नियमित व्यायामामुळे गंभीर कोविड आजारा पासून बचाव होण्यास मदत होते का?(COVID EXERCISE)

कोरोना व्हायरस पासून (Covid) बचावासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क लावणे, हात साबणाने स्वच्छ धुणे, वापरात असलेल्या वस्तू नीट Sanitize करून घेणे जितके म्हत्त्वाचं आहे, तितकेच कोरोना व्हायरस पासून होणारी गुंतागुंत टाळण्यासाठी नियमितपणे व्यायाम (Exercise) करणेही तितकेच गरजेचे आहे. 

कॅलिफोर्नियात झालेल्या एका अभ्यासात असे आढळले आहे की, जे लोक नियमितपणे व्यायाम करत नाहीत  त्यांना  कोविड संसर्गामध्ये रुग्णालयात दाखल केले जाणे आणि मृत्यू येण्याची शक्यता जास्त असते. पण जे लोक नियमितपणे व्यायाम करतात त्यांना कोविड संसर्गामध्ये रुग्णालयात दाखल करण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण खूप कमी आहे. 

व्यायामामुळे कोरोना व्हायरस संसर्ग मध्ये हॉस्पिटलायझेशन होण्याचा धोका कमी आहे.

(BMJ Journals) कॅलिफोर्नियात कोविड संसर्ग झालेल्या जवळजवळ 50000 लोकांचा अभ्यासात असे आढळले आहे की आजारी पडण्यापूर्वी जे लोक सर्वात जास्त सक्रिय (व्यायाम करत) होते त्यांना त्यांच्या आजाराच्या परिणामी रुग्णालयात दाखल केले जाणे किंवा त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता कमी होती.

कोविड लस विकसित करण्यापूर्वी डेटा गोळा केला गेला व अभ्यास केला आणि त्यावरून असा तर्क निघाला कीं लसीकरण टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारचा व्यायाम हा पर्याय असू शकत नाही, परंतु जे नियमितपणे व्यायाम करतात – जसे कि पोहणे, चालणे, धावणे किंवा सायकल चालविणे- या प्रकारच्या व्यायामामुळे आपण संसर्ग झाल्यास गंभीर आजारी पडण्याची शक्यता कमी असते.

हे ही वाचा आपल्यासाठी ऑक्सिजन इतके महत्वाचे का आहे?

शास्त्रज्ञांना बऱ्याच काळापासून माहित आहे की एरोबिक-दृष्ट्या फिट लोकांना सर्दी आणि इतर विषाणूजन्य संसर्ग होण्याची शक्यता कमी असते आणि जे लोक नियमितपणे व्यायाम करत नाहीत त्यांच्या तुलनेत जास्त लवकर बरे होतात, कारण व्यायामामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 

चांगले फिटनेस असणे म्हणजे  इन्फ्लूएन्झा आणि इतर आजारांवरील लसी सारखे प्रतिजैविक प्रतिसाद वाढवितात. (Heightens antibody responses ) (Source)

शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, एक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (Acute respiratory distress syndrome- ARDS) हे कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या मृत्यूचं प्रमुख कारण आहे. नियमित पणे व्यायाम हे ARDS वर योग्य असा उपचार आहे.

परंतु नवीन नॉवेल कोरोना व्हायरसचे जे संक्रमण आहे त्यामुळे कोविडने आजारी पडणे व शारीरिक हालचाली आणि तंदुरुस्ती याचा कितपत संबंध आहे अजून कळले नाही, परंतु नुकत्याच झालेल्या काही अभ्यासांमध्ये हे प्रोत्साहन दायक परिणाम आलेले आहेत. एका 

इंटरनॅशनल जर्नल च्या अभ्यासानुसार, वेगाने चालणारे जे लोक आहेत त्यांच्या पेक्षा, हळू चालण्याऱ्या लोकांच्या तुलनेत कोविडला चांगल्या प्रमाणे मात करू शकतात. (Source

running guy covid exercise

ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन मध्ये प्रकाशित झालेल्या नवीन अभ्यासानुसार आणि Kaiser Permanente Southern California, the University of California, San Diego आणि इतर संस्थांमधील संशोधक आणि चिकित्सक असा अभ्यास  करीत आहेत की, कोविड मुळे ज्यांना गेल्या वर्षी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांचा व्यायाम कसा होता, किती होता, कि व्यायाम करत नव्हते याबद्दलच्या माहितीची तुलना करत आहेत.  

 संशोधकांनी 2020 मध्ये कोविड-19 चे निदान झाले नंतर  कैसर आरोग्य सेवा प्रणाली ( Kaiser health care system) वापरली  त्यामध्ये  प्रौढ पुरुष आणि स्त्रियांचा अभ्यास केला गेला. 

