भारताबद्दल तश्या अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नाहीत, म्हणून आज आम्ही आपल्यासाठी अशा काही गोष्टी घेऊन आलो आहोत ज्या तुम्हाला भारताबद्दल अजून माहिती करून देतील.(OMG things of India)
अनुक्रमणिका
1. भारताला कोणतीही अधिकृत राष्ट्रीय भाषा नाही.
हे ऐकून आश्यर्यचकित झालात ना, होय भारताला कोणतीही अशी अधिकृत राष्ट्रीय भाषा नाही तथापि, भारतात 23 अधिकृत भाषा आहेत.
मराठी, हिंदी, बंगाली, तेलगू, तामिळ, गुजराती, कन्नड, ओडिया, मल्याळम, संस्कृत, पंजाबी, आसामी, काश्मिरी, उर्दू, सिंधी, कोंकणी, बोडो, डोगरी, नेपाळी, संताली, मैथिली, मेती मुख्यतः या भाषा स्थानिक लोकांद्वारे बोलल्या जातात.
भारतात एकूण 100 पेक्षा जास्त बोलीभाषा बोलल्या जातात.(source)
2. भारतात सर्वात जास्त स्मार्टफोन वापरकर्ते आहेत.
2019 ग्लोबल मोबाइल बाजारच्या अहवालनुसार, 77% मोबाइल वापरकर्त्यांसह भारत सातव्या क्रमांकाचा स्मार्टफोन वापरणारा देश आहे.(source)
3. सर्वांत जास्त शाहकारी लोक असलेला देश
जगभरामधून भारत हा सर्वाधिक शाकाहारी लोक असलेला देश आहे. भारतात अंदाजे 400 दशलक्षाहूनही (40 कोटी) अधिक लोक शाकाहारी आहेत.(source)
4. एकूण सरकारी कर्मचारी
सुमारे 31.19 लाख सरकारी कर्मचारी सध्या भारतात कार्यरत आहेत. यात राज्य सरकारचे कर्मचारी आणि लष्करी कर्मचारी यांचा समावेश नाही.(source)
5. एकूण पासपोर्ट वापरकर्ते
2015 च्या अहवालांनुसार भारतात पासपोर्ट वापरणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे जी एकूण लोकसंख्येच्या 5.5% आहे.(source)
6. भारतामधील लिहिता वाचता येणारी लोकसंख्या
भारताचा साक्षरता दर 77.7% आहे.
केरळ हे देशातील सर्वात साक्षर राज्य म्हणून ओळखले जाते, त्यानंतर दिल्लीचा नंबर लागतो, तर आंध्र प्रदेशात साक्षरतेचे प्रमाण सगळ्यात कमी आहे.(source)
7. भारतात स्वतःची कार असलेले लोक फक्त-
डिसेंबर 2019 मध्ये तयार झालेल्या अहवालानुसार भारतात 1000 लोकांमागे फक्त 30 लोकांकडे स्वतःची कार आहे याचा अर्थ एकूण लोकसंख्येच्या 3% लोकांकडे कार आहे.
भारताची अंदाजे लोकसंख्या 1.3 अब्ज आहे त्यामुळे भारतात एकूण कारची संख्या अंदाजे 3.9 कोटी आहे.(source)
8. बँक खाते असलेले लोक
80% पेक्षा जास्त भारतीयांची आता बँक खाती आहेत.
चालू अणि बचत असे सर्व मिळून जवळपास 157.1 कोटी खातेधारक भारतात आहेत.(source)
9. भारतीय लोकांची महिन्याची सरासरी कमाई Rs 32,800 आहे.
Picodi.com च्या सर्वेक्षणानुसार भारतीय माणूस महिन्याला सरासरी 32,800 रुपये (डॉलर्स 437) कमवतो. याबाबतीत 106 देशांमध्ये भारताचा 72 वा क्रमांक लागतो.(source)
10. अब्जाधीशांची संख्या
सर्वात जास्त अब्जाधीशांच्या देशांमध्ये 140 अब्जाधीशांसह भारताचा तिसरा क्रमांक लागतो. त्याच्यामागोमाग 136 अब्जाधीशांसह जर्मनीचा तर 117 अब्जाधीशांसह रशियाचा नंबर लागतो. (source)
आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,
हे हि वाचा –
- Edtech क्षेत्रातील सर्वात मोठी डील! Byju’s ने जवळपास $1अब्ज मध्ये विकत घेतली Aakash Education Services
- आता, विमानतळावरून आपल्या घरी सामान मिळवा; IndiGO Door-To-Door बॅगेज ट्रान्सफर सर्व्हिस
- Ev Car (Electric Vehicle) म्हणजे काय?
आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.
आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.
आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.
वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !