.4 billion
Binance Coin$87 billion
XRP$81.8 billion
Tether$45.4 billion
Cardano$44.7 billion
Polkadot$39.3 billion
Uniswap$18.8 billion
Litecoin$18.1 billion
Stellar$14.9 billion
(Source- CoinMarketCap)

Cryptocurrencies एवढ्या लोकप्रिय का आहेत (Why Cryptocurrencies are famous)?

क्रिप्टोकरन्सीज लोकप्रिय होण्यामागे प्रत्येकाची वेगवेगळी कारणे आहेत:

  • काही लोक भविष्यकाळातील चलन म्हणून बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सी घ्यायला पाहतात आणि ते बहुधा त्याच्या किंमतीमध्ये आणखी वाढ होण्यापूर्वीच त्याला विकत घेण्याच्या तयारीत असतात.
  • क्रिप्टोकरन्सीज नियंत्रण आणि सुरक्षेसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा (Blockchain Technology) चा उपयोग होतो आणि यासाठी कोणत्याही बँकेचा किंवा केंद्रीय प्रणालीचा वापर होत नाही आणि हा पारंपारिक पेमेंट सिस्टमपेक्षा अधिक सुरक्षित असू शकतो.
  • काही सट्टेबाजांना क्रिप्टोकरन्सीज आवडतात कारण त्याचे मूल्य कायम वाढत असते आणखी एक कारण म्हणजे पारंपारिक चलन दीर्घकालीन स्वीकारण्यामध्ये त्यांना रस नसतो.

क्रिप्टोग्राफी आणि ब्लॉकचैन तंत्रज्ञान म्हणजे काय (What is cryptography and blockchain technology)?

1. क्रिप्टोग्राफी म्हणजे काय आणि ते कसे काम करते? (What is Cryptography? How it works?)

what is cryptography in marathi

क्रिप्टोग्राफी म्हणजे विशिष्ट प्रकाच्या कोडच्या साहाय्याने माहिती (Information) आणि संप्रेषणा (communications) चे संरक्षण करण्याची एक पद्धत आहे, जेणेकरून ज्या लोकांसाठी जी माहिती आहे, केवळ तेच लोक ते वाचू आणि त्यावर प्रक्रिया करू शकतात. 

“क्रिप्ट (crypt)” म्हणजे “लपलेला (hidden)” किंवा “घर (vault)” आणि “ग्राफी (graphy)” म्हणजे “लेखन (writing)”.

2. ब्लॉकचेन म्हणजे काय? (What is Blockchain?)

what is blockchain in marathi

ब्लॉकचेन ही एक माहिती रेकॉर्ड करण्याची प्रणाली आहे ज्यामुळे सिस्टम बदलणे, हॅक करणे किंवा फसवणूक करणे हे अतिशय अवघड किंवा अशक्य होते.

थोडक्यात ब्लॉकचेन तंत्रज्ञानांत प्रत्येक नवीन माहितीसाठी नवीन ब्लॉक्स हे चेनच्या सहाय्याने जोडले जातात म्हणून त्यास ब्लॉकचेन असे म्हणतात.

साखळीतील प्रत्येक ब्लॉकमध्ये बरेच व्यवहार असतात आणि प्रत्येक वेळी ब्लॉकचेनवर नवीन व्यवहार होतो तेव्हा त्या प्रत्येक व्यवहाराची नोंद व्यवहार करणाऱ्यांच्या खात्यात जोडली जाते.

ब्लॉकचेन आणि क्रिप्टोग्राफी ह्या तंज्ञानाच्या मदतीने क्रिप्टोकरन्सी संपूर्णतः सुरक्षित बनवली आहे.

अधिक माहिती साठी तुम्ही आमचा हा लेख वाचू शकता-बिटकॉइनला अधिक सुरक्षित करणारी टेक्नॉलॉजी कोणती? 

क्रिप्टोकरन्सी ही चांगली गुंतवणूक आहे का नाही (is cryptocurrency a good investment in 2021)? 

cryptocurrency is safe in marathi

क्रिप्टोकरन्सीजचे मूल्य खूपच वाढू शकते, परंतु ते कधी कमी होईल हे हि सांगता येत नाही, बरेच गुंतवणूकदार त्यांना वास्तविक गुंतवणूक नव्हे तर केवळ सट्टा प्रमाणे पाहतात.

कारण क्रिप्टोकरन्सीजचे मूल्य एका दिवसामध्ये 30% वर-खाली होऊ शकते.

कारण? वास्तविक चलनांप्रमाणेच, क्रिप्टोकरन्सीज कोणतेही रोख देवाणघेवाण करत नाहीत, म्हणून आपल्या नफ्यासाठी एखाद्याला चलनी किमतीपेक्षा जास्त मूल्य द्यावे लागते. यालाच गुंतवणूकीचा “the greater fool” म्हणजे “सर्वात जास्त मूर्खपणा” सिद्धांत म्हणतात. 

