WhatsApp जगातील सर्वाधिक लोकप्रिय ऑनलाइन चॅट अँप्लिकेशन आहे. 2019 मध्ये व्हॉट्सअॅप वापरणारे जवळपास 1.9 अब्ज लोक होते, तसेच भारतात WhatsApp वापरणाऱ्यांची संख्या ४० कोटीं-च्या वर आहे.
व्हॉट्सअॅप वरून दररोज जवळजवळ 60 अब्ज संदेश पाठविले जातात. एंड-टू-एंड एन्क्रिप्शन असल्यामुळे व्हॉट्सअॅप वापरणे सुरक्षित मानले जाते.
आपण स्मार्टफोन किंवा डेस्कटॉपचा वापर करून व्हॉट्सअॅप वरून संदेश (Messages) , प्रतिमा (Images) आणि व्हिडिओ (Video) फाइल्स पाठवू शकतो आणि विनामूल्य व्हॉईस (Voice), व्हिडिओ (Video) कॉल आणि व्हॉईस संदेश (Messages) करू शकतो.
तुम्हाला हे माहित असेलच की फेसबुकने व्हॉट्सअॅप (WhatsApp) विकत घेतले आहे. व्हॉट्सअॅपच्या नवीन Policy नुसार users च्या माहितीच्या गोपनियतेवर गदा येणार आहे.
काही लोकांना (Users) फेसबुकच्या इकोसिस्टिमचा भाग व्हायला आवडणार नाही. त्यामुळे काहीं users व्हॉट्सअॅपला पर्याय शोधत आहेत किंवा काहींनी शोधला हि असेल, तर हा लेख whatsapp चे जे काही चांगले पर्याय (alternatives) मार्केट मध्ये उपलब्ध आहेत ते ते आम्ही शोधले त्यासोबत काही दिवस वापरले आणि तुमच्यासाठी निवडक असे ५ पर्याय दिलेले आहेत.
व्हॉट्सअॅपला पर्याय (WhatsApp alternatives) असणारे ५ चॅटिंग अँप्स
अनुक्रमणिका
1. टेलिग्राम (Telegram)
Telegram एक फ्री, क्रॉस-प्लॅटफॉर्म, क्लाउडवर आधारित इन्स्टंट मेसेजिंग (Messages), व्हिडिओ कॉलिंग (Video Calling) आणि व्हीओआयपी (VOIP) म्हणजे फ्री इंटरनेट कॉल सेवा देणारे अँप्लिकेशन आहे.
14 August 2013 रोजी आयओएस (IOS) साठी आणि ऑक्टोबर 2013 मध्ये अँड्रॉईडसाठी (Android) लॉन्च केले गेले. डेटा लोड कमी करण्यासाठी टेलिग्रामचे अॅप सर्व्हर जगभरात पसरलेले आहेत, तर ऑपरेशनल सेंटर सध्या दुबईत आहे.
टेलिग्राम हे WhatsApp पेक्षा अधिक सुरक्षित आहे, त्यांनी सिक्रेट चॅटसाठी एन्ड-टू-एंड एनक्रिप्शन (End to End Encription) अँप आहे.
टेलिग्राम (Telegram) ची वैशिष्ट्ये.
१. त्वरित संदेशवहन (Instant Messaging)
२. व्हॉईस कॉल. (Voice Calling)
३. एचडी व्हिडिओ कॉल. (HD Video Calling)
४. लाईव्ह लोकशन शेरिंग (Live Location Sharing)
५. चॅट फोल्डर्स (Chat Folders) -आपले चॅट्स वेगवेगळ्या नावाने ठेऊ शकतो.
६. आपला मोबाइल नंबर शेअर न करता एखाद्याला आपल्या टेलीग्राम मध्ये Add करू शकतो.
७. पाठविलेले मेसेज एडिट करू शकतो.
८. मेसेज शेड्युल (Schedule) करणे.
९. व्हिडिओ एडिट (Edit) करणे
१०. ऍनिमेटेड स्टिकर्स (Animated Stickers)
११. वैयक्तिक संपर्कांसाठी नोटिफिकेशन (Notification) बंद करणे.
१२. चॅट लॉकिंग (Chat Locking)
दोष :- सगळे लोक व्हाट्सअँप वापरत असल्यामुळे तुमच्या समोरचा व्यक्ती तिथे असेलच ह्याची शाश्वती कमी आहे, त्यामुळे हा आपल्यासाठी चांगला whatsapp alternatives आहे कि नाही हे विचार करून पहा.
