Elon Musk नंतर, हे आहेत जगातील अव्वल श्रीमंत लोक । पहा billionaires list ।

billionaires list

Bloomberg Billionaires Index नुसार Elon Musk ची संपत्ती आता 209 अब्ज डॉलर्स इतकी झाली  आहे.

Tesla चे संस्थापक Elon Musk हे या आठवड्याच्या सुरूवातीला 188.5 अब्ज डॉलर्स सह जेफ बेझोसला मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत, व आता त्यांची एकूण संपत्ती 209 अब्ज डॉलर्स इतकी आहे, असे Bloomberg Billionaires Index नुसार म्हटले आहे.

Bloomberg Billionaires Index हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी तयार करते. 

या यादीत Index नुसार पहिल्या स्थानी असलेल्या Elon Musk सह, जगातील इतर नऊ सर्वोच्च श्रीमंत लोक येथे दिलेले आहेत. चला  तर मग त्यांच्याबद्दल थोडी माहिती घेऊ. 

Jeff Bezos (186 अब्ज डॉलर्स):

इलॉन मस्कने मागे टाकल्यानंतर जगातील दुसर्‍या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती म्हणजेच Amazon या ई-कॉमर्स कंपनीचे सीईओ आणि अध्यक्ष जेफ बेझोस हे आहेत.

Bill Gates (134 अब्ज डॉलर्स):

मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष, बिल गेट्स हे तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात आणि आता त्यांची संपत्ती 134 अब्ज डॉलर्स इतकी आहे. 

बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आहेत. ते आपली पत्नी Melinda समवेत अमेरिकन खासगी Bill & Melinda Gates Foundation चे ही अध्यक्ष आहेत. 

Bernard Arnault (117 अब्ज डॉलर्स):

फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अर्नउल्ट आता 117 अब्ज डॉलर्सची संपत्ती मिळवून जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहे. ते जगातील सर्वात मोठी luxury-goods company – LVMH Moët Hennessy – Louis Vuitton SE चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी आहे.

Mark Zuckerberg (101 अब्ज डॉलर्स):

जगातील सर्वात मोठे tech दिग्गज म्हणून ओळखले जाणारे मार्क झुकरबर्ग हे जगातील पाचवे श्रीमंत व्यक्ती आहेत आणि त्यांची संपत्ती 101 अब्ज डॉलर्स इतकी आहे. ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजेच फेसबुकचे सह-संस्थापक आहेत.

त्यांनी Libra या डिजिटल चलनाला पाठिंबा दर्शविला आहे ज्याला आता Diem म्हणतात. 2014 मध्ये झुकरबर्गने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे कि इन्स्टाग्राम आणि मेसेंजर देखील मिळवले आहेत.

Zhong Shanshan (95.1 अब्ज डॉलर्स):

चीनमधील bottled water चे किंग झोंग शन्शन हे जगातील सहावे श्रीमंत व्यक्ती असून त्यांची संपत्ती 95.1 अब्ज डॉलर्स इतकी आहे. नुकताच त्यांनी मुकेश अंबानी आणि त्यानंतर वॉरेन बफेट यांना मागे टाकले आहे. 

शन्शन यांनी चीनमधील सर्वात मोठी beverage कंपनी Nongfu Spring ची स्थापना केली आणि ते या कंपनीचे अध्यक्षही आहेत.

Warren Buffet (88.7 अब्ज डॉलर्स):

अमेरिकन गुंतवणूकदार वॉरेन बफे हे जगातील सातव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. यांची एकूण संपत्ती 88.7 अब्ज डॉलर्स इतकी आहे. ते Berkshire Hathaway चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देखील आहेत.

Larry Page (84.5 अब्ज डॉलर्स): गूगलचा

Larry हे Google चे सह-संस्थापक असून त्यांची आता 84.5 अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती आहे व ते  जगातील आठवे श्रीमंत व्यक्ती आहेत. डिसेंबर 2019 मध्ये, त्यांनी Alphabet चे मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद सोडले व त्या पदाचे अध्यक्ष आता गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई आहेत.

Sergey Brin (81.8 अब्ज डॉलर्स):

गूगलचे दुसरे सह-संस्थापक, Sergey Brin हे  81.8 अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती असलेले जगातील नवव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. डिसेंबर 2019 पर्यंत त्यांनी Alphabet Inc. चे अध्यक्ष म्हणून काम केले.

Larry Ellison (81.2 अब्ज डॉलर्स):

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये लॅरी एलिसन हे दहाव्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 81.2 अब्ज डॉलर्स इतकी आहे आणि ते Oracle Corporation चे सह-संस्थापक आहेत. ते कंपनीचे  executive chairman आणि CTO म्हणूनही काम करतात.

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

1.इंडियन आर्मीने सुरू केले स्वदेशी मेसेजिंग App एसएआय (SAI)

2. Google चे नवीन कडक नियम ( new policy) !

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद ! 

Leave a Comment