Camera कसा असावा? which phone has the best कॅमेरा in 2021?

which phone has the best camera in 2021?

पूर्वी, स्मार्टफोनमध्ये फक्त एक कॅमेरा  असायचा जो जवळजवळ 3 ते 5 MP होता. हा कॅमेरा फोनच्या मागील बाजूस उपस्थित असायचा आणि केवळ एका mode मध्ये फोटो काढू शकत होता.

स्मार्टफोनच्या Dual कॅमेर्‍यासह मागच्या बाजूला दोन कॅमेरे आहेत. एक प्राथमिक कॅमेरा आहे आणि दुसरा एक Depth sensor कॅमेरा आहे. जो 3D images capture करण्यासाठी वापरला जातो. 

Triple camera फोनच्या मागील बाजूस तीन cameras आहेत आणि Quad camera फोनच्या मागील बाजूस चार कॅमेरे आहे. जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर तुमच्यासाठी Quad camera हा एक उत्तम पर्याय आहे. 

हे cameras काही अशा प्रकारे आहेत.  wide कॅमेरा (सामान्यत: मुख्य कॅमेरा म्हणून ओळखला  जातो), ultra-wide कॅमेरा, telephoto, depth sensor or 3D ToF (Time of Flight ) camera आणि macro कॅमेरा. चला तर मग या कॅमेरांची आणि काही सेल्फी कॅमेराची माहिती पाहू. 

Depth sensor camera or 3D ToF camera 

हा camera दोन गोष्टींचे फोटो घेऊ शकतात जसे कि फोकसमधील ऑब्जेक्ट आणि अस्पष्ट background. मुख्य कॅमेर्‍याद्वारे फोटो घेताना अतिरिक्त “depth” माहिती कॅप्चर करण्यासाठी depth sensor आणि 3D TOF कॅमेर्‍याचा वापर केला जातो. अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर जसे एक DSLR कॅमेरा फोटो काढतो अगदी तसे फोटो ह्या sensor च्या मदतीने आपण काढू शकतो.

Depth sensors हे portrait mode फोटो कॅप्चर करण्यासाठी वापरले जातात आणि ते सामान्यत: स्वस्त फोनमध्ये आढळतात.   

depth sensor camera च्याऐवजी 3D TOF कॅमेरा सुद्धा use केले जातात. हा कॅमेरा portrait mode चे फोटो अधिक अचूकपणे capture करू शकतो आणि हा कॅमेरा depth sensor कॅमेर्‍यापेक्षा जास्त चांगले depth effects देतो. परंतु याची किंमत अधिक असते आणि ते सामान्यत महागड्या फोनमध्ये आढळतात.

Wide Angle or Ultra Wide Angle Camera (मुख्य कॅमेरा)

Wide-angle किंवा Ultra wide-angle कॅमेरा, झूम किंवा झूम न करता Images capture करण्यासाठी वापरला जातो म्हणजे आपण मित्रांच्या ग्रुपचा फोटो घेत असल्यास, त्या सर्वांना एकाच फ्रेम मध्ये फिट करण्यासाठी आपल्याला खूप मागे जावे लागणार नाही.

सामान्य कॅमेर्‍याच्या तुलनेत आपण आपल्या आसपासचा खूप जास्त भाग आपल्या Wide किंवा Ultra-Wide camera ने कॅप्चर करू शकता. हा कॅमेरा सर्व परिसर एकाच’ फ्रेममध्ये बसविण्यास सक्षम आहे.

एक ultrawideangle लेन्स हे wide-angle लेन्सच्या तुलनेत खूप जास्त angle of view ऑफर करते, जे 90° ते 120° असते.  

Telephoto or Periscope Cam

Telephoto आणि Periscope कॅमेरा झूम-इन शॉट्स capture करण्यासाठी वापरले जातात आणि सामान्यत: Telephoto कॅमेरा 2x ते 3x optical zoom प्रदान करतो, तर periscope कॅमेरा 4x ते 6x optical zoom प्रदान करतो.

काही कंपन्या telephoto किंवा periscope कॅमेरा न वापरता चांगले झूम-इन results provide करण्यासाठी software harness sorting वापरत आहेत.

काही स्मार्टफोनमध्ये अधिक चांगले आणि स्पष्ट झूम प्रदान करण्यासाठी सॉफ्टवेअर आणि telephoto किंवा periscope कॅमेरा दोन्ही समाविष्ट असल्याचे आढळले आहे. त्या संकल्पनेला हायब्रीड झूम असेही म्हणतात.

Macro cam

तुम्ही काही स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस चार पाच कॅमेरे पहिले असतीलच आणि विचारही केला असेल कि एवढे कॅमेरे कश्यासाठी आणि कोणकोणते आहेत ते तर त्यातील एक म्हणजे Macro camera. 

हा कॅमेरा अत्यंत जवळचे (सूक्ष्म) फोटो काढण्यासाठी वापरला जातो म्हणजेच जवळपासच्या लहान लहान वस्तू जसे की फुले, कीटक, डोळे, पाण्याचे थेंब आणि अशाच इतर काही लहान वस्तू.

छोट्या छोट्या गोष्टींची Image Enhance करण्यासाठी Macro camera द्वारे फोटो घेण्यात आले. ज्यामध्ये आपण बर्‍याच सूक्ष्म गोष्टी पाहू शकता जे सामान्यपणे उघड्या डोळ्यांना दिसत नाही.

Front Facing Cam (सेल्फी कॅमेरा)

नवीनतम स्मार्टफोनमध्ये, front camera हा autofocus वैशिष्ट्यासह आला आहे म्हणजेच आपण शूट करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर ते पटकन focus करू शकतात आणि Super Night Selfie आणि दर्जेदार zooming गुणवत्तासुद्धा प्रदान करतात जेणेकरून जेव्हा आपण फोटो क्लिक करण्यासाठी झूम कराल तेव्हा ते एकदम आकर्षक दिसेल.

Vivo V20 मोबाईल मध्ये 8MP ultra-wide selfie camera आहे. यामध्ये वरील सर्व वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत आणि तसेच हा मोबाईल Multi-Style Portrait आणि 4K selfie video सारखे features देखील देत आहे. ज्यामध्ये आपण  slow and fast motion video रेकॉर्ड करू शकता आणि steady face video देखील घेऊ शकता ज्यामुळे तुमचा व्हिडिओ अधिकाधिक स्पष्ट होईल आणि blurryness कमी होईल.

iPhone 11 Pro सारख्या काही स्मार्टफोनमध्ये true depth selfie camera समाविष्ट करण्यात आला आहे, जो natural-looking detail देतो आणि तो नेहमीचे over-sharpened, over-smoothed ‘look देत नाही.

काही selfie cameras मध्ये  advanced  वैशिष्ट्ये आहेत जसे कि  timed burst, timelapse selfie video आणि low-light selfies ज्यामुळे तुमच्या selfies अजून चांगल्या येतात . Mi 10T Pro या सर्व वैशिष्ट्यांसह उपलब्ध आहे. 

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

नवीन Smartphone घेताय ? तर ह्या गोष्टी नक्की तपासून पहा.. 

नेटवर्क कोणते आणि कसे असावे ?

Audio कसा असावा ?

मोबाईल सुरक्षित कसा राहील?

डिस्प्ले मोठा असावा की छोटा ?

बॅटरी किती असावी?

फोनची मेमरी किती असावी?

प्रोसेसर म्हणजे काय?

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद ! 

Leave a Comment

satta king chart