जेव्हा लोक स्मार्टफोन खरेदी करतात तेव्हा त्यांच्याकडे भिन्नभिन्न पर्याय असतात. काही लोकांसाठी, नवीन स्मार्टफोन विकत घेताना display ही मुख्य गोष्ट असू शकते.
आपण स्मार्टफोनवर चित्रपट आणि व्हिडिओ पाहतो, खेळ खेळतो, Photography करतो आणि अगदी वाचन सुध्दा करतो. छोट्या डिस्प्लेमध्ये यापैकी कोणतीही गोष्ट सहजपणे पूर्ण केली जाऊ शकत नाही म्हणून मोबाइलसाठी योग्य डिस्प्ले प्रकार निवडणे आवश्यक आहे.
स्मार्टफोनसाठी जर आपण चांगल्या डिस्प्लेच्या शोधात असल्यास येथे वेगवेगळ्या डिस्प्ले प्रकारांची संपूर्ण माहिती दिली आहे.
अनुक्रमणिका
TFT LCD – (Thin Film Transistor technology)
TFT डिस्प्ले हा image ची quality वाढविण्यासाठी TFT technology चा वापर करतो. आधीच्या पिढीच्या LCD डिस्प्लेच्या तुलनेत हा TFT LCD (Thin Film Transistor-Liquid Crystal Display) आपल्याला चांगली Image Quality आणि Higher Resolutions देतो.
2007 मध्ये TFT हे iPhone मध्ये आणि Android फोनमध्ये वापरले जाणारे पहिले तंत्रज्ञान होते.
या स्क्रीनचा दोष हा आहे की, तो बरीच ऊर्जा वापरतो, त्यामुळे बॅटरी लवकर खराब होते आणि थेट प्रकाश किंवा सूर्यप्रकाशासमोर त्याची visibility कमी असते त्यामुळे आपल्याला डिस्प्लेअंधुक दिसतो.
TFT डिस्प्लेची उत्पादन किंमत खूपच कमी आहे आणि बहुतेक ते budget फोनमध्येच आढळते.
IPS-LCD (In-Place Switching)
LCD Display हा TFT LCD Display ची next level आहे. TFT च्या तुलनेत हा डिस्पले उत्कृष्ट quality देतो.
या डिस्पलेचा फायदा असा आहे की, त्यात wider viewing angles आहेत आणि खूप कमी उर्जा वापरतो त्यामुळे बॅटरी खूप जास्त काळ टिकते.
याची Manufacturing किंमत जास्त आहे म्हणून आधी तो जास्त budget स्मार्टफोनमध्ये आढळत नसे, आता बऱ्याच budget फोनमध्ये दिसून येतो.
या डिस्पलेचे high-resolution (640 x 960 pixels) version हे iPhone 4 मध्ये वापरले जाते ज्यास Retina डिस्प्ले असे देखील म्हटले जाते.
Capacitive Touchscreen LCD
Touchscreen डिस्प्ले हा High clarity Display असून त्याच्यावर बाह्य घटकांचा परिणाम होत नाही.
या प्रदर्शनाचा आणखी एक फायदा म्हणजे Easy functioning आणि resistive touchscreen डिस्पलेच्या तुलनेत उत्तम अचूकता आहे.
हा डिस्पले अनेक Android फोनवर तसेच iPhone, iPad, iPod वर उपलब्ध आहे.
OLED Display (Organic Light Emitting Diode)
वरील सर्व डिस्पलेपेक्षा OLED डिस्प्ले तंत्रज्ञान बरेच चांगले आहे कारण त्यात उत्कृष्ट रंग पुनरुत्पादन system आणि quick response time आहे.
OLED डिस्प्ले हा, high brightness सह wider viewing angles प्रदान करतो जे आपल्याला अधिक चांगले View देते.
हे डिस्पले उत्पादन करणे सोपे आहे आणि याचे डिझाइन सुद्धा हलके असते कारण हे प्लास्टिकच्या thin sheets पासून बनलेले आहे.
या डिस्पलेचा आणखी एक फायदा म्हणजे ते LCDs पेक्षा कमी उर्जा वापरतात परंतु त्यांची किंमत LCDs पेक्षा खूपच जास्त आहे.
AMOLED Display (Active-Matrix Organic Light-Emitting Diode)
AMOLED Display हे OLED डिस्पलेची Advanced level आहे आणि त्यात एक Thin Film Transmitter layer आहे जे Image Quality सुधारण्यास मदत करते.
ह्या AMOLED Display मध्ये OLED ची सर्व वैशिष्ट्ये आहेत आणि त्याव्यतिरिक्त, ते डिस्पले Size ला निर्बंध करत नाही.
याची कमतरता अशी आहे की, सूर्यप्रकाशामध्ये त्याची visibility कमी आहे आणि याचे उत्पादन करणे खूपच महाग आहे.
Super AMOLED display technology
Super AMOLED Display तंत्रज्ञान हे AMOLED Display पेक्षा अधिक चांगले आहे कारण ते AMOLED display पेक्षा जास्त प्रतिसाद देणारे आहे
Samsung द्वारे हे तंत्रज्ञान Super AMOLED, HD Super AMOLED, आणि FHD Super AMOLED screens सारख्या AMOLED panels विकसित करण्यासाठी वापरले जाते.
AMOLED Display च्या तुलनेत हे डिस्पले चांगले Pixel control प्रदान करते तसेच ते सूर्यप्रकाशात देखील चांगला view देते .
S-AMOLED display उत्तम viewing angle देते तसेच तो कमी उर्जा देखील वापरतो .
Retina Display
सर्वप्रथम जून 2010 मध्ये हे high-resolution screen तंत्रज्ञान Apple द्वारे iPhone 4 वर सादर केले होते.
Retina Display हा एक सुपर Sharp Display आहे जो अधिक crisp text आणि स्पष्ट pictures प्रदान करतो ज्यामुळे viewing अनुभव चांगला येतो.
Retina display हा higher-quality image प्रदान करतो कारण त्यामध्ये pixel ची घनता जास्त आहे व तसेच त्यामध्ये सुधारीत viewing angle आणि high contrast ratio आहे.
आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,
नवीन Smartphone घेताय ? तर ह्या गोष्टी नक्की तपासून पहा..
आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.
आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.
आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.
वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !