लॉक डाऊन संपला, चला गोवा फिरू या- एक नवा अनुभव.. Discover Goa, The Less Travelled

GOA उसळत्या सागरलाटा, नयनरम्य निसर्ग, सुंदर आणि स्वच्छ मंदिरे, , पोर्तुगीझ कालीन चर्चेस, तरुणाई साठी असलेले नाईट लाईफ आणि परदेशी पर्यटक अशीच प्रतिमा समोर येते.

निसर्गसौंदर्या बद्दल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिनाऱ्यां मुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्दल देखील प्रख्यात आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रा स्थळ गोव्यातच आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यात भरपूर जैवविविधता आहे. निसर्गरम्य ठिकाण अशी भारतात गोव्याची ओळख आहे. गोवा हा साहित्य आणि कला याने समृध्द आहे.

गोव्यात प्रामुख्याने उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा असे दोन विभाग आहेत. पणजी (Panjim) ही गोव्याची राजधानी आहे आणि ती उत्तर गोव्या (North Goa) मध्ये वसली आहे. 

मडगांव (Margao) हे पोर्तुगीज शैलीने नटलेलं आणि गोव्याची व्यावसायिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेलं शहर दक्षिण गोव्या मध्ये  (South Goa) वसले आहे. 

वास्को आणि पर्वरी ही सुद्धा दोन मोठी शहरे गोव्यामध्ये आहेत. 

गोव्यामध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत, जसे सुंदर, नारळ-सुपारीच्या बागा, सोनेरी मुलायम रेतीचे पांढरेशुभ्र समुद्रकिनारे, पोर्तुगीजकालीन चर्चेस, प्रसन्न मंदिरे, अभयारण्ये, मांडवी नदीमध्ये असणारे क्रूझ राऊंडिंग, हिरवागार निसर्ग, सुंदर विदेशी ललना, पॅरासेलिंग, बनाना राईड अशा जल क्रीडांचा आनंद आणि खमंग असे मासे, आणि काय हवंय गोव्यामध्ये. 

उत्तर गोव्यातील मुख्य पर्यटन स्थळे (NORTH GOA)

पणजी (Panjim):

पणजी शहर हे मांडवी नदीच्या तीरावर पोर्तुगीजांनी वसवलेली गोव्याची राजधानी आहे. पणजी शहरात जाण्यापूर्वी अटल सेतू (Atal Bridge) आपले स्वागत करतो. अटल सेतु (Atal Setu) वरून मांडवी नदी ओलांडून आपण गोव्यातील राजधानी सुंदर पणजी मध्ये दाखल होतो.आशिया खंडातील सर्वात जास्त चर्चेस पणजी मध्ये असून त्यातील काही चर्च जागतिक वारसा (UNESCO) स्थळा मध्ये समाविष्ट आहेत. 

पणजी मध्ये पाहण्यासारखी काही ठिकाणे पुढील प्रमाणे 

गोवा पुरातत्व संग्रहालय (GOA STATE MUSEUM)

रीस मागोस किल्ला (Reis Magos Fort),  

गोवा सचिवालय 

पणजी चर्च ( The Church of Our Lady of Immaculate Conception)

कॅसिनोज (CASINO GAMING IN PANAJI)

मिरामार बीच (Miramar Beach): 

पणजीपासून सुमारे 3 Km अंतरावर, हा भव्य शहरी समुद्र किनारा अरबी समुद्रात सामील झालेल्या मांडवी नदीच्या अगदी मुखाजवळ आहे. हा राज्यातील सर्वात लोकप्रिय समुद्रकिनारा आहे, त्यामुळे पर्यटक आणि स्थानिक दररोज येथे वालुकामय किनार्‍यावर विश्रांतीसाठी येतात. जीटीडीसी संचलित मिरामार रेसिडेन्सीसह अनेक हॉटेल आहेत.

ओल्ड गोवा (Old Goa)

सेंट बॅसिलिका चर्च (Sent Basilica Church) : (पणजी पासून अंतर 13 km) 

1605 A D. मध्ये बांधलेल्या बॅसिलिका ऑफ बोम जीझस  (Bom Jesus Basilica) चर्च जुन्या गोव्यात आहे. सेंट फ्रान्सिस झेवियरचे अवशेष येथे ठेवले आहेत, यामुळे ते पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. 