जर त्याची तुलना आपण व्यवस्थापित व्यवसायाशी ( Well-Managed Business) केली तर यामध्ये वेळोवेळी योग्य पावले उचलून आपल्या व्यवसायात नफा आणि ऑपरेशनमधील कॅश फ्लो वाढवून त्याचे मूल्य वाढवले जाते.

नेर्डवॉलेट लेखकांनी असे नमूद केले आहे कि “बिटकॉइनसारखे क्रिप्टोकरन्सी ज्यांना भविष्यातील चलन म्हणून दिसतात त्यांनी हे लक्षात घ्यावे की कोणत्याही चलनात स्थिरतेची आवश्यकता असते.” क्रिप्टोकरन्सी जसे की बिटकॉइन हे सुरक्षित असू शकत नाही आणि गुंतवणूक समाजातील काही दिग्गजांनी  गुंतवणूकदारांना त्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. 

विशेष म्हणजे, दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी बिटकॉइनची तुलना बँक चेकशी केली: “पैशाचे देवाणघेवाण करण्याचा हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे आणि आपण अज्ञातपणे हे सर्व करू शकता. 

चेक हा पैसा पाठविण्याचा एक मार्ग आहे. कारण एखादा चेक हा कधी त्यावरील रकमेएवढा किमतीचा नसतो त्याला किंमत असते कारण ते फक्त पैसे देवाणघेवाण करू शकतात”.

चलनात कायम स्थिरतेची आवश्यकता असते जेणेकरुन व्यापारी आणि ग्राहक वस्तूंसाठी योग्य किंमत काय आहे हे ठरवू शकतात. 

bitcoin price changing in marathi

बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीज त्यांच्या इतिहासात बर्‍याच वेळा अस्थिर राहिल्या आहेत उदाहरणार्थ, बिटकॉइनने डिसेंबर 2017 मध्ये 20,000 डॉलर्सचा व्यापार केला होता, परंतु नंतर त्याचे मूल्य वर्षानंतर $3,200 पर्यंत खाली गेले. पुन्हा डिसेंबर 2020 पर्यंत ते विक्रमी पातळीवर व्यवहार करीत होते.

बिटकॉइनच्या किंमतीतील अस्थिरता एक समस्या निर्माण करते. कारण जर भविष्यात बिटकॉइन्सच्या किंमतीत प्रचंड वाढ होणार असेल तर लोक आज ते खर्च करणारच नाहीत आणि चलन म्हणून त्याचा व्यवहार्य खूपच कमी होईल. 

जर पुढील वर्षी बिटकॉईनचे मूल्य तिप्पट होणार असेल तर लोक आता ते खर्च का करतील?

मी क्रिप्टोकरन्सी कशी खरेदी करू शकतो (How to Buy cryptocurrency)?

बिटकॉईन्स आणि काही क्रिप्टोकरन्सीज हे खरेदीसाठी अमेरिकन डॉलर्समध्ये उपलब्ध आहेत, पण उरलेल्या cryptocurrencies आपण बिटकॉइन किंवा दुसऱ्या क्रिप्टोकरन्सी देऊन घेऊ शकता.

क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यासाठी तुम्हाला एक ‘वॉलेट’ आवश्यक आहे, जे आपल्या चलनाची सुरक्षितरित्या साठवण करून ठेवू शकतात. 

how to buy cryptocurrency in marathi

सामान्यत: आपण एक्सचेंजवर खाते तयार करू शकता आणि नंतर आपण बिटकॉइन किंवा इथरियम सारख्या क्रिप्टोकरन्सीज खरेदी करण्यासाठी वास्तविक पैसे हस्तांतरित (transfer) करू शकता.

कॉईनबेस (Coinbase) हे एक लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग एक्सचेंज अँप आहे जिथे आपण बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सी खरेदी आणि विक्री करू शकता. 

तसेच, ईटोरो (eToro), ट्रेडेस्टेशन (Tradestation) आणि सोफी अ‍ॅक्टिव्ह इन्वेस्टींग (Sofi Active Investing) यासारख्या ऑनलाइन क्रिप्टोकरन्सीज देऊ करणाऱ्या दलाल कंपन्या (Brokers) यांची संख्याही वाढत आहेत. 

रॉबिनहुड (Robinhood) ब्रोकर कंपनी आपल्याला विनामूल्य क्रिप्टोकरन्सीजमध्ये व्यवहार आणि गुंतवणूक करण्याची मुभा देते. (रॉबिनहुड क्रिप्टो बर्‍याच ठिकाणी उपलब्ध आहे, परंतु सर्वच अमेरिकन राज्यांमध्ये उपलब्ध नाही).

भारतामध्ये क्रिप्टोकरन्सी कायदेशीर आहेत काय? (is cryptocurrency legal in India 2021)?

अमेरिकेमध्ये क्रिप्टोकरन्सीज कायदेशीर आहेत, चीनने त्यांच्या वापरावर बंदी घातली आहे  पण इतर राष्ट्रांचा विचार करता तेथील स्थानिक सरकारवर अवलंबून आहे. 

शेवटी ते कायदेशीर आहेत की नाही हे प्रत्येक देशावर अवलंबून आहे, यात काही शंका नाही. 

