मागील वर्षी Apple, Samsung पेक्षा जगात सर्वात जास्त फोन चायनीज का विकले गेले (Rise of Chinese Smartphones)?

गेल्या काही दशकापासून Apple आणि Samsung हे दोन जागतिक स्मार्टफोन बाजारातील प्रबळ खेळाडू आहेत पण अलिकडच्या वर्षांत चीनी स्मार्टफोन ब्रँड चीनच्या  बाहेर पडून जागतिक बाजारातील एक हिस्सा काबीज केला आहे.(Rise of Chinese smartphones)

Xiaomi, Oppo आणि Vivo कदाचित आपल्या देशातील कंपनी नसतील परंतु हे चिनी स्मार्टफोन ब्रँड शक्तिशाली आणि परवडणारे आहेत आणि जगभरातील युजर्ससाठी ते अधिकाधिक आकर्षक ठरत आहेत.

2020 मध्ये दक्षिण कोरियाच्या Samsung ने 255 दशलक्ष (255 Millions) युनिट्सची विक्री करून जगभरातील स्मार्टफोन शिपमेंट्समध्ये अव्वल स्थान मिळवले.

Global shipment of smartphones in 2020 Rise of Chinese Smartphones

त्याच्या पाठोपाठ Apple ने 205 दशलक्ष (205 Millions) युनिट्स शिप करून दुसर्‍या स्थानी मजल मारली. 

परंतु त्यावर्षी चिनी ब्रॅण्ड्स HuaweiXiaomi आणि Oppo ने त्यांनंतरचे स्थान हस्तगत केले आणि त्यावर्षी प्रत्येकी शंभर दशलक्ष स्मार्टफोन शिप केले. 

चिनी-निर्मित फोन इतके लोकप्रिय होण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे ते टॉप ब्रँडपेक्षा भरपूर मॉडेलमध्ये येतात (लो-मिड-हाय). 

चिनी फोन कंपन्या दर वर्षी फक्त एक किंवा दोन प्रीमियम फ्लॅगशिप मॉडेल रीलिझ करत नाहीत,तर ते जास्तीतजास्त स्वस्त फोन मध्ये प्रिमियम फीचर्स देण्याचे प्रयत्न करतात.  त्यामुळे चिनी फोन प्रीमियम फीचर्स सोबत सवलतीच्या दरात मिळतात म्हणून चायनीज स्मार्टफोनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 

पहिला 5G स्मार्टफोन –

2020 च्या पहिल्या तिमाही मध्ये आपला पहिला 5G स्मार्टफोन Xiaomi ने फक्त 25000+ रुपयामध्ये लाँच केला, त्यांनतर लगेचच वर्षभर Oppo, Vivo आणि  Honor सारख्या इतर चिनी ब्रँडनेही परवडणारे 5G फोन बाजारात आणले.

Xiaomi first 5g phone event Rise of Chinese Smartphones

Apple आणि Samsung ने चायनीज मिड-रेंज 5G फोनची जोरदार विक्री पाहिल्यानंतर त्यांना तोंड देण्यासाठी कमी किंमतीचे फोन बनवण्यास सुरुवात केली परंतु चिनी स्मार्टफोन च्या किमती एवढी किंमत कायम ठेवणे त्यांना खूपच कठीण गेले.

2020 च्या चौथ्या तिमाहीत Apple ने आपला पहिला वहिला 5G iPhone सादर केला आणि 2020 च्या अखेरीस इतर ब्रँड्सच्या मध्य आणि उच्च श्रेणीमध्ये असलेल्या फोन सोबत स्पर्धा करण्यासाठी पहिल्यांदा एकूण चार 5G iPhone  बाजारात आणले.

Apple event of iphone 12

Apple ने 81 दशलक्ष (81 Million) आयफोन, तर Xiaomi, Oppo and Vivo यांनी एकत्रितपणे 100 दशलक्ष (100 million) हून अधिक स्मार्टफोन शिप केले.

चायनिज स्मार्टफोन ब्रँड्सचे गुपित –

चिनी ब्रँड च्या यशस्वी होण्यामागे फक्त उत्तम फोन स्वस्त किमतीमध्ये मिळणे हे एकमात्र कारण नसून प्रत्येक Apple आणि Samsung च्या फ्लॅगशिप फोनला टक्कर देताना त्यांच्या बरोबरीचे किंवा त्यापेक्षा चांगले फीचर्स ग्राहकाला देणे हे हि आहे. 

बाजारातील बड्या ब्रॅण्डप्रमाणे, चिनी ब्रॅण्ड्स दरवर्षी त्यांच्या फ्लॅगशिप मॉडेल्समध्ये नवनवीन कॅमेरे आणि स्क्रीन तंत्रज्ञान सादर करतात परंतु काहीवेळा तर ते या प्रमुख ब्रँड्सच्या पहिलाच  नवीन तंत्रज्ञान सादर करतात.

कॅमेरा तंत्रज्ञानामध्ये तर चिनी कंपन्या खुपच पुढे गेल्या आहेत, मागील वर्षांपासून त्यांनी  फोटोग्राफी मधील मोठ्या Leica, Hasselblad आणि Zeiss अशा ब्रँडसोबत भागीदार करून एक उत्तम फोटोग्राफी अनुभव आणि उत्कृष्ट सेवा विकसित केली आहे.

Oneplus and Hasselblad collab Rise of Chinese Smartphones

स्क्रीनसाठी बहुतेक चाइनीज स्मार्टफोन उच्च रीफ्रेश रेट सह क्लिअर डिस्प्ले तंत्रज्ञान आणि मोठ्या ब्रॅण्ड्स चार्ज करतात त्या पेक्षा कमी किंमतीमध्ये अधिक प्रभावशाली वैशिष्ट्ये आणि उत्कृष्ट डिझाइन असलेले फोन बाजारात घेऊन येत आहेत.

