Microsoft ने लाँच केला Surface Laptop Go: काय आहेत खास गोष्टी जाणून घ्या

Microsoft Surface Laptop Go

Microsoft Surface Laptop Go भारतात लॉन्च करण्यात आला आहे. 

मायक्रोसॉफ्टच्या सर्फेस लाइनमधील नवीन मॉडेलमधील अनुभव हा वैल्यू-फॉर-मनी असल्याचे सांगितले जाते. 

सरफेस लॅपटॉप गो लॅपटॉप मध्ये 10th-generation Intel Core i5 प्रोसेसर देखील आहे जो 16 जीबी रॅमसह आहे.

सरफेस लॅपटॉप गो मध्ये टच-स्क्रिन डिस्प्ले देखील आहे. 

कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लोकांनी घरामध्ये राहणेच पसंद केले त्यामुळे नोटबुक आणि लॅपटॉप ची मागणी जोरात आहे आणि ह्याच संधीचा पुरेपूर फायदा घेत microsoft ने  भारतीय बाजारपेठेत सरफेस लॅपटॉप गो लाँच केला आहे. 

SurfaceGo Laptop ची भारतातील किंमत, उपलब्धता आणि खासियत 

Microsoft Surface Laptop Go ची बेस कॉन्फिगरेशनसाठीची किंमत Rs. 63,499 ज्यात Intel Core i5 प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज आहे. 

लॅपटॉप Rs. 71,999 मध्ये 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्येही उपलब्ध आहे.

8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेजसाठी Rs. 91,999 आणि टॉप-ऑफ-द-लाइन 16 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज रु. 1,10,999 मोजावे लागतील. 

मायक्रोसॉफ्ट सरफेस लॅपटॉप गो हा प्लॅटिनम कलर ऑप्शनमध्ये येईल आणि 22 जानेवारीपासून व्यावसायिक अधिकृत पुनर्विक्रेते, अधिकृत किरकोळ विक्रेते आणि Amazon आणि Reliance Digital सह ऑनलाइन विक्रेत्यांमार्फत विक्रीसाठी जाईल. 

लॅपटॉप नऊ महिन्यांपर्यंतच्या  no-cost EMI ऑप्शन्ससह उपलब्ध होईल, ज्यासाठी Rs.8,000 प्रति महिना अशी सुरूवात होईल. 

मायक्रोसॉफ्ट सरफेस लॅपटॉप गो स्पेसिफिकेशन्स (Microsoft Surface Laptop Go specifications)

Microsoft Surface Laptop Go  Windows 10 Home in S mode मध्ये चालतो आणि त्यात 3: 2 स्क्रीन रेशोसह 12.45-इंचाचा पिक्सलसेन्स डिस्प्ले देण्यात आला आहे. 

लॅपटॉपमध्ये 10th-generation Intel Core i5 प्रोसेसर दिले गेले आहे, त्यासह 16 जीबी पर्यंत LPDDR4x रॅम आणि SSD स्टोरेज 256 जीबी पर्यंत आहे. 

बेस व्हेरिएंट मात्र 64GB eMMC स्टोरेजसह येतो. लॅपटॉपमध्ये अचूक ट्रॅकपॅड (precision trackpad) सह full-size कीबोर्ड देखील आहे.

यामध्ये यूएसबी टाइप-सी आणि यूएसबी-ए पोर्ट दिले आहेत. आपल्याला Wi-Fi 6 आणि Bluetooth v5.0 चा सपोर्ट देखील मिळतो.

बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी, लॅपटॉपमध्ये एक ऑपशनल फिंगरप्रिंट रीडर आणि इंटिग्रेटेड पावर बटन आहे. 

डॉल्बी ऑडिओ आणि ‘स्टुडिओ मिक्स’ द्वारा सर्वोपयोगी स्पीकर्स आहेत. 

मायक्रोसॉफ्ट सरफेस लॅपटॉप गो मध्ये व्हिडिओ कॉलसाठी 720p HD वेबकॅम देखील दिलेला आहे आणि कंपनी चा असा दावा आहे कि एका चार्जिंग मध्ये हा लॅपटॉप दिवसभर चालेल. 

मायक्रोसॉफ्ट सरफेस लॅपटॉप गो मध्ये विंडोज ऑटोपीयलट देखील आहे जे work-from-home कामांसाठी खूपच उत्तम पर्याय आहे.

याव्यतिरिक्त, लॅपटॉप चे आकारमान 278.18×205.67×15.69 मिमी आणि वजन फक्त 1.11 किलो आहे. आपण ते खरेदी करू इच्छित असल्यास आपण खाली दिलेल्या Link वरुन खरेदी करू शकता.

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

  1. भारतात Sony पुन्हा घेऊन येत आहे आपला Vaio Laptop : जाणून घ्या फीचर्स
  2. Mi Notebook 14 (IC) Laptop With 10th Gen Intel Core Processor भारतात Launch झाला: किंमत, वैशिष्ट्ये
  3. Oppo Reno 5 Pro 5G भारतात झाला लॉन्च , Enco X TWS Earbuds सह : किंमत, वैशिष्ट्ये

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !

Leave a Comment