देशात कोरोना काळात रुग्णालये SOS संदेश का पाठवत आहेत? याचा अर्थ काय आहे?

sos in marathi

काही आठवड्यांपासून भारतात कोरोना विषाणूची दुसरी लाट पसरली आहे. देशातील अनेक राज्यांच्या आरोग्य व्यवस्था गंभीर अवस्थेत पोहचल्या आहेत असे चित्र समोर येत आहे. (SOS message from Hospital)

बर्‍याच हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड, औषधे यांची अत्यंत कमतरता आहे आणि इतर आरोग्य सुविधांची सुद्धा कमतरता आहे

संपूर्ण देश मध्ये मागील काही आठवड्यापासून कोरोना रूग्णांची खूपच  वाढत आहे.

त्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारांनी नाईट कर्फ्यू, कठोर निर्बंध, संचारबंदी करूनही रुग्णालयावर प्रचंड तणाव आहे. 

शेवटच्या काही दिवसांपासून खासगी आणि सरकार रुग्णालयांद्वारे राज्य सरकारांना आपत्कालीन संदेश (SOS) पाठवून आणीबाणी स्थितीचा संकेत देण्याच्या बातम्या समोर येत आहेत आहेत. 

देशातील बऱ्याच खाजगी रुग्णालयांद्वारे, ऑक्सिजनची मात्रा कमी झाली आहे आणि औषधाचा तुटवडा आहे अशा आणीबाणी परिस्थितीत SOS संदेश प्रणाली द्वारे मदतीसाठी राज्य सरकारांना हाक घालत आहेत.

SOS संदेश काय आहे? त्याचा अर्थ काय आहे?, तो आपण कधी पाठवू शकतो? (what is this SOS message? What does SOS mean? when we can send SOS messages?) 

मुळात या संदेशाचा उगम कधी झाला, कसा झाला हे अनेकांना माहित नाही. तर आता आपण SOS या शब्दाचा आणि आणीबाणी पारिस्थिचा काय संबंध आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू.

SOS या आणीबाणीच्या इशाऱ्याचा फुलफॉर्म काय आहे? (What is Fullform of SOS?)

sos mhnje kay

SOS चा फुलफॉर्म सेव्ह अवर शिप्स (Save Our Ships) म्हणजे आमचे जहाज संकटा पासून वाचावा तर काही लोक सेव्ह अवर सोल्स (Save Our Souls) असे म्हणतात. याचा अर्थ आमचे आत्मे वाचावा म्हणजे आम्हाला वाचवा. 

या संदेशाची सुरुवात पहिल्यांदा जहाजांसाठी वापरली गेली.

SOS चा अर्थ काय आहे? (What is Meaning of SOS?)

SOS च्या फुलफॉर्म वरून आपल्याला हे समजते कि समुद्रामध्ये प्रवास करणाऱ्या जहाजावर समुद्रात काहीं संकट आले असेल जसे कि जहाज बुडत आहे, जहाज नादुरुस्त आहे किंवा समुद्री चाच्यांनी (pirates) हल्ला केला असेल तर जहाजावरुन SOS संदेशाद्वारे मदत मागायचे. 

आणीबाणी च्या परिस्थितीत मोर्सकोड प्रणाली (Morse-Code) मार्फत संदेश पाठविले जात होते. 

मोर्सकोड (Morse-Code) ही एक प्रणाली आहे जी सांकेतिक भाषेत संदेशाची देवाण घेवाण करण्यासाठी वापरली जायची. 

मोर्स कोड मध्ये तीन बिंदू (…), तीन ओळी (—) आणि तीन बिंदू (…) असतात,

मोर्स कोड (… — …) या चिन्हाचा अर्थ आणीबाणीची परिस्थिती असा समजला जातो.

परदेशी चित्रपट असे टायटॅनिक (Titanic Movie) चित्रपटात जहाजला हिमखंड धडकल्यानंतर मोर्स कोडचा मदतीने SOS संदेश पाठवून मदत मागितली गेली.

