‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद। No Whatsapp

whtasapp no more

जर आपण एखादा जुना (Android किंवा iPhone) वापरत असाल तर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये इथून पुढे WhatsApp चालेल कि नाही याची चिंता करण्याची आवश्यकता आहे.

सन 2020 हे वर्ष जवळजवळ संपत आल्यानंतर असे सांगितले गेले कि फेसबुकच्या मालकीचे मेसेजिंग app म्हणजेच WhatsApp हे काही जुन्या Android आणि iOS स्मार्टफोनला support करणार नाही. 

2021 हे वर्ष जवळ येत असताना, WhatsApp काही जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणार्‍या Android  फोन आणि iPhone ला support करणे समाप्त करत आहे. असे म्हटले जात आहे की WhatsApp, कमीतकमी iOS 9 किंवा Android 4.0.3 ऑपरेटिंग सिस्टमवर चालत असलेल्या स्मार्टफोनवर काम करणे थांबवेल.

व्हॉट्सअ‍ॅपचे सपोर्ट पेज वापरकर्त्यांना सर्व वैशिष्ट्यांचा आनंद घेण्यासाठी त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टमची नवीनतम Version वापरण्यास सांगत आहे आणि तसेच असेही सांगतात की इथून पुढे whatsapp वापरण्यासाठी iPhone वर iOS 9 किंवा त्याहून अधिक नवीन version आवश्यक आहे, तर Android  फोन वर 4.0.3 किंवा त्याहून अधिक नवीन version आवश्यक आहे. 

या जुन्या version च्या ऑपरेटिंग सिस्टमवर सध्या फारसे स्मार्टफोन चालत नसले तरी कोणते स्मार्टफोन WhatsApp चा सपोर्ट गमावतील हे लक्षात घेणे तितकेच महत्वाचे आहे. 

iPhone साठी, iPhone 4 पर्यंतचे सर्व iPhone मॉडेल्स WhatsApp चा सपोर्ट गमावतील. याचा अर्थ असा की जे लोक iPhone 4S, iPhone 5, iPhone 5S, iPhone 6, आणि iPhone 6S वापरत आहेत त्यांना WhatsApp वापरणे सुरू ठेवण्यासाठी त्यांची ऑपरेटिंग सिस्टम iOS 9 ला update करणे आवश्यक आहे.

Android साठी, 4.0.3 पूर्वीच्या Android आवृत्तीवर चालणार्‍या स्मार्टफोनवर WhatsApp कार्य करणे थांबवेल. पण सध्या बरेच फोन 4.0.3 पूर्वीचे Android versions वापरत नाहीत. तथापि, HTC Desire, LG Optimus Black, Motorola Droid Razr, अणि Samsung Galaxy S2 यांसारख्या काही मॉडेल्समध्ये 4.0.3 पूर्वीचे Android versions उपलब्ध आहेत. असे हे बरेच Android स्मार्टफोन 2021 मध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा support गमावू शकतील. 

ज्यांच्या फोनमधील ऑपरेटिंग सिस्टमला update आलेले असेल असे काही वापरकर्ते अद्याप त्यांच्या जुन्या स्मार्टफोनवर WhatsApp वापरणे सुरू ठेवू शकतात. तथापि, इतरांसाठी, पूर्णपणे नवीन स्मार्टफोन विकत घेणे हा एकमेव उपाय असू शकतो.

_______________________________________

नवीन Smartphone घेताय ? तर ह्या गोष्टी नक्की तपासून पहा..

_______________________________________

आपला फोनमध्ये कोणते ऑपरेटिंग सिस्टम आहे हे पाहण्यासाठी, iPhone users ने Settings > General > Information येथे जावे जिथे आपल्याला आपल्या iPhone वरील सॉफ्टवेअर version बद्दल माहिती मिळेल. 

Android  users, त्यांचे स्मार्टफोन कोणत्या Android version वर चालत आहे हे पाहण्यासाठी Settings > About Phone मध्ये  जावे जिथे आपल्याला आपल्या Android फोन वरील Android version बद्दल माहिती मिळेल. 

WhatsApp प्रत्येक वर्षाच्या शेवटी जुन्या iOS आणि Android स्मार्टफोनला support करणे समाप्त करतो. मागील वर्षी, WhatsApp ने iOS  8 किंवा त्याहून अधिक जुन्या version वर चालणारे स्मार्टफोन आणि 2.3.7 किंवा त्याहून जुन्या Android version वर चालणार्‍या Android फोनला support करणे समाप्त केले होते.

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

1.भारतीय कंपनीनें दिली google ला टक्कर । बनविले स्वदेशी File Storage System। Digiboxx

2. नवीन Smartphone घेताय ? तर ह्या गोष्टी नक्की तपासून पहा..

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद ! 

Leave a Comment