Whatsapp च्या ह्या अटी मान्य कराव्या लागतील नाहीतर करावे लागणार डिलीट..

WhatsApp वापरणार्यांना 8 फेब्रुवारी 2021 पासून नवीन Update नुसार Privacy Policy स्वीकारणे आवश्यक आहे व जर ते जमणार नसेल तर आपल्याकडे व्हाट्सअँप डिलीट करण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध राहणार नाही. 

फेसबुकच्या मालकीचे इतर Products जसे कि Instagram आणि Facebook च्या  terms आणि serivces सोबत चांगल्या प्रकारे link होण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या Privacy Policy update केल्या आहेत. 

नवीन वैशिष्ट्य किंवा नवीन कार्यक्षमता जोडणारे Update रिलीझ करून व्हॉट्सअ‍ॅपने या नवीन वर्ष्याच्या सुरुवातीला हा बदल शांतपणे घडवून आणला आहे. 

तथापि, मंगळवारी आलेल्या अँप नोटिसच्या माध्यमातून अँड्रॉइड आणि आयफोन वापरकर्त्यांना याची माहिती दिली गेली आहे. 

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या Privacy Policy मध्ये आणलेल्या बदलांची झलक या सूचनेत दिली आहे. users ना डायरेक्ट full-screen notice मधून व्हाट्सअँप update करण्याचा पर्याय दिला आहे. 

whatsapp ने Update केलेल्या Privacy Policy आणि सेवा अटी यांच्या माध्यमातून अँप वापरकर्त्याचा डेटा कसा एकत्रित केला  जातो आणि हाताळला जातो याबद्दल अतिरिक्त माहिती सुद्धा  दिली गेली आहे. 

व्हॉट्सअ‍ॅपने अचूक डेटा एकत्रित करण्याबाबतची Detail मध्ये माहिती देण्यासाठी Transactions, Payments Data आणि Location असे काही नवीन विभाग तयार केले गेले आहेत. तसेच व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या मेसेजिंग अँपद्वारे होत असलेल्या काही व्यवसायिक संवादांची देखील विशिष्ट माहिती समाविष्ट केली आहे.  

whatsapp त्याची माहिती त्याच्या इतर सहाय्यक कंपन्यासह आणि  फेसबुक सोबत कसे share करतो याची माहिती updated privacy policy आणि terms of service मध्ये दिली गेली आहे. 

facebook ने जारी केलेल्या माहितीनुसार फेसबुक असे म्हणतो कि “आम्ही आपली खाते नोंदणी माहिती (जसे की आपला फोन नंबर), व्यवहार डेटा, सेवा-संबंधित माहिती, आपण इतरांशी कसा संवाद साधता (व्यवसायांसह) याची माहिती, मोबाइल डिव्हाइस माहिती, आपला IP Address आणि Privacy Policy विभागातील काही अन्य माहिती हे सर्व आम्ही अन्य फेसबुक कंपन्यांसह Share करतो.

हि सर्व माहिती आपली संमती घेऊनच प्राप्त केली आहे, ” त्याबाबतची तपशीलवार माहिती आपल्याला whatsapp च्या  FAQ  विभागात मिळेल.

ह्या आधीही असे Update आले होते, तेव्हा अस्तित्वात असलेल्या वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटची माहिती फेसबुकवर शेअर न करणे असा पर्याय देण्यात आला होता, पण या वेळी मात्र असे वाटत नाही.

नवीन Update ची Privacy Policy आणि सेवा अटी 8 फेब्रुवारी 2021 रोजी लागू होतील, फेसबुकच्या मालकीच्या कंपनीने म्हणजेच व्हाट्सअँपने आपल्या अ‍ॅपवरील सूचनेद्वारे वापरकर्त्यांना याची माहिती दिली. वापरकर्त्यांना त्यांच्या डिव्हाइसवर व्हॉट्सअँप वापरणे सुरू ठेवण्यासाठी नवीन update स्वीकारणे आवश्यक असेल. 

याचा अर्थ असा की जर वापरकर्त्याने नवीन बदल स्वीकारले नाहीत तर ते इथून पुढे अ‍ॅप वापरू शकणार नाहीत म्हणजेच Bye Bye whatsapp करावे लागेल.

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

1.‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद। No Whatsapp

2. नवीन Smartphone घेताय ? तर ह्या गोष्टी नक्की तपासून पहा..

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद ! 

Leave a Comment

satta king chart