जुन्या गोव्यातील अन्य चर्चप्रमाणेच हा चर्च देखील युनेस्कोची जागतिक वारसा स्थळामध्ये (Unesco World Heritage Site) समाविष्ट आहे.

ASI मुझियम (Museum of Christian Art) : (पणजी पासून अंतर 13 km)

सेंट फ्रान्सिसच्या कॉन्व्हेंट आणि असीसी चर्चच्या मागील बाजूस असलेल्या या संग्रहालयामध्ये पोर्तुगीज राजवटीच्या अनेक महत्त्वाच्या आणि सुंदर कलाकृती आहेत. त्यांची संपत्ती आठ गॅलरी मध्ये विभागली गेली आहे. या संग्रहालयात स्टॅम्प, धार्मिक कलाकृती आणि अशा प्रकारच्या इतर खजिन्यांचा संग्रह देखील आहे.

आग्वाद किल्ला (Aguada Fort) : (पणजी पासून अंतर 16 km)

सतराव्या शतकात बांधलेला हा किल्ला मांडवी नदीच्या किनाऱ्याला लागून आहे, हा किल्ला प्रामुख्याने डच आणि मराठ्यापासून संरक्षण व्हावे म्हणून पोर्तुगीजांनी बांधला.

कलंगुट आणि बागा बीच (Calangute & Baga Beach): (पणजी पासून अंतर 14.5 km)

Calangute & Baga Beach

कलंगुट आणि बागा हे दोन्ही बीच शेजारी शेजारी असून एक संपून कधी दुसरा सुरु झाला हेही कळत नाही.

उत्तर गोव्यामधील सर्वात जास्त गर्दी असणारे हे बीच आहेत, या दोन्ही बीचवर परासेलिंग, बनाना राईड अशा जल क्रीडांचा (Water Sports on baga beach) आनंद आपण या बीचवर घेऊ शकतो.

अंजुना बीच (Anjuna Beach): (पणजी पासून अंतर 20 km)

गोव्यातील आणखी एक बीच ज्याने प्रथम गोव्यात प्रसिद्धी मिळविली ती हिप्पी संस्कृतीमुळे होती, सूर्यास्तासाठी प्रसिद्ध असा हा बीच आहे.

अरंबोल बीच (Arambol Beach): (पणजी पासून अंतर 36.1 km)

उत्तर गोव्यामध्ये असलेला शांत आणि विशाल असा सुंदर समुद्र किनारा लाभलेला हा बीच नेहमीच विदेशी पर्यटकांना आकर्षित करून घेतो, या ठिकाणी इतर बीचप्रमाणे गर्दी नसते. 

सायंकाळच्या वेळी पर्यटक वाद्यांच्या गजरात सूर्याला निरोप देतात.

दोना पाउलो बीच (Dona Paula Beach): (पणजी पासून अंतर 7.2 km)

गोव्यामधील प्रमुख बीच पैकी एक असलेला हा बीच पर्यटन हंगामामध्ये गजबजलेला असतो. अनेक उद्योगपती व धनिकांची निवासस्थाने असलेल्या या परिसरात पर्यटकांसाठी अनेक हॉटेल्स व रेस्टॉरंट सुद्धा उपलब्ध आहेत.

वागातोर बीच (Vagator Beach): (पणजी पासून अंतर 18.7km)

जर तुम्ही फोटोग्राफीसाठी बीच शोधत असाल तर तुम्ही नक्कीच या बीचला एकदा भेट द्याला हवी. गोव्यातील फोटोग्राफीसाठी सर्वात सुंदर किनारा असणारा बीच म्हणजे वागातोर बीच. 

वागातोर बीचचा आकार अर्धचंद्र सारखा आहे, हा समुद्रकिनारा चापोरा (Chapora ) नदीच्या काठी कॅसुआ खाडीमध्ये आहे. 

मांडवी नदी क्रूझिंग (Mandovi River Cruzing): 

मांडवी नदी जेथे अरबी समुद्राला मिळते त्या प्रचंड जलसागरात संध्याकाळच्या सूर्य अस्ताला जाण्याच्या वेळी क्रूझिंग (Boat Cruising) मधून, गोवंसंगीत आणि दिव्यांनी नटलेली राजधानी पणजी अनुभवता येते. 

Cruising साठी तिथे खूप Cruise boat उपलब्ध आहेत, त्यामधून आपण मांडवी नदीतुन फेरफटका मारू शकता. 

तिथेच Casino सुद्धा आहेत, त्याचाही आनंद आपण घेऊ शकता.