मोर्स कोड म्हणजे काय? (What is Morse-Code)?

 morse code in marathi morse sos code var nibandh

सॅम्युअल मोर्स याने इंग्रजी वर्णमालातील अक्षरे आणि बिंदू (.) आणि रेषा (-) यांचा उपयोग करून एक कोड सिस्टम बनविली. 

त्यामध्ये इलेक्ट्रिकल, ध्वनी किंवा वायरलेस यांचा वापर करून संदेश (Signal) पाठविता येत असत म्हणून याला मोर्स कोड असे म्हणतात. 

SOS जन्म कसा झाला? (How SOS was born?)

20 व्या शतकात प्रत्येक जहाजावर संदेश वहनासाठी वायरलेस तंत्रज्ञावर आधारित रेडिओ टेलीग्राफीचा वापर सुरू झाला. 

समुद्रामध्ये प्रवास करणाऱ्या जहाजावर समुद्रात काहीं संकट आले असेल जसे कि जहाज बुडत आहे, जहाज नादुरुस्त आहे किंवा समुद्री चाच्यांनी (Pirates) हल्ला केला असेल तर इतर जहाजांकडून मदत मागितली जायची. 

समुद्रात जवळपास नसलेल्या जहांजांपर्यंत सुद्धा मोर्स कोडद्वारे पाठविलेले संदेश पोहचायचे आणि ते जहाज मदतीसाठी यायचे. 

सुरुवातीला यासाठी प्रत्येक देशांचे आणि संस्थांचे आणीबाणीचे कोड वेगवेगळे असायचे, यासाठी अमेरिकन नौदल एन.सी.(NC) हा कोड वापरत होते. 

बऱ्याच जहाजांवर मार्कोनी(Marconi) कंपनीने बनविलेले टेलीग्राफ आणि वायलेस मशीन असायचे, जहाजे आणीबाणी कोड म्हणून सिक्यूडी (CQD) हा कोड वापरात होते. 

सर्वात पहिले जर्मनीची एक संघटना “जर्मन रेग्युलेशन ऑफ कंट्रोल स्मार्ट टेलिग्राफी” यांनी आपत्कालीन कोड म्हणजे मदतीसाठी केलेला धावा याला SOS         (… — …) वापरायला सांगितले होते.

जगभरातील देशांनी SOS ला का मान्यता दिली? (Why countries around the globe recognized SOS?)

(Why Countries Around The Globe Recognized SOS?

20 व्या शतकात जगभर आणीबाणी चा संदेश पाठवण्यासाठी विविध कोड होते त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण व्हायची. 

भिन्न सांकेतिक भाषा आणि नियम यामुळे खूप समस्या येऊ लागल्या, यामुळे सर्व देशांनी ठरविले कि एकच आणीबाणीचा कोड असावा.

1906 साली बर्लिनमध्ये आंतरराष्ट्रीय वायरलेस टेलिग्राम कनव्हेंशन (International Wireless Telegram Convention) मध्ये एकच कोड ठेवण्याच्या संदर्भात चर्चा झाली. 

या वेळी इटली च्या मार्कोनी कंपनीने अशी सूचना “-.-. – .– ..”, आणि “……… -..-..- ..” दिली याचा अर्थ म्हणजे ट्रीपल एस, ट्रीपल डी, परंतु या कोडला त्याच्या लांबीमुळे बर्‍याच देशांनी त्यास नकार दिला. 

पण जर्मनीचा कोड “… — …” अर्थात (SOS) जो पाठविणे सोपे आणि वेगवान होते त्यामुळे जवळजवळ सर्व देशांनी SOS ला मंजूरी दिली. 

अशा रितीने एसओएस (SOS) कोड जागतिक पातळीवर वर आपत्कालीन मदतीसाठी मान्यता प्राप्त झाले आणि हा कोड सर्व देशांनी स्वीकारला. 