तसेच, गुंतवणूकदारांनी फसव्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याचा कायम विचार करावा आणि नेहमीप्रमाणे, खरेदीदारांनो सावध रहा.

क्रिप्टोकर्न्सी फसवणूकीपासून मी स्वत: ला कसे संरक्षित करू? (How do I protect myself from cryptocurrency fraud in 2021)?

safety of cryptocurrency in marathi

आपण ICO (Initially Coin Offering) मध्ये एक क्रिप्टोकरन्सी घेण्याचा विचार करत असल्यास माहितीसाठी कंपनीचे माहिती पत्रक(prospectus) वाचा आणि खालील मुद्दे तपासून पहा:

  • कंपनी कोणाच्या मालकीची आहे? एक जाणकार, सुप्रसिद्ध आणि सर्वत्र चांगली ओळख असणारा मालक असणे हे एक सकारात्मक चिन्ह आहे.
  • त्यात गुंतवणूक करणारे इतरही कोणी मोठे गुंतवणूकदार आहेत काय? इतर नामांकित गुंतवणूकदारांना चलनाचा भागीदारीमध्ये हिस्सा हवा असल्यास हे चांगले चिन्ह आहे.
  • आपल्याकडे कंपनीतील हिस्सेदारी आहे किंवा फक्त चलन किंवा टोकन आहे? हा फरक महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही जर टोकन विकत घेतले तर तुम्हाला त्याचा वापर देवाणघेवाणसाठी करता येईल आणि जर तुम्ही कंपनीचे शेअर्स घेतले असतील तर तुम्ही काही प्रमाणात त्यांचा भाग-भांडवलाचे म्हणजे आपण त्याच्या कमाईत हिस्सेदार झालात.
  • निवडणारी क्रिप्टोकरन्सी ही आधीच विकसित झाली आहे किंवा ती कंपनी विकसित करण्यासाठी पैसे गोळा करत आहे? चलन जेवढे जुने तेवढा विश्वास जास्त ठेवू शकतो.

माहितीपत्रका(prospectus) मधून सर्व काही शोधून काढण्यासाठी खुप वेळ लागू शकतो; ज्याच्याकडे जितके अधिक तपशील आहेत तितकेच आपल्या वैधतेची शक्यता अधिक चांगली आहे. 

परंतु अगदी वैधतेचा अर्थ असा नाही की चलन पुढे जाऊन यशस्वी होईल. हा पूर्णपणे एक वेगळा प्रश्न आहे आणि त्याकरिता बरीच माहिती असणे आवश्यक आहे.

परंतु या चिंतेच्या पलीकडे आणखी एक चिंता हॅकर्सची असते, कारण आपली मालमत्ता स्टोर असणाऱ्या संगणक-नेटवर्क हॅक करण्यासाठी हॅकर्स खूप प्रयत्न करतात. 

2014 मध्ये बिटकोइन्स मधील शेकडो कोट्यवधी डॉलर्स हॅकर्सने चोरल्यानंतर एक हाय-प्रोफाइल व्यक्ती दिवाळखोरी घोषित झाली. 

त्यामुळे शेअर बाजारतील प्रमुख स्टॉक आणि फंड गुंतवणूकीमध्ये अश्या प्रकारचे धोके नसतात.

मी क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करावी की नाही (Should I invest in cryptocurrency in 2021)?

क्रिप्टोकरन्सी ही पूर्णपणे एक सट्टा आणि अस्थिर खरेदी आहे. बिटकॉइनसारख्या क्रिप्टोकरन्सीजमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा स्थापित कंपन्यांचे स्टॉक ट्रेडिंग करणे सामान्यत: कमी धोकादायक असते.

क्रिप्टोकरन्सीमधील ऑनलाइन ब्रोकर्स कोणकोण आहेत (Best Broker in Cryptocurrency)?

ब्रोकर्स सुविधा
Coinbase30 पेक्षा अधिक क्रिप्टोकरन्सी खरेदी आणि विक्री.
eToro15 क्रिप्टोकरन्सीज मध्ये प्रवेश असलेले ट्रेडिंग प्लॅटफॉर्म.
Robinhoodबिटकॉइन, बिटकॉइन कॅश आणि ईथरियमसह आणखी 7 क्रिप्टोकरन्सीज.
SoFi Active Investingबिटकॉइन, ईथरियम आणि लिटेकोइन.
TradeStationबिटकॉइन, बिटकॉइन कॅश आणि 5 क्रिप्टोकरन्सी.
Webullबिटकॉइन, बिटकॉइन कॅश, ईथरियम आणि लीटेकोइन.

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

हे हि वाचा –

  1. आपल्यासाठी ऑक्सिजन इतके महत्वाचे का आहे?
  2. मागील वर्षी Apple, Samsung पेक्षा जगात सर्वात जास्त फोन चायनीज का विकले गेले 
  3. Ford-GT फोर्डची अशी कार जी आपण सहजरित्या खरेदी करू शकतच नाही… का ते जाणून घ्या

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !

Leave a Comment