दक्षिण गोव्यातील मुख्य पर्यटन स्थळे (SOUTH GOA)

पोर्तुगीज शैलीने नटलेले मडगाव (Margao): 

गोव्याची व्यावसायिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे मडगाव हे पोर्तुगीज चर्च आणि पोर्तुगीज शैलीने परीपूर्ण निवासी इमारतींचे एक अनोखा असा खजिनाच आहे. 

हे केवळ त्याच्या उत्कृष्ट व्यापार आणि वाणिज्य सुविधांसाठी व्यापार्‍यांना आकर्षित करतेच, ज्या पर्यटकांना सुंदर वास्तूशिल्पं पाहण्याची आवड आहे त्यांच्यासाठी मडगाव एक सुंदर ठिकाण आहे.   

मंगेशी मंदिर (Mangueshi Temple) : (मडगाव पासून अंतर 25 km)

पणजी पासून २१ कि.मी.अंतरावर मंगेशी गावामध्ये भगवान शंकराचे भव्य मंदिर आहे. ४५० वर्षे जुने असलेले हे मंदिर आस्थेचे एक प्रतिक आहे.

मंदिराच्या परिसरात आल्यानंतर मन:शांती आणि प्रसन्नता अनुभवता येते. मंदिराच्या आवारात असलेली सातमजली उंच अशी दीपमाळ भाविकांचे लक्ष वेधून घेते.

शांतादुर्गा मंदिर (Shanta Durga Mandir) : (मडगाव पासून अंतर :36 km)

पणजी पासून  33 कि.मी. अंतरावर असलेल्या श्री शांतादुर्गा मंदिरात श्री दुर्गा देवीची सुंदर मूर्ती आहे जिने श्री विष्णु आणि श्री शिव यांच्यात शांती [मध्यस्ती] करण्यासाठी आलेल्या श्री जगदंबा देवीचा हा अवतार श्री शांतादुर्गा देवी म्हणून ओळखला जाऊ लागला.

नेव्हल एव्हिएशन मुझियम (Naval Aviation Museum) : (मडगाव पासून अंतर: 27km)

गोव्यात भारतातील एकमेव नेव्हल एव्हिएशन म्युझियम (Naval Aviation Museum)  आहे. हे संग्रहालय संपूर्ण आशिया मध्ये लोकप्रिय आहे. जर तुम्ही गोव्याला जात असाल तर इथे नक्की भेट देऊन जा कारण इथे आपल्याला सात वेगवेगळ्या प्रकारचे विमान, रॉकेट, बॉम्ब, पॅराशूट्स, पायलटचा ड्रेस इत्यादी दुर्मिळ नेव्ही च्या वस्तू आढळतील.

हार्ट शेप तलाव, चिंकोली (Heart Shape Lagoon, Chicolna): (मडगाव पासून अंतर: 29km)

नावाप्रमाणेच  हा तलाव हृदयच्या आकाराचा आहे, आपण त्याला लगून असेही बोलू शकतो. समुद्रकाठच्या खडकांमध्ये सतत कोसळणार्‍या लाटांपासून काही मीटर अंतरावर आहे आणि काही तास शांत राहण्यासाठी, परिपूर्ण शांत निसर्ग एकदातरी अनुभवावा असा आहे.

माजोर्डा बीच (Majorda Beach): (मडगाव पासून अंतर: 11.7 km)

माजोर्डा बीच हा एक सोनेरी मुलायम रेतीचा बीच आहे जो दक्षिण गोव्या मधील एक महत्त्वाचा आणि सुंदर बीच आहे. 

सुंदर सूर्यास्तासाठी हा बीच जगप्रसिद्ध आहे.  पॅरासेलिंग, बनाना राईड अशा जल क्रीडांचा (Beach water sports)आनंद आपण या बीच वर घेऊ शकतो .

कोलवा बीच (Colva Beach): (मडगाव पासून अंतर: 6.5 km)

उत्तर गोव्या तीळ जसा कलंगुट बीच आहे तसा दक्षिण गोव्यातील सर्वात मोठं आणि गाजवलेला बीच म्हणजे कोलवा बीच (Colva Beach)

मडगाव पासून फक्त 6 किमी अंतरावर कोलवा बीच असून त्याच्या निसर्गरम्य  समुद्रकिनारा हा आपल्याला शांतता देणार आहे, या बीच जवळ अनेक रिसोर्ट, हॉटेल्स, बीच शाक्स (Beach shacks), पब, बार आहेत. सूर्यास्ताचे (sunset on Colva beach) दृश्य पाहण्यासाठी या बीच वर गर्दी होते.