1 जुलै 1908 पासून हा कोड वापरण्यास सुरुवात झाली.

पहिला SOS संदेश केंव्हा पाठविला? टायटॅनिकचा आणि SOS चा काय संबंध आहे?  (When was first SOS sent?)

where was first emergency message sent by ship in marathi

उत्तर कॅलिफोर्नियामध्ये केप हीथर्स जवळ अमेरिकी स्टीमर अज़ाहोई (American steamer Azaoahoe) दुर्घटनाग्रस्त झाले नंतर ऑगस्ट 1909 मध्ये प्रथम आणीबाणी संकेत (SOS) कोड पाठविला होता. 

सुरुवातीला अनेक देशांनी SOS ला मान्यता देऊन सुध्दा ज्या जहाज वर मार्कोनी कंपनीचे टेलीग्राफ मशिन होते ती जहाजे सीक्यूडी कोड (CQD) कोड वापरत होते. 

टायटॅनिकच्या बोर्डवर देखील मार्कोनी कंपनीची टेलीग्राफ यंत्रणा होती, जहाज जेंव्हा  प्रचंड हिमखंडाला धडक दिल्यानंतर टायटॅनिक ने सुरुवातीला आणीबाणी संदेश म्हणून सीक्युडी (CQD) कोड पाठविला होता. 

काहीं वेळानंतर जहाजाच्या रेडिओ ऑफिसर ने एसओएस (SOS) हा संदेश पाठविला होता. 

1908 मध्ये “एसओएस” (SOS) लागू झाल्या नंतरही काहीं काळ मार्कोनी ऑपरेटर (CQD) हा कोड वापरायचे.

15 एप्रिल 1912 टायटॅनिकने सुरुवातीला CQD च्या ऐवजी मदतीसाठी SOS हा संदेश दिला असता तर त्वरित मदत मिळाली असती असे काहीं जणांचं म्हणणं आहे.

सीक्यूडी कोड म्हणजे काय? (What is CQD Code)

CQD कोड म्हणजे Come Quick Danger (ब्रिटिश सिस्टम), आणीबाणीच्या एसओएस SOS पूर्वी आपत्कालीन परिस्थितीत वापरला जायचा.

सध्याचे एसओएस कसे वापरले जाते? (Currently How SOS is used?)

gps in ships in marathi

सध्या  जीपीएस (GPS)  आणि इतर नवीन तंत्रज्ञानामुळे जहाजामध्ये सध्या SOS चा वापर होत नाही. आता SOS फक्त आपत्कालीन संदेशासाठी वापरली जाते. 

कॉर्पोरेट जगामध्ये आर्थिक नुकसानानंतर फायनान्सर त्यांच्या गुंतवणूक धारकांना SOS संदेश पाठवितात. 

तसंच सध्या आरोग्य सुविधा देणारे हॉस्पिटलमधून सुध्दा आरोग्य आणीबाणी निर्माण झालेनंतर SOS संदेश प्रस्तुत करतात. 

कोरोना व्हायरसमुळे आरोग्य व्यवस्थेवर बराच ताण आहे. बर्‍याच हॉस्पिटल मधून  ऑक्सिजनची,  औषधांची अत्यंत कमतरता आणि इतर आरोग्य सुविधांच्या अभावी SOS चे संदेश पाठवीत आहेत.  

ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे हॉस्पिटल्समध्ये आणीबाणीची परिस्थिती वारंवार निर्माण होत आहे. 

अशा परिस्थितीत SOS संदेशामुळे त्वरित मदत मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. 

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

हे हि वाचा –

  1. नियमित व्यायामामुळे गंभीर कोविड आजारा पासून बचाव होण्यास मदत होते का?
  2. क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? 
  3. आपल्यासाठी ऑक्सिजन इतके महत्वाचे का आहे?
  4. मागील वर्षी Apple, Samsung पेक्षा जगात सर्वात जास्त फोन चायनीज का विकले गेले 

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !

Leave a Comment

satta king chart