2. हाइक मेसेंजर (Hike Messenger)
याला हाईक (Hike) स्टिकर चॅट देखील म्हटले जाते, ते एक भारतीय फ्रीवेयर, क्रॉस-प्लॅटफॉर्म इन्स्टंट मेसेजिंग, व्हॉईस ओव्हर आयपी अँप्लिकेशन आहे, जे 12 डिसेंबर 2012 रोजी केविन भारती मित्तल यांनी लाँच केले होते,
आणि आता ते हाईक प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीचे आहे. हाइक एसएमएस द्वारे ऑफलाइन कार्य करू शकते आणि त्याला मल्टी-प्लॅटफॉर्म सपोर्ट आहे आणि हाईक एक सुरक्षित अँप आहे.
हाईक (Hike) ची वैशिष्ट्ये.
१. हाईक (Hike) मध्ये सुमारे 20,000 स्टिकर्सची (Stickers) लायब्ररी आहे.
२. हाईक(Hike) रन- हाईक रन मध्ये एक inbuilt पेडोमीटर अँप आहे.
३. ब्लू पॅकेट्स हे सुंदर लिफाफा (Folder) डिझाइन केलेले आहेत ज्यामुळे मित्रांना वैयक्तिक संदेश देऊन त्यांना आश्चर्यचकित करू शकता.
४. यामध्ये असे वैशिष्ट्य आहे कि Users त्यांच्या गप्पा (Chats) पटकन आणि हळुवार पणे लपवू (Hide) शकतात.
५. टेक्स्ट मेसेजला स्टिकर्स मध्ये रूपांतर करण्याची सुविधा फक्त hike मध्येच आहे.
व्हॉट्सअॅप (WhatsApp) ची तुलना करत असाल तर व्हॉट्सअॅप हे वापरन्यास हाईक (Hike) पेक्षा सोपे आहे.
3. सिग्नल (Signal whatsapp alternatives)
सिग्नल (Signal) हे एक क्रॉस-प्लॅटफॉर्म एनक्रिप्टेड मेसेजिंग सेवा आहे जी सिग्नल फाउंडेशन आणि सिग्नल मेसेंजर द्वारे विकसित केली गेली आहे.
वन टू वन आणि ग्रुप मेसेजेस पाठविण्यासाठी हे वापरले जाते ज्यामध्ये फाईल्स, व्हॉइस नोट्स, फोटो आणि व्हिडिओ share करता येतात.
सिग्नल (Signal) ची वैशिष्ट्ये.
१. त्वरित संदेशवहन (Instant Messaging)
२.व्हॉईस कॉल. (Voice Calling)
३. एचडी व्हिडिओ कॉल. (HD Video Calling)
४. एचडी ग्रुप कॉन्फरन्सिंग.(HD Group Conferencing)
5. सिग्नल (Signal) अँप्लिकेशन हा एक असा प्लॅटफॉर्म आहे कि Users एकापेक्षा अनेक डिव्हाइसवर याचा वापर करू शकतात. हि सुविधा व्हॉट्सअॅपमध्ये नाही.
6. सिग्नल (Signal) अँप्लिकेशनचा वापर करून डेस्कटॉपवर ग्रुप व्हिडिओ कॉल करू शकता हि सुविधा सुद्धा व्हॉट्सअॅप मध्ये उपलब्ध नाही.
व्हॉट्सअॅप (WhatsApp) ची तुलना करत असाल तर सिग्नल प्रत्येक वेळी प्रत्येक संदेशासाठी गोपनीयता प्रदान करणारे, प्रगत एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन प्रोटोकॉल Policy वापरते त्यामुळे जास्त सुरक्षित आहे.
4. गूगल हॅंगआऊट (Google Hangout)
गूगल हँगआउट्स हा गुगलने विकसित केलेला क्रॉस-प्लॅटफॉर्म मेसेजिंग App आहे. गूगलने २०१३ मध्ये हँगआउट्सला एक स्वतंत्र प्रॉडक्ट बनविले, Google ने Google+ messenger आणि Google Talk मधील वैशिष्ट्यांसह हँगआउट विकसित केले आहे.