ब्रिगांझा हाऊस,चांदोर ( Braganza House, Chandor): (मडगाव पासून अंतर: 8.1 km)

17 व्या शतकात बांधलेले ब्रिगांझा हाऊस (Braganza House) हा एक भव्य पोर्तुगीज राजवाडा आहे. 

ते चांदोर गावाला लागूनच आहे. हे घर ब्रिगांझा कुटुंबाने बांधले होते, 17 व्या शतकातील इटालियन संगमरवरी मजल्यासह सलून, बॉलरूम, जुन्या काळातील झुंबर आणि अलंकृत फर्निचर घराच्या आकर्षणात भर घालतात. 

त्याच्या पश्चिम भागात एक ग्रंथालय आहे, जी गोव्याची पहिली खाजगी लायब्ररी मानली जाते आणि त्याच्या काळातील प्रसिद्ध पत्रकार लुइस डे मेंझीझ ब्रागेंझा यांनी जवळजवळ 5000 पुस्तके संग्रहित केली आहेत .

दूधसागर धबधबा (Dudhsagar Waterfalls) : (मडगाव पासून अंतर: 46.6 km)

गोव्याचा दूधसागर धबधबा एक धबधबा आहे जिथे डोंगराच्या उंच आणि उभ्या कड्या वरुन दुधाळ फेसा सारखे पडणारे पाणी पडते अश्या या धबधब्या ची उंची 310 मीटर आहे.

बेतूल बीच (Betul Beach) : (मडगाव पासून अंतर: 23.1 km)

बेतूल बीच लहान आहे परंतु सुंदर आहे, या भागात कोणतीही मोठी हॉटेल्स नाहीत. परंतु स्थानिकांची घरे भाड्याने मिळणे सोयीचे आहे. 

मोबोर समुद्र काठी दक्षिणेस असलेले गोव्यातील बेतुल बीच हा एक निसर्गरम्य समुद्र किनारा आहे. हा सुंदर समुद्र किनारा साळ नदीच्या डेल्टाजवळ आहे.

बेतूल फोर्ट (Betul Fort): (मडगाव पासून अंतर: 21.2 km)

17 व्या शतकात बेतूल किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार बांधला गेला होता.

अरबी समुद्र आणि साल नदीच्या मिटिंग पॉईंटवर मोक्याच्या जागेवर हा किल्ला बांधला गेला आहे. हा किल्ला नंतर पोर्तुगीझांनी जिंकला आणि त्याचा ताबा घेतला.

बेतूल लाइट हाऊस (Betul Lighthouse) : (मडगाव पासून अंतर: 19 km)

बेतूल किल्ल्यापासून जवळच बेतुल लाइटहाऊस प्रेषितासारखा उज्ज्वलपणे उभा आहे. चमकदार लाल आणि पांढर्‍या पट्ट्यामध्ये रंगविलेल्या हा लँडमार्क दूरवरुन दिसतो. 

हे दीपगृह एका टेकडीवर बांधले गेले आहे आणि त्याच्या कडेला एका बाजूला उंच गवत आणि दुसर्‍या बाजूला किनारा यांनी वेढलेला आहे.

या टेकडी वरून सूर्यास्ताचा सुंदर नजरा दिसतो.  

अगोंदा बीच (Agonda Beach) : (मडगाव पासून अंतर: 39.3km)

हा बीच दक्षिण गोव्यात आहे. तो खूप लांब आणि रुंद समुद्रकिनारा आहे. शहराच्या आवाजापासून दूर आहे त्यामुळे इथे लोकांची गर्दी कमी असते. 

येथे समुद्रकिनारी हॉटेल्स आहेत, जिथे आपण राहू शकतो आणि निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकता.

या किनाऱ्यावरून तुम्ही बोट राईडने कोला बीच  (Cola Beach & Lagoon), हनीमून बीच (Honeymoon Beach), बटरफ्लाय बीच (Butterfly Beach) पाहू शकता आणि तुम्ही स्वतः मासेमारी करू शकता तुम्हीं इच्छुक असाल तर.

पालोलीम बीच (Palolem Beach)  : (मडगाव पासून अंतर: 39.1km)

दक्षिण गोव्या (Sount Goa) मधील कॅनाकोना (canacona) भागात हा बीच आहे. शांत आणि सुरक्षित असणाऱ्या या बीचला अनेक देशी-विदेशी पर्यटक भेट देतात.

येथील ताडा-माडाची उंच आणि गर्द झाडे आपल्याला कोकणची आठवण करून देतात. या बीच वर अनेक शाक्स (shacks) आहेत, ज्यात आपण निवांत वेळ घालवू शकतो.

पोहण्याबरोबरच कयाकिंग (Kayaking), पॅरासेलिंग, बोटिंग, मासेमारी अशा गोष्टी आपण या बीचवर करू शकतो.

कोला बीच आणि लगून (Cola Beach & Lagoon) : (मडगाव पासून अंतर: 37.2km)

गोव्याच्या दक्षिणे (South Goa) कडील निसर्गरम्य शांत असलेला कोला बीच एक परिपूर्ण सुंदर ठिकाण आहे. 

हनिमून कपलसाठी सुंदर डेस्टिनेशन आहे, कोला बीचवर असणारे हे लगून एक निसर्गाचा सुंदर अविष्कार आहे, पण येथे जाणारा रास्ता खुपचं ओबडधोबड आहे. त्यामुळे आपली स्वतःची कार असेल तर जपून चालवावी. 

स्टोन फॉर्मॅशन अगोंदा बीच (Stone Formation Near Agonda Beach) : 

अगोंडा बीचची टेकडी ओलांडून गेले कि अप्रतिम रॉक फॉर्मेशन पाहायला मिळेल, ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे त्यांच्या साठी हे ठिकाण अप्रतिम आहे.

हनीमून बीच  (Honeymoon Beach):  (मडगाव पासून अंतर: 42km)

पालोलेम आणि अगोंडा बीच दरम्यान अनेक डोंगर आहेत. त्यामध्ये एक हनीमून बीच वसलेला आहे जो एक छोटासा समुद्रकिनारा आहे जेथे कोणीही राहत नाही, पण फोटोग्राफटी साठी सुंदर ठिकाण आणि त्याचसोबत unexploded beach म्हणजेच समुद्र किनारा आहे, हा बीच आपण अगोंडा आणि पलोलीम बीच वरून चार्टर बोट मधून जाऊन पाहू शकतो. 

बटरफ्लाय बीच (Butterfly Beach)  : (मडगाव पासून अंतर 37 km)

हा बीच देखील हनीमून बीच सारखाच सुंदर आहे पण बटरफ्लाय बीच पर्यंत पोहोचणे खूप कठीण आहे, बाय रोड जात असाल तर तुम्हाला घनदाट जंगलातून जावे लागते त्यामुळे दुसरा पर्याय आहे बोट, हा बीच आपण अगोंडा बीच आणि पलोलीम वरून समुद्रातून चार्टर (Charter) बोटने जाऊन पाहू शकता.

डीप सी  फिशिंग  (Dip Sea Feshing)  (समुद्रातील मासेमारी):

मासेमारी (Fishing) साठी  नोव्हेंबर – डिसेंबर मध्ये आपण खोल पाण्यामध्ये बिग ग्रॉपर, स्नापर, जायंट ट्रेव्हिल, बररामंडी आणि थ्रेडफिन (हंगामात, परंतु दुर्मिळ) असतात. 

पहाटे सकाळी आणि उशीरा संध्याकाळ ही उत्तम वेळ असल्याचे म्हटले जाते, अगोंडा बीच आणि पलोलीम वरून चार्टर बोट करून मासेमारी साठी जाऊ शकता.

मुख्यतः पर्यटक अगदी मोजक्या स्थळांना भेट देतात, त्यामुळे काहीं मोजक्या पर्यटन स्थळावर प्रचंड गर्दी असते. त्यामुळे आपण  पर्यटनाचा आनंद घेऊ शकत नाही. 

गोव्या मध्ये प्रामुख्याने पर्यटकांचा ओढा उत्तर गोवा परिसरातील स्थळांना असतो. जसे कि ओल्ड गोवा, पणजी, कलंगुट व बागा बीच आणि मंदिरे. पण आपण जर वर दिलेली दक्षिण गोव्यातील स्थळांची यादी बघितली तर आपल्या लक्षांत येईल. कि तीसुद्धा किती समृध्द स्थळें आहेत.

Leave a Comment