या वर्षांत कमीत कमी तीन वेळा त्यांच्या व्यायामाची सवय तपासली गेली. तसेच प्रत्येक व्यक्तीचे वय, धूम्रपान करण्याच्या सवयी, वजन, कर्करोग, मधुमेह, अवयव प्रत्यारोपण, मूत्रपिंडातील समस्या आणि इतर गंभीर आजार कोविड बद्दल जोखीम (Risk) याबाबतीत प्रत्येक व्यक्तीच्या ज्ञात घटकांबद्दल देखील माहिती (Data) गोळा केली.

आणि अभ्यास करताना संशोधकांनी पुरुष आणि स्त्रिया यांच्या व्यायामाच्या निकषानुसार दोन सक्रिय गट तयार केले, एक असा गट जो कमीत कमी व्यायाम करणारा किंवा किमान सक्रिय गट,  दुसरा गट म्हणजे सक्रिय गट जो आठवडयाला कमीत कमी 150 मिनिटे व्यायाम करणारा. 

त्यानंतर संशोधकांनी अभ्यास केलेल्या निकालांची संख्या तपासून पाहिली. कमी-सक्रिय गटातील लोक किंवा ज्यांनी जवळजवळ कधीच व्यायाम केला नाही असे लोक कोविडमुळे अति-सक्रिय गटातील लोकांच्या दुप्पट दराने रुग्णालयात दाखल केले गेले.  

आणि त्यानंतर मृत्यू होण्याची शक्यता सुमारे अडीच पट जास्त होती. जरी काही प्रमाणात सक्रिय गटातील लोकांच्या तुलनेत, त्यांना सुमारे 20 टक्के अधिक वेळा रुग्णालयात दाखल केले गेले आणि मरण्याची शक्यता 30 टक्के जास्त होती.

गंभीर आजाराच्या इतर सामान्य जोखमींपैकी फक्त केवळ वाढलेले वय आणि अवयव प्रत्यारोपणांमुळे कोविड बाधितांना रूग्णालयात दाखल होणे आणि मृत्यूची शक्यता हि कमीत कमी व्यायाम करणाऱ्या पेक्षा जास्त होती, असे वैज्ञानिकांना आढळले.

या नवीन अभ्यासाचे नेतृत्व करणारे Kaiser Permanente Fontana Medical Center चे क्रीडा औषध डॉक्टर डॉ. रॉबर्ट सॅलिस (Dr. Robert Sallis) म्हणतात, “गंभीर आजारासाठी आळशी राहणे हा सर्वात मोठा धोकादायक घटक आहे आणि सदैव व्यायाम करणे हाच उत्तम पर्याय आहे.”

अर्थातच, हा अभ्यास निरीक्षणीय (Observational) असल्याने हे सिद्ध झालेले नाही की व्यायामामुळे कोविडची गंभीर जोखीम कमी होते, परंतु केवळ असेच लोक जे व्यायाम करतात त्यांना गंभीर आजारी पडण्याचे कमी जोखीम (Risk ) असते. 

व्यायामामुळे कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता कमी होते की नाही हे देखील अभ्यासात नमूद केलेले नाही.

या अभ्यासामुळे डॉ. सॅलिस यांनी असे नमूद केले कि, “मला वाटते, या माहितीच्या आधारे, आम्ही लोकांना सांगू शकतो की आठवड्यातून पाच वेळा अर्ध्या तास चालल्यास गंभीर कोविड पासून त्यांचे संरक्षण करण्यास मदत होऊ शकते.”

“मी कधीच असे सुचवू शकत नाही की जो नियमित व्यायाम करतो त्याने लस न घेण्याचा विचार करावा. परंतु जोपर्यंत ते मिळणार नाहीत, तोपर्यंत नियमित व्यायाम ही जोखीम (Risk) कमी करू शकणारी सर्वात महत्वाची गोष्ट आहे. 

आणि नियमित व्यायाम करणे कदाचित कोणत्याही नवीन प्रकारच्या रोगापासून किंवा तेथील पुढील नवीन विषाणूं पासून संरक्षणात्मक असेल.”

नियमित व्यायाम केल्याने आपल्याला माहिती नाहीत असे अनेक फायदे आपल्या आरोग्याला होतात. त्यापैकी एक म्हणजे श्वसनासंबंधी आजारांपासून आपल्याला संरक्षण मिळतं. त्यामुळे नियमित व्यायाम करा आणि धोका टाळा.  

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

हे हि वाचा –

  1. क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? 
  2. आपल्यासाठी ऑक्सिजन इतके महत्वाचे का आहे?
  3. मागील वर्षी Apple, Samsung पेक्षा जगात सर्वात जास्त फोन चायनीज का विकले गेले 

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !

Leave a Comment