चिनी ब्रॅण्ड्सने कॅमेरा किंवा स्क्रीन तंत्रज्ञानामधील नूतनीकरणासह आता ते फोल्डेबल फोन तयार करण्याच्या मार्गावर आहेत. Oppo ने तर जगातील पहिला रोलेबल स्मार्टफोन Oppo X कन्सेप्ट फोन आणला आहे. (Oppo Rollable Phone) 

oppo-rollable-phone-rise of Chinese smart phone market

2021 हे वर्ष फोल्डेबल फोनसाठी अद्याप संकल्पनेच्या अवस्थेत आहे आणि कदाचित व्यावसायिकरित्या लॉन्च करण्यामध्ये खूप अवधी आहे, परंतु नेक्स्ट-लेव्हल स्मार्टफोन तयार करण्याच्या शर्यतीत चीनी कंपन्या Apple आणि Samsung ला मागे टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत हे त्यांचा संशोधनातूनच स्पष्ट होते.

मागील वर्षी कोरोना काळात Xiaomi ने आपल्या R&D विभागासाठी $1 Billion खर्च केले होते, तसे पाहता Apple आणि Samsung ला तोड देणारे ब्रॅण्ड्स चीन मध्ये तयार होत आहेत.  

Samsung The Market Leader

ग्लोबल मार्केट लीडर Samsung मध्ये आणि चिनी स्मार्टफोन कंपन्यांमध्ये कमी ते मध्यम-श्रेणीचे मॉडेल तयार करण्याच्या दृष्टीने काहीतरी साम्य आहे. 

Samsung Foldable phone

सॅमसंगचे फोल्डेबल हँडसेटवरील संशोधनही जोरात सुरु आहे, स्मार्टफोन बाजारपेठेतील हा सर्वात नवीन ट्रेंड आहे.

पण, जर दुसरी बाजू पाहता हे मागील आर्थिक वर्ष काही चिनी ब्रॅण्ड्स साठी चांगले गेले असे म्हणणे चुकीचे ठरेल. मागील वर्षी आलेल्या कोरोना विषाणूमुळे चीनबद्दल भरपूर राष्ट्रांमध्ये द्वेष निर्माण झाला आहे. 

चायनिज कंपन्यांवर अमेरिकी सरकारने घातलेली बंदी –

त्यातच अमेरिकेने चिनी कंपन्यांवर सुरेक्षेतेबद्दल केलेले आरोप आणि त्यांचावर घातलेले निर्बंध ह्यामुळे काही चिनी कंपन्यांना खूप तोटा सहन करावा लागला.

अमेरिकन व्यवसायांवर चिनी कंपनीबरोबर व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली होती, परिणामी Huawei फोनवर गूगल अ‍ॅप्स वापरण्यास बंदी आहे, त्यामुळे कंपनीच्या सॉफ्टवेअर इकोसिस्टमला मोठा धक्का बसला आहे. सन 2020 मध्ये Huawei च्या चीनबाहेरील स्मार्टफोन विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. 

ZTE and huawei chinese brands banned in us rise of chinese smartphone

ZTE ने उत्तर कोरिया आणि इराणला तंत्रज्ञान निर्यात करून निर्बंधांचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अमेरिकन सप्लायर्सनां दुसर्‍या चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनीसाठी होणाऱ्या निर्यातीवरही बंदी घातली आहे.

पण या अडथळ्यांनाही न जुमानता, इतर चिनी स्मार्टफोन ब्रँड अजूनही लोकप्रिय होत चालले आहेत आणि LG, HTC, SONY, NOKIA आणि MOTOROLA सह काही नामांकित मोबाइल कंपन्या जगभरात आपली चांगली प्रतिमा उठवत आहेत. LG ने नुकताच जाहीर केले की ती मोबाइल फोनच्या व्यवसायातून बाहेर पडत आहे. 

निष्कर्ष (Rise or Down of Chinese Smartphones)

एकंदरीत पाहता हे सर्व चिनी ब्रॅण्ड्स बाजारात वर्चस्व गाजवतील, कारण आत्ताचे Made in China प्रॉडक्ट्स आणि आधीचे चिनी प्रॉडक्ट्स यामध्ये खूपच तफावत आहे. 

हे नवनवीन प्रॉडक्ट्स उच्च तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळ वापरून तयार केले गेलेत त्यामुळे त्याच्या गुणवत्तेवर बोलणे चुकीचे ठरेल. 

कोरोना महामारीमुळे जे जगाचे नुकसान झाले त्यामुळे चीनला बहिष्कार टाकणारी राष्ट्रेच सध्या चीनकडून सर्वात जास्त माल आयात करत आहेत. 

2021 च्या पहिला तिमाहीचे आकडे पाहता चीनने मागील वर्षापेक्षा जास्त निर्यात केली आहे. त्यामुळे चीनची जागा घेण्याचे खूप जणांचे स्वप्न चीनने पूर्णपणे धुळीस मिळवलेले आहे.

तुम्हाला या बद्दल काय वाटते हे कंमेंटमध्ये नक्की कळवा …

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

हे हि वाचा –

  1. Ford-GT फोर्डची अशी कार जी आपण सहजरित्या खरेदी करू शकतच नाही… का ते जाणून घ्या
  2. जाणून घ्या भारताबद्दल अशा काही गोष्टी ज्या कोणाला माहित नाहीत…
  3. Edtech क्षेत्रातील सर्वात मोठी डील! Byju’s ने जवळपास $1अब्ज मध्ये विकत घेतली Aakash Education Services

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !

Leave a Comment