Google Hangout मधून फोटो, इमोजी पाठविता येतात आणि व्हिडिओ कॉल करता येतो. १५० जणांचा ग्रुप बनवून चॅटिंग करू शकता.
आपल्या सूचना स्नूझ (Snooz) करून ठेवता येतात जेणेकरून आपण नंतर प्रतिसाद (Respond) करू शकता.
गूगल हँगआउट्स (Google Hangout) ची वैशिष्ट्ये
१. त्वरित संदेशवहन. (Instant Messaging)
२. व्हॉईस कॉल. (Voice Calling)
३. एचडी व्हिडिओ कॉल. (HD Video Calling)
४. एचडी ग्रुप कॉन्फरन्सिंग.(HD Group Conferencing)
५. ऑटो स्क्रीन फोकस. (Auto Screen Focus)
६. इंटेलिजेंट म्यूटिंग. (Intelligent Muting)
७. इनबिल्ट स्क्रीन शेअरिंग. (Inbuilt Screen Sharing)
5. वाइबर (Viber)
व्हॉट्सअॅप प्रमाणेच, वाइबर एक ऑनलाइन चॅट अँप्लिकेशन आहे ज्यामध्ये Users ओळखण्यासाठी संपर्क क्रमांक (Contact No.) चा वापर होतो.
आपण जेव्हां आपला फोननंबर नोंद (Regsiter) करता तेव्हा आपल्या फोनवर कोड पाठविला जातो. आपण वाइबर चॅट अँप्लिकेशन मधून विनामूल्य कॉल करू शकता, संदेश, फोटो आणि व्हिडिओ पाठवू शकता.
व्हॉट्सअॅप (WhatsApp) पेक्षा जास्त स्टिकर्स व्हायबर चॅटिंगसाठी ऑफर करते.
रॅक्टेन व्हायबर / व्हायबर हा एक क्रॉस-प्लॅटफॉर्म व्हॉइस ओव्हर आयपी आणि इन्स्टंट मेसेजिंग सॉफ्टवेअर अँप्लिकेशन आहे जपानी बहुराष्ट्रीय कंपनी रकुतेन ने अँप्लिकेशन बनविले आहे.
व्हायबर (Vibor) ची वैशिष्ट्ये
१. हाय Quality व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलींग
२. ग्रुप कॉलींग आणि चॅटिंग
३. अनलिमिटेड स्टिकर्स आणि GIF‘s
४. एंड-टू-एंड एनक्रिप्शन
पण Whatsapp चं का?
Whatsapp ची वैशिष्ट्ये
१. त्वरित संदेशवहन.(Messages)
२.व्हॉईस कॉलिंग (Voice Calling) करणे सोपे आहे .
३. व्हिडिओ कॉलिंग (Video Calling) करणे सोपे आहे
४. वेब आणि डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप संभाषण करू शकता.
५. फोटो आणि व्हिडिओ द्वारे महत्त्वाचे क्षण शेअर करू शकता.
६. व्हॉईस संदेश. (Message)
७. कागदपत्रे (Documents) शेअर करणे सोपे आहे.
८. गॅलरीमधून व्हॉट्सअॅप ग्रुपचे फोटो आणि व्हिडिओ Hide करणे.
९. आपण Message पाठविल्यानंतर काहीं वेळाने डिलीट होणे.
१०. व्हॉट्सअॅप (WhatsApp) संदेशांना (Message) ऑटो आन्सरिंग रिप्लाय करणे.
११. व्हॉट्सअॅप (WhatsApp) संदेशांना शेड्युल मध्ये पाठविणे.
१२. लाईव्ह लोकशन शेरिंग
१३. व्हॉट्सअॅपचा (WhatsApp) वापर करून पीसी आणि फोन दरम्यान फाईल्स ट्रान्स्फर करणे.
१४. चॅट email करणे.
१५. Google ड्राइव्ह वर डेटा बॅकअप घेऊ शकतो. इ.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे WhatsApp सर्व सामान्याना वापरण्यास खूपच सोपे आहे त्यामुळे whatsapp alternatives असे तंतोतंत अँप कोणतेच असू शकत नाही.
आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,
1.‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद। No Whatsapp
2. भारतीय कंपनीनें दिली google ला टक्कर । बनविले स्वदेशी File Storage System। Digiboxx
आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.
आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.
आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.
वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !