Should I Buy A 5G Phone Now?: 5G फोन खरेदी करण्याची हि योग्य वेळ आहे का ?

marathi 5g

5G or 5G phone म्हणजे काय? (What is 5G?) 

5G कसे काम करत? (How does 5G work?)

मी आता 5G फोन खरेदी करावा का? Should I Buy A 5G Phone Now?

5G फोन खरेदी करण्याची योग्य वेळ आहे का? (Is it the right time to buy a 5G phone in Marathi?)

हे सर्वात जास्त विचारले जाणारे काही प्रश्न आहेत आणि जर तुम्हीही असाच विचार करत असाल तर काळजी करू नका, कारण आपल्या या या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला आज इथे मिळतील.

5G, नावावरून स्पष्ट आहे की, ग्लोबल वायरलेस (Global Wireless Standard) मानकानुसार हि मोबाइल नेटवर्कची पाचवी पिढी आहे. आहे, जी 4G ची जागा घेण्यास सज्ज आहे. 

5G एक नवीन प्रकारचे नेटवर्क आहे ज्याचा वेग जवळपास 1 जीबीपीएस (GBPS) आहे. 

Qualcomm कंपनीने 5G च्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

5G ची वैशिष्ट्ये

Higher Multi-Gbps Peak Data Speeds, कमीत कमी विलंब (Reduced Latency), चांगले  विश्वासार्ह नेटवर्क (Better Network Reliability), भव्य नेटवर्क क्षमता (Massive Network Capacity), खराब कनेक्टिव्हिटी असलेल्या भागात नेटवर्क उपलब्धता वाढविणे. 

5G bands

5G मध्ये तीन प्रकारचे Waves आहेत, 

लो-बँड (Low Band), मिड-बँड (Mid Band)आणि हाय-बँड (High Band) किंवा मिलिमीटर वेव्ह टाइप नेटवर्क (Millimeter Wave Type Networks) आहेत. 

लो-बँड म्हणजे ब्लँकेट (Blanket) नेटवर्क (Network) यामध्ये देशातील सर्व भाग व्यापला जातो आणि वेग 4G नेटवर्क सारखा मिळतो परंतु यामध्ये 4G पेक्षा कमीत कमी विलंब (Reduced Latency) आणि चांगले विश्वासार्ह नेटवर्क (Better Network Reliability) आपल्याला मिळू शकते. 

मिड-बॅन्ड (Mid Band) हा लो-बँडपेक्षा खूपच चांगला बँड आहे परंतु तुलनेने लहान क्षेत्रामध्ये (Area) व्यापला जातो आणि त्याची गती ( Speed) 100-200 एमबीपीएस (MBPS) आहे.

हाय बँड हे सर्वात वेगवान आहे आणि ज्याचा वेग सुमारे 1 जीबीपीएस (GBPS) पर्यंत असतो पण हा बँड अजून भारतात उपलब्ध नाही. 

हा बॅंड खूपच वेगवान आहे परंतु याची अशी मर्यादा कि तो खूपच कमी क्षेत्रामध्ये Access केला जाऊ शकतो. 

5G फोन खरेदी करण्याची हि योग्य वेळ आहे का? (Is it the right time to buy a 5G phone?)

याचे उत्तर ‘नाही’ आणि ‘कदाचित आहे’ असे आहे, आपण आपला पुढील स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी या दोन्ही बाबीं बद्दल बोलूया, 

1. 5G अद्याप भारतात उपलब्ध नाही. (5G is available in India or not ?)

अमेरिका, जपान आणि युरोप मधील काही देशांमध्ये हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. परंतु भारतात, अजून 5G स्पेक्ट्रमचा लिलाव होणे बाकी आहे. 

5G चा लिलाव (Auction) अजून भारतीय दूरसंचार विभागाने सुरु केला नाही पण स्मार्टफोन बनविणाऱ्या कंपन्यांनी खूप पुढची उडी मारली आहे.  

भारतात Samsung, Oppo, One-Plus, Realme, iQoo आणि Redmi या कंपन्यांनी त्यांचे 5G स्मार्टफोन बाजारात आणले आहेत परंतु अश्या स्मार्टफोन मध्ये आपण 5G कनेक्टिव्हिटी चा वापर सध्यातरी करूच शकणार नाही. 

२. टेलिकॉम ऑपरेटर 5G लागू करण्यास टाळाटाळ करत आहेत. (Telecom operators are not revealing to apply 5G?)

जिओ (JIO) ची स्थापना झाल्यापासून दूरसंचार ऑपरेटरमध्ये स्पर्धा बरीच वाढली आहे आणि जिओने अगदी कमी किंमती मध्ये टॅरीफ (Tariff) योजना दिल्यामुळे इतर टेलिकॉम ऑपरेटर्सना ही किंमत कमी करावी लागली. 

यामुळे सर्व प्रमुख टेलिकॉम ऑपरेटरना मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागला होता, त्यामुळे टेलिकॉम ऑपरेटर 5G लागू करण्यास टाळाटाळ करत आहेत.

आता आधीच कर्जबाजारी झालेल्या टेलिकॉम ऑपरेटर 5G स्पेक्ट्रमसाठी बोली लावण्यास टाळाटाळ करीत आहेत कारण तंत्रज्ञान महाग आहे आणि त्यांचा विश्वास आहे की पहिल्या दोन वर्षात 5G वर जास्त पैसे कमवू शकणार नाहीत.

३. 5G डिव्हाइस खूप महाग असतात. (Are 5G devices too expensive?)

5G मॉडेम सह चिपसेटची उत्पादन किंमत जास्त असल्याने स्मार्टफोन तयार करणे महाग आहे.

उदा. iQoo 4G मोबाइलची किंमत रू. 36,990 आहे तर 5G मोबाइल ची किंमत रू. 44,990 आहे.

4. 5G मॉडेमची बॅटरी खूप लवकर ड्रेन (Drain) होते. (The 5G modem battery drains very quickly?)

5G मॉडेमची बॅटरी खूप लवकर ड्रेन (Drain) होते. यामागचे कारण असे आहे की 5G सेवेसाठी स्थिर कनेक्शन सुरु ठेवण्यासाठी 4G आणि 5G कडील पुनरावृत्ती (Repetitive) सिग्नल (Signal) च्या संयोगाने कार्य करत असतात.

आणि यामुळे मोबाइल ची बॅटरी लवकर ड्रेन (Drain) होते. 

5. 5G अद्याप विकसित होत आहे. (5G is still under development?) 

अमेरिका, युरोपमध्ये 5G सेवा अद्याप फक्त मोठ्या शहरात उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात अजून हि सेवा उपलब्ध नाही. 

वरील सर्व गोष्टींचा विचार करता 5G फोनचे काही फायदे देखील आहेत, ते 4 जी स्मार्टफोन पेक्षा चांगला कॅमेरा परफॉरमन्स, गेमिंग परफॉरमन्स देतात.

आता आपणच ठरवा 5G फोन खरेदी करण्याची हि योग्य वेळ आहे का ?

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

  1. Xiaomi Mi Air Charge: चालता फिरता सहजपणे आपला स्मार्टफोन चार्ज करा
  2. Poco सर्वांसाठी घेऊन येत आहे आपला नवीन वर्षातील नवीन फोन Poco M3: किंमत फक्त..
  3. Realme लवकरच घेऊन येतोय X7 5G फोन: किंमत फक्त एवढीच..

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !

Leave a Comment